रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहितीीAnkol vruksh Information in marathi

 अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहिती

Ankol vruksh Information in marathi

अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहितीीAnkol vruksh Information in marathi


वनस्पती शास्त्रीय नाव : आयलेजियम ल्यामार्की,

इंग्रजी नाव : Dakshin Dhera, Dhera, Thel, Ankul.


इंग्लिश नाव : Saga – leaf – Alangium

लॅटिन नाव : Alangium – Lamarkil.

संस्कृत नाव : अंकोल दीर्घकील,

हिंदी नाव : ढेरा, थेल, अंकुल.

मराठी नाव : आंकुल.

स्थान : 

आंकोल वनस्पती ही भारतात सर्वत्र आढळते. पण विशेषत ही हिमाचल प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात विशेषतः आढळते.

झाडाची उंची :

तीन ते सहा मीटर वाढ असणारे ही एक वनस्पती आहे.

खोड :

 या वनस्पतीचा खोड हे २.५ ते ३.०० इंच जाडीचे खोड असते.

फांद्या / शाखा :

अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहितीीAnkol vruksh Information in marathi


 या वनस्पतीच्या फांद्या या वेड्यावाकड्या असतात.

साल : राखाडी रंगाची खडबडीत साल अंकोल झाडाची असते

पाने :

 लंबगोलाकार पाने या वनस्पतीची असून टोकदार असतात. कन्हेरी सारखी पाने असून लांब व रुंद असतात. या वनस्पतीस बारा महिने पालवी असते.

फुल :

अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहितीीAnkol vruksh Information in marathi


या वनस्पतीचे फुल हे पांढ-या रंगाचे असते. फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात ते फुलते. यांना गोडसर वास असतो.

फळ :

अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहितीीAnkol vruksh Information in marathi


 अंकोलाची फळे ही बेरीच्या फळासारखी असून सुरवातीस लालसर नंतर काळसर दिसतात. साल काढल्यावर आतील गर पांढरट दिसतो. गोड चवीचे हे फळ असते.

मूळ :

 अंकोलाचे मूळ पिवळसर रंगाचे तेलकट व टणकदार असते.

बी :

 अंकोलाच्या बियापासून तेल काढले जाते.

अंकोल वृक्षाचे औषधी महत्त्व :

अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहितीीAnkol vruksh Information in marathi


• अंकोल वृक्षाच्या मुळात ०.८ % अंकोटिन द्रव्य असते. यामधील अंश 0.2% त्याच्या तेलात असते. हे तेल रोगविरोधी गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग औषधात करतात. या तेलाची चव तुरट कडू व थोडी तिख्त असते. याची प्रकृती तीक्ष्ण, उष्ण व स्निग्ध असते.

• रक्तदाब कमी करण्यासाठी याचा मूळाचा वापर केला जातो.

• अंकोलाचा रस हा विष, कफ, पित्त,वात, शूल, कृमी, सूज आम व रक्तदोष कमी करण्यासाठी वापरतात.

• याचा रस कुत्रे, मांजर, उंदीर, साप यांच्या विषावर गुणकारी आहे.

• अंकोलाच्या बियांचे व मूळाचे तेल अंघोळ करताना लावल्यास त्याचा उपयोग त्वचारोगावर होतो.

• अंकोलाचे तेल वात व कफ नाशक आहे.

• अतिसार व विषबाधा झाल्यास अंकोलाच्या मूळाची साल तांदळाच्या धुतलेल्या पाण्यात उगाळून मधासवे घेतल्यास फरक पडतो.

• पोटात कृमी वाढले असतील तर त्यासाठी अंकोलाचा रस वापरतात

• त्वचारोग, वायूने अंग दुखणे, जलोधर, सूज, दाह, ज्वर, मुत्रावरोध,इत्यादी विकारावर अंकोलाच्या मूळाचे तेल वापरतात.

• यासाठी आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घ्यावा योग्य मात्रा सांगतील.

रोज अन्कोल फळ दोन किंवा तीन जेवणानंतर सकाळी खाल्यास पुरुषाचे विरी वाढते व सेक्स क्षमता वाढवण्याचे काम करते.

अशी आहे अंकोल वृक्षाची माहिती.


निर्गुडी /सम्हालू विषयी आयुर्वेदीक माहिती

 निर्गुडी /सम्हालू विषयी आयुर्वेदीक माहिती

निर्गुडी /सम्हाल विषयी आयुर्वेदीक माहिती


मराठी नाव : निर्गुडी , लिंगडी.

हिंदी : निर्गुडी

Lyatin nav : Vitex Negundu.

मूलस्थान : आशिया खंडात, भारतीय उपखंडातील देशात तसेच दक्षिण आफ्रिकेत ही वनस्पती आढळते.

उंची :

ही वनस्पती झुडूप वर्गीय असून २ ते ८ मीटर पर्यंत याची उंची वाढते

• सुगंध असणारी ही औषधी वनस्पती आहे.

खोड:

निर्गुडी /सम्हाल विषयी आयुर्वेदीक माहिती


याचे खोड पांढरट हिरव्या रंगाचे असते.

पाने :

लहान लंब वर्तुळ आकाराची याची पाने दातर्या असणारी संयुक्त पान या प्रकारची पाने असतात. काही लहान तर काही मोठी असतात. पाने खालील बाजूने पांढरट रंगाची असतात.

फुले : 

निर्गुडी /सम्हाल विषयी आयुर्वेदीक माहिती


फुलांची रचना एका तुऱ्या सारखी असून त्यांचा रंग निळा व पांढरट असतो.

फळे :

 या झाडाची फळे ही रस युक्त छोटीशी फुटाण्याच्या आकाराची असतात. ती फळे पिकल्यावर काळी जांभळी दिसतात.

निर्गुडी वनस्पतीचा औषधी उपयोग :

• निर्गुडीच्या झाडात क्यास्टिसीन, आयसोओरिएंटीन, क्र्यायसोफिनोल, फुक्टोज, ल्युटीओलिन घटक असतात.

• या वनस्पतीची लागवड घराशेजारी कुंपण घालण्यासाठी करतात. त्यामुळे किडे, डास तसेच इतर कृमी येत नाहीत. तसेच घातक जिवाणू, विषाणू यांच्या वाढीला आळा बसतो. व रोगराई नियंत्रण करण्याचे काम निरगुडी करते.

• शरीरात कोठेही वेदना होत असतील. म्हणजे हात पाय दुखणे, सांधे दुखी, मानदुखी, कंबरदुखी होत असेल तसेच डोकेदुखी असेल तर त्यावर निरगुडेच्या तेलाने मसाज करावा. वेदना मुक्त होऊन आराम मिळतो. व विकार बरा होतो.

निर्गुडी /सम्हाल विषयी आयुर्वेदीक माहिती


• वात दोषाने अंग दुःखी होत असेल तर त्यावर निरगुडी वापरतात.

• विषमज्वर असेल तर निर्गुडीच वापर करतात.

• गळू सारख्या आजारावर ती फुटून निचरा होताना निरगुडीचा पाला चेचून लावतात.

• वृषण सुजण्यावर देखील निर्गुडीचा पाला चेचून लावला जातो.

• घरातील धान्य साठवल्यावर त्याच्या टोपल्या, वा पिशव्यांच्या भोवती निर्गुडीची पाने टाकतात. ज्यांच्या वासाने किडे कीटक येत नाहीत.

• छातीत कफ साठला असेल. व पाणी झाले असेल. त्यामुळे श्वास घेता येत नसेल. तर निरगुडीच्या हिरव्या पानांचा रस घालून खोबरेल तेलात टाकून गरम करून थंड करतात व छाती मान, पाठ व गळा या ठिकाणी हे तेल चोळले जाते. व गरम फडक्याने वाफ घेतली जाते. त्याने फरक पडतो.

• निर्गुडीच्या हिरव्या पानांचा काढा सकाळी थोडा रोज घेतल्यास विषमज्वर नष्ट होणे, सांधेदुखी वर व छातीतील कफ साठला असेल तर त्यावर उपयोगी पडतो. पण हा आयुर्वेदीक वैद्यांच्या सल्याने उपचार घेणे चांगले. कारण नियमापेक्षा जास्त सेवन केल्यास अंगाची आग व वेदना होतात.

• निर्गुडीच्या हिरव्या पानांचा रस घालून बनवलेले तेल वेदना शामक असते. त्यामुळे त्याचा वापर मालिश करताना करतात. त्यामुळे ते तेल वेदना शामक, व चर्मरोग निवारणाचे काम करतात.

निर्गुडी /सम्हाल विषयी आयुर्वेदीक माहिती


• थंडी ताप येत असेल तर किंवा विषाणूजन्य आजारांवर निरगुडी अत्यंत उपयुक्त आहे.

• टॉन्शील दुखणे, तोंड येणे, दात दुःखी असेल तर निरगुडीची पाने घालून तयार केलेले गरम पाणी घेऊन गुळण्या केल्यास आराम पडून लवकर बरे होते.

• निरगुडीच्या पानांची पावडर तसेच फळांची पावडर देखील गरम पाण्यासोबत सेवन करतात.

• वेदना शामक, सुज उतरवणारी, अस्थमा, टोन्शील वेदना कमी करणारी निरगुडी असल्याने तिच्या पानांचा काढा रोज सेवन केल्यास फायदा होतो. 

• निरगुडीच्या अनेक जाती आहेत. यामधे निळी फुले व पांढरी फुले असणारी निरगुडीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.

• डोकेदुखी होत असेल तर निरगुडीच्या पानांची वाटून पेस्ट करून डोक्याला लावल्यास डोकेदुखी थांबते.

• कान फुटणे ही समस्या निर्माण झाल्यास निरगुडीची पाने तेलात शिजवून ते तेल थंड करून कानात घातल्यास कान फुटणे थांबते.

• तोंडात फोड आले की निरगुडीच्या पानांचा रस काढून तो पाण्यात उकळून कोमट करून गुळण्या केल्यास तोंडातील फोड बरे होतात.

• मासिक पाळीत तसेच स्त्रियांच्या मासिक पाळी समस्येवर निरगुडी पानांचा काढा घेतल्यास बरे वाटते. तसेच रोज निरगुडीच्या पानांची, मूळांची व फळांची पूड करून रोज सेवन केल्यास पाळी नीट होते.

• सायटीका स्लिपडिस्क समस्येवर निरगुडीची पाने तेलात टाकून शिजवून थंड करून ते अर्क उतरलेले तेल लावून मालिश केल्यास आराम मिळतो.

• तसेच शरीरावर खाज गुजरी या समस्येवर निरगुडीचे तेल लावावे त्यामुळे ती समस्या दूर होते.

• ताप येत असेल अंग दुखत असेल. तर निरगुडीचा काढा देतात. त्यामुळे आराम पडतो.

• निरगुडीचे सेवन पित्तप्रधान व्यक्ती व गर्भावस्थेतील महिलांनी टाळावे.

• व याचे सेवन करताना आयुर्वेदीक वैद्यांच्या सल्ल्याने करावे.

• निरगुडीच्या डहाळ्यांचा झाडलोट करण्यासाठी वापर करतात

अशी आहे निरगुडी वनस्पती विषयी माहिती


वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Veldoda ,Cardamom use and benifit

 वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग
वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Veldoda ,Cardamom use and benifit


मराठी नाव: वेलदोडा, वेलची,

हिंदी नाव: इलायची

English name : Cardamom

कुळ : झिंजिबेरीस

इलेट्यारिया : हिरवा वेलदोडा.

आमोमम. : गडद तपकिरी रंगाचा मसाले वेलदोडा.

वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Veldoda ,Cardamom use and benifit


• हिरवे वेलदोडे विशेषत आहारात वापरले जातात जास्त प्रमाणात.

आकार

लहान अंडाकृती आकाराचा असून आतील बाजूस लहान लहान तपकिरी, काळपट रंगाच्या बिया आढळतात. या बियांपासून पुनर्लागवड केली जाते.

वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Veldoda ,Cardamom use and benifit


आढळणारे देश

भारत, श्रीलंका, मलेशिया, टांझानिया, ग्वाटेमाला.

हिरव्या वेलदोड्यात आढळणारे घटक:

कर्बोदके, सेल्युलोज, प्रथिने, अ, ब, क जीवनसत्त्व, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, तांबे, लोह, म्याग्नेशियम, फॉस्फरस, जस्त इत्यादी.

वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Veldoda ,Cardamom use and benifit


वेलदोड्याची आयुर्वेदिक औषधे महत्त्व:

• पोट विकार झाल्यास, पोट फुगी व गॅसेस प्रॉब्लेम झाल्यास दहा वेलचीची पूड करुन ती पाण्यात टाकून उकळून त्याचा काढा करुन दर दोन तासाने सेवन केल्यास अजीर्ण व पोटदुखी बरी होते.

• पित्त विकाराने उलटी होत असेल, किंवा अपचन क्रियेमुळे उलटीचा त्रास होत असेल तर वेलदोडे घालून काढा करुन पिण्याने फायदा होतो.

• थंडीच्या दिवसात कफ, खोकला झाल्यास आपण वेलदोडे व सुंठ पावडर एकत्र करुन त्यांचे सेवन मधासोबत दिवसातून चार पाच वेळा केल्यास कफ व खोकला कमी होतो.

• वेलदोड्यामध्ये भुक वाढवणारे घटक असतात. यामुळे भूक वाढते. तसेच थकवा दूर करण्याचे व त्वचा उजळ करण्याचे काम वेलदोडा करतो.

• पोटात आतील बाजूस अल्सर असेल आतील बाजूस जखमा होतात त्या बऱ्या करण्याचे, आग जळजळ कमी करण्याचे काम तसेच सूज कमी करण्यासाठी वेलदोडे खाणे फायद्याचे असते.

• अँटी ब्याक्टेरीया गुणधर्मामुळे तोंडातील वाढणारे घातक जिवाणू नष्ट करण्याचे काम वेलदोडा करतो. त्यामूळे जेवणानंतर एक तरी वेलदोडा खावा. ज्याने मुखशुद्धी होते.

• वेलदोडे खाल्याने सेक्स लाईफ सुधारते.

• शरीरातील वाईट कलोरेस्टरोल काढून टाकण्याचे काम वेलदोडा करतो. त्यामूळे ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यासाठी वेलदोडा खाणे फायद्याचे असते.

• शरीरात आयर्न म्हणजेच लोहाचे व कॅल्शियम वाढवण्याचे कार्य वेलदोडे करतात. व्हिटामिन सी त्यामध्ये मोठ्याप्रमाणात असते.

• पचनसंस्थेचे आरोग्य सुधारणेसाठी जठर व पोटाच्या समस्या, गॅसेस यावर वेलदोडे खाणे फायद्याचे असते.

• वेलदोडे, सुंठ, लवंग, शहाजिरे, यांची पेस्ट अपचनवर उपयुक्त आहे.

• पित्ताने जळजळ होत असेल तर वेलदोडे खाल्याने पित्त कमी होते.

• वेलदोड्याचा उपयोग चहा, वेगवेगळे गोड पदार्थ करताना केला जातो.

वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Veldoda ,Cardamom use and benifit


• असा हा वेलदोडा बहुगुणी आहे.


चिंच वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती Tamarind tree information in Marathi

 चिंच वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती

Tamarind tree information in Marathi

चिंच वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Tamarind tree information in Marathi


मराठी नाव : चिंच

हिंदी नाव : इमली

उंची :  चिंचेचे झाड हे उंच असते ते साधारण 40ते 50 फूट उंच असते.

खोड :  या झाडाचा बुंधा जाड असून वरील साल काळसर सुरकुत्या असल्या सारखी असते.

पाने :  झाडाची पाने ही लहान लाजरीच्या पानाच्या आकाराची संयुक्त प्रकारची असतात.

चिंच वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Tamarind tree information in Marathi


फुले:  या झाडाच्या शेंड्यावर फुलोरा येतो. अत्यंत नाजूक असा पिवळसर रंगाचा असतो.

फळे :   फुलोर्याला पूढे अर्ध वर्तुळाकार वाकड्या तिकड्या चिंचा लागतात. ही त्याची फळे आहेत. वरील तपकिरी पापडी सारख्या आवरणाखाली मुलायम असे साल असते. त्याच्या आतील भागात बिया असतात. ज्या चॉकलेटी काळसर रंगाच्या असतात.

चिंच वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Tamarind tree information in Marathi


• चिंच व पानांची चव आंबट असते.

चिंचेचे औषधी महत्व:

चिंच वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Tamarind tree information in Marathi


• चिंचेमध्ये अँटीऑक्सीडेंट्स, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी, फलेव्होनॉइडस, कॅरोटीन असते.

• चिंच खाल्याने शरीरातील इन्सुलिन नियंत्रणात राहते. व साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी चिंच मदत करते.

• शरीरातील फॅट म्हणजे स्तुलता कमी करण्यासाठी मदत होते.

• चिंचेत पोटॅशियम असल्याने ती उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करते.

• चिंचेतील व्हिटामिन सी हे रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

• चिंचेतील व्हिटामिन बी मुळे मसल्स मजबूत होतात.

• चिंचेतील फॉस्फरस हा दातदुखी दूर करतो.

चिंचेची पाने खाण्याचे फायदे:

• गर्भावस्थेत चिंचेची पाने खाल्यास त्या स्त्रीची प्रसूती झाली की दुधातील गुणवत्ता वाढलेली असते.

• चिंचेची पाने खाल्याने शरीरावरील जखमा असल्यास बऱ्या होण्यास मदत होते.

• हवेतून, पाण्यातून सूक्ष्मजीव आपल्या शरीरात प्रवेश करतात. संक्रमित होतात, त्यापासून बचाव होण्यासाठी चिंचेची पाने खाल्यास फायदा मिळतो.

• हाडातील कमकुवतपणा घालवण्यासाठी चिंचेची पाने खावीत. कॅल्शियमची वाढ होते.

• चिंचेतिल व्हिटामिन सी पोटात अल्सर असेल तर बरा करते.

• चिंचेच्या पानात व्हिटा्मिन ए असते. ज्याच्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते.

• सांधे दुखीत आलेली सूज कमी करण्यासाठी चिंचेची पाने खाल्यास फायदा मिळतो.

• चिंचेच्या व चिंचेच्या पानांच्या सेवनाने रक्तप्रवाह सुरळीत सुरू होतो. व शरीरात लोहाचे प्रमाण वाढते लाल पेशींची वाढ होऊन अशक्तपणा कमी करते, स्मरणशक्ती वाढते, व पोटाच्या समस्या कमी करते.

चिंच वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Tamarind tree information in Marathi



• चिंचेतील फ्लेव्होनॉइडससारखे पॉलीफेनोल शरीरातील लठ्ठपणा ( कलोरेस्टेरोल कमी करण्यासाठी मदत करते. व चिंचेत असणारे म्याग्नेशियम व पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करते.

• चिंच ही वातनाशक, आहे. अन्ननलिका पचनसंस्था सुधारण्यासाठी आवश्यक घटक चिंचेत आहेत.

• चिकण गुनियावर चिंचेच्या बियांपासून औषध बनवले जात आहे.

चिंच वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Tamarind tree information in Marathi


चिंच खाण्याचे तोटे : 

चिंच ही आम्लधर्मी असल्याने तिचे पित्त विकार असलेल्या लोकांनी वैद्यांच्या सल्ल्याने तिचे सेवन करावे. तसेच अती सेवन केल्यास पित्त वाढू शकते.

अशी आहे चिंच वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती


अर्जुन वनस्पती Arjun plant information in Marathii

 अर्जुन वनस्पती
Arjun plant information in Marathi
अर्जुन वनस्पती  Arjun plant information in Marathi


संस्कृत भाषेतील नाव: 

अर्जुन, धनंजय, अर्जुन सादडा, ककुभ, क्षीरस्वामी, सर्पन, शक्रतारू, देवसाल,

मराठी नाव : अर्जुन, ऐन

इंग्रजी नाव: The White Murdan Tree.

लॅटिन नाव:  Terminaliya Arjuna

हिंदी नाव:  कोह, नदीसर्ज, ककुभ

वर्ग : म्याग्नोलियोफाईटा,

कुळ : Combretaceae

वंश : Terminalia

आढळणारे देश

भारतीय उपखंड. भारत देशात हिमालय पर्वत, मध्य भारतीय पठार, सह्याद्री पर्वत ज्या ठिकाणी सदाहरित झाडे आहेत अशा अनेक ठिकाणी अर्जुन वृक्ष आढळतो.

उंची : हा वृक्ष ६० ते ८० फुटापर्यंत वाढतो.

पाने

साधे पान या प्रकारात या झाडाची पाने येतात. लंबवर्तुळाकार मध्यभागीं शिरा असणारी पाने असतात.

खोड

अर्जुन वनस्पती  Arjun plant information in Marathi


या झाडाचे खोड साल पांढरट रंगाचे असून आतील बाजूस गुलाबी रंगाची असते. आतील लाकूड हे जाड असते.

फुले :

अर्जुन वनस्पती  Arjun plant information in Marathi


मार्च ते जून म्हणजे वसंत ऋतूत या झाडाला मोहोर येतो. पिवळसर रंगाची फुले लागतात.

फळे

या वृक्षाची फळे जेवणखोलीतील रवीच्या पुढील शीरचक्रासारखी असतात. त्याला अनेक शिरा असतात.

कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर लाल रंगाची असतात.



 


साल : वर्षातून एकदा या वृक्षाची साल गळून पडते. वरून पांढरट आतून लालसर असते. या सालीचे चूर्ण उपयुक्त आहे. ज्याचा वापर आयुर्वेदिक औषधे बनवताना करतात.

अर्जुन वनस्पती  Arjun plant information in Marathi


• स्वाती नक्षत्राचा हा आराध्य वृक्ष आहे.

• या वृक्षाच्या अवयवात ( सालीत) कॅल्शियम, म्याग्नेशियम, अँटीऑक्साईडेंट, अँटीइन्फ्लेमेंटरी, हे गुणधर्म असतात.

चव : तिक्त, कडू, कासाय रसयुक्त आहे.

अर्जुन वृक्षाचा औषधी उपयोग :

अर्जुन वनस्पती  Arjun plant information in Marathi


• अर्जुन वृक्षाची साल ही अत्यंत उपयुक्त औषधी आहे. या सालीचे चूर्ण यासाठी वापरतात. सालीमध्ये अँटीऑक्साईडेंट, अँटीइन्फ्लेमेंटरी, गुणधर्म असतो चवीला कडवट लागते. मात्र हृदयरोग, टिबी, सर्दी, खोकला, यावर उपयुक्त आहे. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

• अर्जुन वृक्षाची साल असते त्यापासून पाणी घालून काढा बनवला जातो. ज्याच्या सेवनाने ब्लॉक झालेल्या नसा रिकाम्या होतात. व हृदय बळकट होते. हाडे मजबूत होतात.

• चेहऱ्यावरील मोड्या सुरकुत्या घालवण्यासाठी अर्जुन सालीची पेस्ट वापरतात. तसेच स्कीन क्रीम मध्ये वापर करतात.

• पोटातील अल्सर म्हणजेच अंतर्गत जखमा बऱ्या करण्याचे काम अर्जुन वृक्षाची साल करते.

• कोलेस्टेरॉल नियंत्रित करुन हृदय मजबूत करते.

• रक्तपित्ताचा त्रास कमी करण्याचे काम अर्जुनसालीचे चूर्ण करते.

• अस्थमा कमी करण्यासाठी अर्जुन साल उपयुक्त आहे.

• सालीचे चूर्ण मधासवे घ्यावें.

• हाड मोडले असेल तर सालीच्या चुर्णाचा हळद, मीठ व भिजवलेल्या तांदळाची वाटून पेस्ट करून लावल्यास हाड जोडीस मदत होते.

• अर्जुन वृक्षापासून कही होमिओपॅथीक औषधे देखील तयार केली जातात. अर्जुना टीचर असे म्हणतात.

• अर्जुन वृक्षाच्या फुलांचा वापर करून नेत्रांजन बनवले जाते. जे डोळ्यांचे आरोग्य चांगले राखते.

• अर्जुन वृक्षाच्या सालीपासून अर्जूनासव, अर्जूनारिस्टा ही आयुर्वेदिक औषधे बनवली जातात.

अर्जुन वनस्पती  Arjun plant information in Marathi


• अर्जुन वनस्पतीचा चिक हा बल्यवर्धक व पौष्टिक असा आहे.

• अर्जुन सालीचे चूर्ण हे दुधासवे खाणे फायदेशीर असते.

* वरील औषधी महिती उपयुक्त आहे. पण एखाद्या चिकिस्तक वैद्यांच्या सल्ल्याने  फायद्याचे असते.

अशी आहे अर्जून वृक्षाची माहिती.


अंजन वनस्पती

 अंजन वनस्पती

अंजन वनस्पती


वनस्पतीशास्त्रीय नाव :

 हार्डविकिया बायनाटा. (Hardwickia binataroxlo

कुळ : caes alpinaceae

संस्कृत भाषेतील नावअंजन

हिंदी नाव: अंजन, इरुला, कराची.

मराठी नाव : अंजन

कन्नड नाव : कम्मारा,

मल्याळम व तमिळ नाव : आचा.

तेलगू : येपी.

आढळ:

• अंजन हा वृक्ष भारतीय उपखंडात सर्वत्र आढळतो. विशेषत भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, आदी.

 * हा वृक्ष शुष्क पानझडी अरण्यात आढळणारा आहे. उथळ वालुकामय तसेच खडकाळ जमिनीत भेदून लांबपर्यंत मुळे सोडतो. त्यामूळे जास्त काळ टिकून असतो. भारत देशात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पश्चीम बंगाल या राज्यात आढळतो.

अंजन वनस्पती


उंची: हे झाड १५ ते २५ मीटर उंच आहे.

खोड

मजबूत जाड वरील साल भेगाळलेली खडबडीत असते.

अंजन वनस्पती


पाने

अंजन वनस्पती


आपट्याच्या पानासारखी संयुक्त व द्विदल असतात. अंजन व कांचन वृक्ष एकसारखा दिसायला असतो. पण अंजन वृक्षाची पाने सुटी असतात. तर कांचन वृक्षाची जोड असणारी घडी होतात. ही जनावरांना चारा म्हणून वापरतात.

अंजन वनस्पती


फुले

अंजन वनस्पती


नाजूक छोटी पिवळ्या रंगाची असतात.

फळे

अंजन वनस्पती


या वृक्षाला शेंगा लागतात. त्या चपट्या असून दोन्ही बाजूला निमुळत्या असून तळाला एक बी असते.

लाकूड

अंजन वनस्पती


या झाडाचे लाकूड तांबडे, कठीण व जड असते.

हंगाम

या झाडाची पाने एप्रिल मध्ये झडतात. व ऑगस्ट मध्ये नवी पालवी फुटते. ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये फुलतात व फळे लागतात. व ती फळे जास्त काळ टिकतात.

उपयोग :

या झाडाच्या सालीपासून बळकट दोर बनवले जातात. झाडाच्या पानात ९%प्रथिने असतात. त्यामूळे जनावरांना चारा म्हणून वापरतात. लाकूड टिकावू व कठीण असल्याने इमारत बांधकाम, शेती अवजारे, चाके, जळण व कोळसा निर्मिती साठी केला जातो.


• अंजन वृक्षाचा औषधी उपयोग:

अंजन वृक्षाचा डिंक, मूळाचा चिक, पानांचा रस यांचा वापर गुप्त रोगावर केला जातो.


अशी आहे अंजन वनस्पतीची माहिती.


गवती चहा ( Lemon grass)

 गवती चहा ( Lemon grass)

गवती चहा ( Lemon grass)


संस्कृत भाषेतील नावसुगंध भुतृण, अग्याघास,

हिंदी नाव: गंधबेना.

सिंधी नाव : हरिचाय.

बंगाली : गंधतृण.

इंग्रजी भाषेतील नाव : Lemon grass.


इतर नावे : 

अर्काला, ऑईल ऑफ व्हर्बेना/ इंडियन मेलिसा ऑईल.

गवती चहा ( Lemon grass)


गवती चहा मध्ये असणारे घटक

 व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १, बी २, बी ३, बी ५, बी ६, व्हिटॅमिन सी, मिनरल्स, कॅल्शियम, पोटॅशियम,झिंक, कॉपर, म्याग्नेशियम, आयर्न, म्यांगेनिज हे घटक असतात.

गवती चहा मध्ये असणारे गुणधर्म : 

गवती चहा उष्ण, ज्वरघ्न, उत्तेजक, स्वेद जनक, मूत्रजनन, वायुनाशी, चेतना कारक, संकोच विकास प्रतिबंधक आहे.

गवती चहा ( Lemon grass)


वापर कसा करतात :

गवती चहाची पाने ओली किंवा सुकवून त्यापासून चहा बनवून किंवा काढा करुन तसेच गवती चहा पासून तेल बनवून वापर करतात.

• गवती चहाची पाने उकळत्या पाण्यात टाकून उकळा व गाळा त्यात थोडा मद टाकून सेवन करावा.

  • गवती चहा वनस्पतीची आयुर्वेदिक औषधी उपयोग 

गवती चहा ( Lemon grass)


• गवती चहा मध्ये सायट्रस असते त्यामुळे पचनक्रियेस मदत करते. त्यामुळे जेवणानंतर घेतात. यामुळे पोटदुखी असेल तर थांबण्यास मदत होते. तसेच गवती चहाची वाफ घेणे फायद्याचे असते.

• गवती चहा घेतल्याने पित्त, जळजळ, गॅस एसिडेटी होत नाही.

• शरीराचे डेटॉक्सीफिकेशन करण्यासाठी गवती चहा उपयुक्त होतो.

• युरेटिक गुणधर्म असल्याने शरीरातील अपायकारक घटक बाहेर फेकले जातात. व किडनी व लिव्हर कार्यक्षम व निरोगी बनवण्यासाठी गवती चहा उपयुक्त आहे.

• उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उपयोगी गवती चहा पडतो.

• गवती चहा मध्ये पोट्याशियम असते. युरेन प्रोडक्शन वाढवून रक्ताभिसरण क्रिया चांगली करते.

• चयापचय क्रिया वाढवते व अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी गवती चहा उपयुक्त होतो.

• गवती चहाने अन्नातून गेलेले फॅटीक एसिडचे डिटॉक्सीफिकेशन होऊन त्याचे नियंत्रण रहाते व डायबिटीस कमी करण्यासाठी मदत होतो.

• निद्रानाश होत असेल, रात्री अपरात्री झोप लागत नसेल तर गवती चहा सेवन करावा त्याने फायदा मिळतो. यासाठी रात्री जेवणानंतर घ्यावा.

गवती चहा ( Lemon grass)


• व्हिटॅमिन ए व सी असल्याने त्वचेचे रक्ताभिसरण वाढवतो. त्यामूळे त्वचा सुंदर होते. तसेच केसांचे आरोग्य सुधारते.

• ताप, सर्दी, पडसे तसेच आकडी येणे अशा समस्या असल्यास गवती चहा घ्यावा.

• शरीराचे स्नायू दुखत असतील, तसेच अंगदुखी असेल तर गवती चहा पासून बनवलेल्या तेलाने मालिश करावे फायदा होतो.

गवती चहा ( Lemon grass)


  • गवती चहाचे तोटे :

• गवती चहाचे अती सेवन केल्यास सुस्ती मारते.

• गर्भवती स्त्रियांनी तसेच स्तनदा मातांनी गवती चहाचे सेवन टाळावे.

• एखाद्या व्यक्तीस आलर्जी असेल तर गवती चहा पिऊ नये.

• विशेषत तोट्यापेक्षा फायदे जास्त गवती चहाचे आहेत.

गवती चहा ( Lemon grass)


• अशी आहे गवती चहा वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती.

• Lemon grass information in Marathi


कढीपत्ता वनस्पती विषयी माहिती Curry leaves tree information in Marath

 कढीपत्ता / कडीपत्ता वनस्पती विषयी माहिती
Curry leaves tree information in Marathi

मराठी नाव : कढीपत्ता /कडीपत्ता 

हिंदी नाव: 

कडीपट्टा, मिठा निंब

वैज्ञानिक नाव: 

 मुराया कोएनिगी.

स्थान

दक्षिण आशिया खंडात भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, चीन,

रचना

हे एक छोटेसे झुडपी रोप आहे. पाच ते सात फूटापर्यंत या वृक्षाची वाढ होते. याच्या पानांचा विशेषत आहारात वापर केला जातो.

• याला लहान मेंदी सारखी पाने असतात, पानांना एक कडवट सुगंधी वास असतो. एक छान चवदार स्वरूप पानांचे असते. दोन्ही बाजुस निमुळती मध्यभागीं फुगीर अशी पाने एका दांडीला येतात.

• याला छोट्या आकाराची फळे गोलाकार गोटी सारखी येतात. यापासून मिळणाऱ्या आतील बियातून बीज प्रसार होतो.

कढीपत्ता वनस्पती विषयी माहिती  Curry leaves tree information in Marath


कढीपत्त्याचे औषधी उपयोग :

• डोक्यात कोंडा होत असल्यास कडीपत्याच्या पानांचे चूर्ण करून ते दह्यात भिजवून लावावे. व थोड्या वेळाने केस धुवावेत. डोक्यातील कोंडा कमी करतो. तसेच केस काळे राहतात. पांढरे केस कमी होण्यास मदत करते.

• कडीपत्त्या मध्ये आयर्न म्हणजेच लोह हा घटक असतो. याचा आहारात उपयोग नियमित केल्यास शरीरात आयर्न घटक वाढण्यास मदत होते.

• पचन शक्ती वाढवण्याचे काम कडीपत्याने होते.

• कडीपत्त्यात डायकलोरोमिथेन, एथिलीन हा घटक असतो जो कलोरेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. ज्यामुळे शरीरातील बॅड क्लोरेस्टेराल कमी करते. व चांगले कलोरेस्टेरोल वाढवते.

कढीपत्ता वनस्पती विषयी माहिती  Curry leaves tree information in Marath


• कडीपत्त्यात ट्यानीन, कार्बाजोल अल्कलाईन तत्व हे लिव्हरची कार्यक्षमता वाढवते. लिव्हर निकामी होऊ देत नाही.

• कडीपत्त्यात असणारा हायपोग्लासेमिक घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. त्यामूळे मधुमेह रोग असलेल्या लोकांनी कडीपत्ता आहारात ठेवणे लाभकारी असते.

• आनिमिया म्हणजे पांडूरोग यावर कडीपत्ता गुणकारी आहे. जो शरीरात लोह वाढवतो.

• कडीपत्त्यात लोह, कॅल्शियम, वेनेडियम , मिनरल, असते. जे रक्त वाढीस मदत करते.

• जुलाब होत असल्यास कडीपत्ता सेवन करने लाभकारी असते.

• हृदयाशी संबंधित आजारात कडीपत्ता उपयोगी पडतो.

• केमोथेरपी, रेडिओथेरपीमुळे झालेली शरिराची झीज भरून काढण्यासाठी कडीपत्ता सेवन करावा त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करते.

• अँटी आक्सिडेंट हा घटक कडीपत्यात असल्याने शरीरात कफ साचत नाहीं. व त्यामुळे कडीपत्ता चूर्ण घेवून ते दोन -चार दिवस एक चमचा मध घालून सेवन करने लाभकारी असते. त्यामुळे कफ कमी होतो व खोकला बरा होतो.

• ल्याक्टीक असिड असल्याने अपचन समस्या दूर करण्यास मदत कडीपत्ता करतो.तसेच पित्त दोष निवारण करतो.

• कडीपत्यात अँटीईन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने शरीरातील सूज कमी करतो, सांधे दुखी,, जॉइंट पेण होत असेल, आर्थरायटीस समस्येत कडीपत्ता गुणकारी आहे.

• ज्याव्यक्तीस थकवा, मळमळ, उलटी आशा समस्या असेल तर आपण कडीपत्ता नियमित सेवन करने लाभदायक आहे.

• व्हिटॅमिन ए कडीपत्यात असल्याने ते डोळ्याचे आरोग्य सुधारणेस मदत करते.

कढीपत्ता वनस्पती विषयी माहिती  Curry leaves tree information in Marath


• चेहऱ्यावर कडीपत्याचे तेल लावल्यास त्वचेवर येणारे मुरम (पिंपल्स) कमी करण्याचे काम कडीपत्ता करतो.

• सुर्या पासून निघणार्या अल्ट्राव्हायोलेट किरणामुळे त्वचेचे नुकसान होते त्यावर कडीपत्ता तेल गुणकारी असते.

• कडीपत्यात जीवनसत्व अ, बी, सी, इ जीवनसत्व असते.

• खोबरेल तेलात कडीपत्याच्या पानांचे चूर्ण घालून ते उकळून ते तेल केसांना लावल्यास केसांना भक्कमपणा येतो.

• कढीपत्त्याच्या पानांचा रोजच्या आहारात वापर करतात. यासाठी वेगवेगळ्या भाज्या, आमट्या बनवताना फोडणीत कडीपत्ता वापरतात.

• चटणी मिसळताना कडीपत्ता वापरला जातो.

• कडीपत्त्यापासून टॉनिक देखिल बनवले जाते.

कढीपत्ता वनस्पती विषयी माहिती  Curry leaves tree information in Marath

• कडीपत्ता सेवन केल्याने साईड इफेक्ट काही होत नाहीत. मात्र गरोदर अवस्थेत याचे सेवन मर्यादित करावे.

• अशी आहे कढीपत्ता वनस्पतीची माहिती

Curry leaves tree information in Marathi

हळद वनस्पतीचे औषधी गुणधर्म Turmeric plant medical information in Marathi

 हळद वनस्पतीचे औषधी गुणधर्म

Turmeric plant medical information in Marathi

हळद वनस्पतीचे औषधी गुणधर्म  Turmeric plant medical information in Marathi

मराठी नाव : हळद

हिंदी नाव : हलदी,

इंग्रजी भाषेतील नाव : Turmeric

कन्नड नाव : अरसिनी,

आयुर्वेदिक संस्कृत भाषेतील नाव : हरिद्रा.

लॅटिन नाव : करक्युमा लौंगा.(Curcuma longa)



• हळद ही एक पिकवर्गीय वनस्पती आहे. जिचे उत्पादन चार ते सहा महिण्यात घेतले जाते.

• भारत देशात फार प्राचीन काळापासून हळदीची लागवड, उत्पादन घेतले जाते.

• या वनस्पतीची लागवड खोडापासून केली जाते.

• रुंद पाने दोन्ही बाजुस निमुळती व मध्यभागीं फुगीर असतात.

• जमिनीत मुळाला लागलेल्या लांबट दांड्या सारखे आल्याप्रमाणे खोड म्हणजे हळकुंड होय. या पासून हळद तयार करतात.

• रंग : पिवळा , तसेच पांढरा सुद्धा आहे.

हळद वनस्पतीचे औषधी गुणधर्म  Turmeric plant medical information in Marathi


हळदीच्या जाती : १) पांढरी हळद, २) पिवळी हळद, ३) काळी हळद, ४) आंबे हळद.

हळदीचे औषधी गुणधर्म:

• हळदीमध्ये करीक्युमिन नावाचा घटक असतो. जो शरीराच्या आतील भागात आलेली सूज, इन्फेक्शन कमी करण्याचे काम करतो.

• शरीरात उष्णता वाढून आतील भागात जखमा झाल्या असतील तर त्या बरे करण्यासाठी आहारात हळद घेणे उपयुक्त आहे.

• हळद ही अँटी ऑक्साईड असल्याने कॅन्सरच्या रोगात वाढणाऱ्या कोशिकांचा रक्त पुरवठा थांबवून त्यांवर मात करण्याचे काम हळद करते.

हळद वनस्पतीचे औषधी गुणधर्म  Turmeric plant medical information in Marathi


• वया नुसार मेंदूच्या स्मरण शक्ती वर परिणाम होतो. स्मृती विस्मरण होते. त्यावर उपाय हळद आहे. हळदीने मेंदूची स्मरणशक्ती वाढते. तसेच मेंदूचे आरोग्य चांगले राहते.

• रक्तातील ब्याड कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम हळद करते. हळदी मुळे रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामूळे ब्लडप्रेशरचा त्रास कमी होतो.

• जंक फूड तसेच अपायकारक पदार्थांमुळे शरीरात अपायकारक घटक लिव्हर मध्ये वाढल्यास ते काढून टाकण्याचे काम हळद करते.

• शरीरावर बाह्य भागावर दुखापत होऊन जखमा झाल्यास त्यावर हळद लावतात. त्यामुळे जखम बरी होण्यास मदत होते.

• डोके दुःखीचा त्रास असेल तर नियमित आहारात हळद घेतल्यास फायदा होतो.

• हळद ही त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करते. चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या घालवणे तसेच त्वचा निरोगी राखण्यासाठी हळद ही इतर सौदर्य प्रसाधने यामध्ये घालुन शरीरावर लावतात. त्याने त्वचेचे आरोग्य सुधारते.

• हाडांचा कमकुवतपणा त्यामूळे जॉइंट पेन होते. शरीराच्या वेगवेगळ्या भागातील सांध्यांचे दुखणे तसेच स्नायू दुःखी यासाठी हळद तेलाची मालिश उपयुक्त आहे. तसेच हळद ही दुधातून घेतल्यास हाडाच्या बळकटी सोबत ती हाडे निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.

• व्हायरस मुळे शरीरास संसर्ग झाल्यास हळद आहारात घ्यावी. त्यातील करीक्युमिन मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.ती आरोग्यवर्धक आहे.

• खराब कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम हळद करते.

• मासिक पाळीत पोट दुःखी होते. तेव्हा स्त्रियांनी हळद आहारात घ्यावी.

• सर्दी , पडसे, खोकला याने त्रस्त असल्यास हळद घातलेल्या मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे आराम मिळतो. खोकला असल्यास हळद बोटाच्या चिमटीत धरून घशा जवळ असणार्या लोंबनाऱ्या जिभेला लावावी l खोकला कमी होण्यास मदत होते.

हळद वनस्पतीचे औषधी गुणधर्म  Turmeric plant medical information in Marathi


हळदीचे सेवन कसे करावे?

• रोजच्या जेवणात एक अर्धा चमचा तरी आपल्या घरी जेवणं बनवताना हळद वापरावी.

• हळद व काळी मिरी एकत्र सेवन केल्यास पचन संस्था सुधारते. व्हायरस नष्ट होऊन आजार बरे करण्यास मदत करते.

• एक कप पाण्यात एक चमचा हळद टाकून ते पानी उकळून पिणे लाभकारी असते.

• दुधातून हळद टाकून घेतल्यास स्नायू व हाडांचे आरोग्य सुधारते.

• घसा दुःखी असेल तर हळद मीठ , पाणी एकत्र कोमट करुन गुळण्या करने लाभदायक असते.

• बाह्य शारीरिक जखमांवर हळद लावल्यास जखमा बऱ्या होतात.

• हळद ही विशेषत जेवणात , लोणची, मसाले चटणीत मिसळताना वापरतात.

हळदीचे तोटे:



• हळदीचे जास्त सेवन केल्यास पोटात जळजळ होऊ शकते.

• हळदीचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास शरीरातील मुतखडा निर्माण करणारे क्षार एकत्रित करण्यास हळद मदत करते. त्यामुळे मुतखड्याची समस्या असलेल्या लोकांनी हळदीचे मर्यादित सेवन करावे.

• ज्यांच्या शरीरात लोह म्हणजे आयर्न हा घटक कमी आहे. त्या लोकांनी हळदीचे सेवन मर्यादित करावे. कारण लोह या घटकावर हळदीचा परीणाम होतो. त्यामूळे आयर्न कमी असलेल्या लोकांनी हळदीचे मर्यादित सेवन करावे.

• हळद ही रक्त पातळ करण्यास मदत करते. त्यामूळे ब्लडप्रेशर असणाऱ्या व्यक्तीने मर्यादित हळद सेवन करावी. अती केल्यास रक्त जास्त पातळ होऊ शकते.

• वरील माहितीवरून असे समजते की हळदीचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक असते. पण ती मर्यादित असावी.

हळद वनस्पतीचे औषधी गुणधर्म

Turmeric plant medical information in Marath

मसाले वेलदोडे / बड़ी इलायची (Black Cardamom) – आयुर्वेदिक औषधीय जानकारी (हिंदी)

 🌿 मसाले वेलदोडे / बड़ी इलायची (Black Cardamom) – आयुर्वेदिक औषधीय जानकारी (हिंदी) 🔶 वेलदोडे (Cardamom) – Basic Information of Medicine 🔹...