दालचीनी या वनस्पतीची माहिती व औषधी उपयोगBenefit of cinnamon
• मराठी नाव : दालचीनी
• संस्कृत नाव : त्वाक,
• English name: cinnamon,
• शास्त्रीय नाव: cinnamomum verum.
• हे एक सदाहरित झुडूप आहे.
• उंची : १५ मिटर पर्यंत हे झाड वाढू शकते.
• झाडाचे प्रकार :
• १) Ceylon cinnamon २) cassia cinnamon,
• Ceylon या दालचीनीचा वापर जास्त प्रमाणात आयुर्वेदात केला जातो. Cassia या दालचीनी मध्ये क्युमेरिक नावाचा घटक असतो. त्याचे अती सेवन चांगले नसते.
• दालचिनी कशी तयार करतात?
दालचिनी ही सिन्यामन झाडाची साल असते. देठ कापून आतील लाकूड भाग कापला जातो. व् सालीच्या लहान पट्या काढल्या जातात. ज्या सुकवल्यास साध्या खापरी सारख्या दिसतात. त्याचा वापर किंवा त्याच्या चूर्णाचा वापर केला जातो.
• पाने : याची पाने देखील औषधी असतात. त्यांचा वापर मसाल्यात केला जातो. तमालपत्र असे संबोधले जाते .
• चव: तिखट गोड,
• दालचीनी मध्ये असणारे घटक:
• तसेच
२.४ %कार्बन, ६.४%कोलेस्टेरॉल, १.४%फायबर, ०%फॅट, ०.१९%प्रोटीन्स असतात.
* गुणधर्म : दालचीनी ही तिखट गोड,पाचक, मुत्रक, दिपन, स्तंभक, कफनाशक, यकृत कार्य सुधारक, मनःस्वास्थ्यक, स्मरण शक्ती वाढवणारी आहे.
• दालचीनी मध्ये अँटी ऑक्साइडंट घटक असतात. त्यामुळे हल्ली वातावरणीय प्रदूषण व त्यामुळे शरीरात घुसलेली प्रदुषक अपाय कारक घटक शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचे काम दालचीनी करते. यात ती इतर औषधात प्रथम क्रमांकावर आहे.म्हणून ती आहारात असणे गरजेचे आहे.
• वजन कमी करणारी असल्याने डायझेशन मध्ये दालचीनीचा वापर केला जातो.
• शरीरात वाढलेले बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तसेच गुड कोलेस्टेरॉल वाढवण्याचे काम दालचीनी करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच हृदयाची ताकद वाढवते. ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवते.
• शरीरातील साखर व ग्लुकोज पेशींना पुरवठा करणाऱ्या इन्सुलिनचे कार्य सुधारून हे इन्सुलिनची ताकद वाढवण्याचे काम दालचीनी करते. वाढलेले इन्सुलिन कमी तर कमी झालेले वाढवण्याचे काम दालचीनी करते.
• रक्तातील वाढलेली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपाशी पोटी दालचीनी घातलेले पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक असते. तसेच साखर वाढल्यास जेवणानंतर देखील दालचिनी घातलेले पाणी पिणे लाभदायक असते. ती रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करुन नियंत्रित करते. रोज घेतल्यास शुगर कमी होते. तसेच रक्तात असणारी साखर पेशी पर्यंत पोहोचवते.
• मेंदूतील कार्य बिघाड होऊन अल्झायमरचा त्रास सुरू होतो. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी दालचीनी घेणे लाभकारी असते. वेदनाशामक,तणावग्रस्त स्नायू, डोकेदुखी बरी करण्यासाठी दालचीनी खाणे चांगले असते. न्युरोप्रोटेक्टीव्ह गुणधर्म असल्याने मायग्रेन म्हणजे स्मृती विस्मरण दोष कमी करण्यास मदत करणारी दालचीनी खाणे फायद्याचे असते.
• कॅन्सर रोगात त्याच्या रोगकारक पेशी कमी करण्याचे काम दालचीनी करते.
• ब्याक्टेरिया मुळे झालेले फंगल इन्फेक्शन ,तसेच शरीरात झालेले इन्फेक्शन कमी करणारे घटक दालचीनी मध्ये असतात.पोटात एखादे इन्फेक्शन झाल्यास दालचीनी खाणे लाभदायी ठरते. Hiv सारख्या रोगात देखील दालचीनी प्रभावी असते.
• त्वचेचे आरोग्य सुधारण्याचे काम दालचीनी करते.
• दात दुःखी असेल तर दालचीनी पासून तयार केलेले तेल घ्या व त्यामध्ये कापसाचा बोळा बुडवून दुखर्या दातावर ठेवल्यास वेदना कमी होतात.
• मुख दुर्गंधी असेल तर दालचीनी चघळल्यास ती कमी होते.
• शरीरातील वेदना सूज, इन्फेक्शन, कमी करण्यासाठी दालचीनी वापरता. दालचीनी पाण्यात टाकून उकळून ते पाणी पितात.
• स्त्री रोग : महिलांच्या अंगावरून जाणे, गर्भाशय बिघाड दुरुस्ती तसेच बाळंतपण झाल्यानंतर गर्भाशय संकोच करून लवकर गर्भ धारणा होऊ नये म्हणून, तसेच दूध येण्यासाठी दालचीनी खाणे लाभदायक असते. लवकर गर्भ धरू नये म्हणून प्रसूती झाल्यावर महिनाभर दालचीनी खावावी.रोज एक तुकडा चगळावा.
• चेहऱ्यावर मोड्या येणे यासाठी आपण दालचिनीचे चूर्ण घेवून ते लिंबू रस घालून चेहऱ्यावर लावावे मोडया (मुरुमे) कमी येतात.
• थंडीच्या दिवसात डोकेदुखी झालेली असेल तर दालचीनी वाटून त्याचा लेप लावावा.
• दालचीनी आहारात कशी घ्यावी?
• रोज सकाळी दालचीनी पावडर पाण्यात टाकून ते पाणी उकळून प्यावे.
• लिंबू रस व दालचीनी पावडर तोंडाला लावून चेहर्याचे आरोग्य सुधारता येते.
• रोजच्या आहारात आपण मसाला म्हणून दालचीनी वापर करतो.
• दालचीनी वाटून लेप करून डोक्याला लावता येते.
• दालचीनी कोणी खावू नये?
• उष्ण गुणधर्म असलेल्या व्यक्तीने उन्हाळ्यात दालचिनी मर्यादित खावी.
• पित्त विकार वाढू शकतो.
• उष्ण प्रकृती असलेल्या व्यक्तींनी डॉकटरच्या सल्याने दालचीनी खावावी.
• असी आहेत
दालचीनी वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती Benefit of cinnamon





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.