शतावरीचे आयुर्वेदिक औषधी महत्व Shtavriche ausdhi upyog v mahtva लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शतावरीचे आयुर्वेदिक औषधी महत्व Shtavriche ausdhi upyog v mahtva लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

शतावरीचे आयुर्वेदिक औषधी महत्व Shtavriche ausdhi upyog v mahtva

 शतावरीचे आयुर्वेदिक औषधी महत्व

Shtavriche ausdhi upyog v mahtva

शतावरीचे आयुर्वेदिक औषधी महत्व  Shtavriche ausdhi upyog v mahtva


मराठी नाव : शतावरी , अश्वेल

हिंदी नाव : सतावर, सतावरी, सरनोई, शतावरी.

संस्कृत नाव : शतावरी, शतपदी, शतमूली, नारायणी, पिवरी, अतिरसा, तालमुली, एस्पैरागस कांचनकारिनी, सूक्ष्मपत्रिका, भीरु, ब्रह्मात्रा,

इंग्रजी नाव : Wild asparagus

शास्त्रीय नाव : Asparagus rassimosis .

शतावरीचे आयुर्वेदिक औषधी महत्व  Shtavriche ausdhi upyog v mahtva


• प्रकार दोन आहेत. :

2) विरलकंद शतावरी 2) कुंतपत्रा शतावर

• पाने : ही एक लहान रोप वर्गीय वनस्पती असून लहान आकाराची गडद हिरवी पाने टोकदार असतात.

• मूळ : अनंत मूळ रचना असणारी ही वनस्पती असून वरील रंग भुरकट असतो. मुळांवरील साल काढल्यास आतील भाग श्वेत म्हणजे पांढरा असतो. याचाच वापर औषधात मुख्यत्वे केला जातो.

• फुले : पांढऱ्या रंगाची असतात.

• फळ : कच्चे असताना हिरवे. पिकल्यावर लाल होते.

• गुण : गुरू, शीत, तिख्त, कडवट, मधुर रसयुक्त औषधी.

शतावरीचे आयुर्वेदिक औषधी महत्व  Shtavriche ausdhi upyog v mahtva
शतावरी 


शतावरीचे औषधी महत्व :

• अबालवृद्ध, स्त्री, पुरुष या सर्वांना उपयुक्त अशी औषधी आहे.

• झोप लागत नसेल तर शतावरी मुळांचे चूर्ण एक चमचा घेऊन ते कपभरदुधात शिजवून तूप घालून खाल्यास. झोप न येण्याची समस्या दूर होते.

• मधुर तिख्त गुणामुळे वात दोष दूर करते. शरिरातील कोरडेपणा व उष्णता दूर करते.

• आम्लपित्ताने पोटात, छातीत जळजळ होऊन दुखत असेल तर शतावरी उपयुक्त आहे.

• शतावरी रस, रक्त, वंश, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र, धातू पोषण करणारी असल्याने वार्धक्य गुण कमी करते. शरीर घटकांची झीज रोखते. त्वचा तरुण करते.

शतावरीचे आयुर्वेदिक औषधी महत्व  Shtavriche ausdhi upyog v mahtva


• वात, पित्त यामुळे शरीरातील घटक झीज होते. तसेच धावपळीच्या जीवनात दगदग, प्रवास यामुळे रोग, आजार यांनी शरीर क्षीण झाल्यास ती झीज भरून काढण्याचे काम शतावरी करते. तसेच गुडघे, हाडे यांची झीज भरुन काढण्यासाठी शतावरी मदत करते.

• शतावरी तणाव मुक्त करणारी आहे. सूक्ष्म पेशीबल वाढवते. बुद्धिवर्धक आहे. मज्जा, धातू , मेंदू पुष्टी करण्यासाठी व बुद्धी वाढवण्यासाठी शतावरी खाणे फायद्याचे असते.

• अग्निपुष्टी हा गुणधर्म असल्याने जठराग्नी वाढवून पचन शक्ती सुधारून पचनसंस्था सुधारते. अग्निवर्धक औषध उष्ण, तिख्त असतात. मात्र शतावरी मृदु, वृद्ध, दुर्बल, स्त्री, मुले, व्यक्ती यांची पचन संस्था नीट करते. स्निग्धता वाढवते कोरडेपणा घालवते. जेवणा आधी ताज्या मुळीचे सेवन करावे.

• डोळ्यांचे आरोग्य देखील शतावरी सुधारते.

• अतिसार झाल्यास, आतड्यात सूज आल्यास ती सूज दूर करण्याचे काम शतावरी करते. तसेच रक्तपित्त त्रास कमी करते.

शतावरीचे आयुर्वेदिक औषधी महत्व  Shtavriche ausdhi upyog v mahtva


• स्त्रियांसाठी फायदा :

गर्भाशय स्नायूंना बळ देऊन जे स्त्रीयातील विशिष्ट हार्मोन्स संतुलन राखण्यासाठी शतावरी खाणे फायद्याचे असते. म्हणून ती स्त्रियांची मैत्रीण आहे.

• बाळंतीण स्त्रीस दूध कमी असेल तर शतावरी देणे फायद्याचे असते. यामुळे दूध वाढते. बाळाचे पोषण चांगले होते. व स्त्रियांच्या हाडांची झीज भरून निघते. कंबरदुखी थांबते. रजोनिवृत्ती काळात स्त्रियांच्या छातीत धडधडणे, घाम येणे, उदास वाटणे, पाळी अनियमित होणे, केस गळणे, यावर उपयुक्त शतावरी आहे. सलग तीन महिने सेवन केल्यास रजोनिवृत्ती काळात स्त्रीयांना फायदा होतो.

• शतावरी वृश्य असल्याने स्त्री व पुरुष या दोघांना मुलबाळ होताना अडचण येत असेल तर शतावरीचे सेवन फायद्याचे असते. त्यामुळे गर्भधारणा होते. व टिकते.

• हृदयाची धडधड नियमित ठेवते. कोलेस्टेरॉल कमी करते.

• शतावरी ही चिरतारुण्य ठेवणारी संजीवनी आहे. शरीरावरील सुरकुत्या कमी करणारी, त्वचा तजेलदार करणारी औषधी आहे.

शतावरीचे आयुर्वेदिक औषधी महत्व  Shtavriche ausdhi upyog v mahtva


शतावरी सेवन कसे करावे :

• शतावरी मुळांची पावडर दुधातून जेवणाआधी घेणे फायद्याचे असते.

• बाजारात शतावरी गोळ्या, चूर्ण, रस, कल्प, अशा स्वरूपात उपलब्ध असते.

• मधुमेह असणाऱ्या लोकांनी कल्प घेण्यापेक्षा रोज एक कप दुधात एक कप पाणी मिसळून त्यात शतावरी एक चमचा घालून उकळून ते द्रावण एक कप करावे. व तो दुग्धपाक घ्यावा. फायदा होतो.

• शतावरी घृत म्हणजे गाईच्या तुपातून शतावरी घालून कडवलेले तूप. खाणे फायद्याचे असते.

• शतावरी तेलात घालून ते उकळून थंड केलेले तेल म्हणजे शतावरी सिद्ध तेल या तेलाने त्वचेचे मालिश केल्यास त्वचा तजेलदार बनते. व हाडे स्नायू मजबूत होतात.

• वृद्ध व्यक्तींना हाता, पायात गोळे येत असल्यास शतावरी सिद्ध तेलाने मालिश करावी. फायदा होतो.

शतावरीचे आयुर्वेदिक औषधी महत्व  Shtavriche ausdhi upyog v mahtva


• शतावरी सर्वांना उपयुक्त आहे.

• अशी आहे शतावरीया औषधी वनस्पतीची माहिती.

Shatavri che ausdhi upyog

• कोणतेही औषध आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.



नागरमोथा वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती (Nagarmotha Vanaspati – Ayurvedic Aushadhi Mahiti)

  🌿 नागरमोथा वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती ( Nagarmotha Vanaspati – Ayurvedic Aushadhi Mahiti) 🔹 मराठी नावे :  नागरमोथा, लव्हाळा, लव्हग...