सदाफुलीचे औषधी महत्त्व Sadaphuli che aushdi mahatva लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सदाफुलीचे औषधी महत्त्व Sadaphuli che aushdi mahatva लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

सदाफुलीचे औषधी महत्त्व Sadaphuli che aushdi mahatva

 सदाफुलीचे औषधी महत्त्व

Sadaphuli che aushdi mahatva

सदाफुलीचे औषधी महत्त्व    Sadaphuli che aushdi mahatva


• मराठी नाव: सदाफुली,संगखी, तिलोनी

• हिंदी नाव : सदाबहार, नयनतारा, बारहमासी,

• इंग्रजी नाव : Periwinkle Flower / vincarosea

• लॅटिन नाव: Lochnera Rosea

• संस्कृत नाव: सदाफुली


सदाफुलीचे औषधी महत्त्व    Sadaphuli che aushdi mahatva



• मूलस्थान : दक्षिण आफ्रिका येथील मादागास्कर,

• प्रकार : १) पांढरी सदाफुली, २) गुलाबी सदाफुली.

• हे एक लहान रोप आहे. घराच्या शेजारी बागेत, कुंडीत,तसेच परसबागेत याची लागवड केली जाते.


• पाने : पाने लहान व अंडाकृती आकाराची असतात.

सदाफुलीचे औषधी महत्त्व    Sadaphuli che aushdi mahatva


• फुले : या झाडाला रोज फुले येतात. लहान पोकळ दांडीवर पाच पाकळ्या असतात.


• फळे : लहान लहान शेंगा असतात. त्यामधे मोहरीच्या बारीक बियांप्रमाने बिया असतात.

सदाफुलीचे औषधी महत्त्व    Sadaphuli che aushdi mahatva


सदाफुलीचे औषधी महत्त्व:

• सदाफुली चे फुलांचा अर्क काढून मधुमेह रुग्नास देत राहिल्यास रक्तातील अतिरिक्त वाढलेली साखर नियंत्रित होते.

• तसेच सदाफुलीच्या मुळातील असणाऱ्या घटकामुळे ती मुळी व फुले यांना पाण्यात टाकून उकळून ते पाणी थोडे थोडे घेत राहिल्यास रक्तातील साखर नियंत्रित होते. तसेच तणाव कमी करते, रक्तदाब नियंत्रीत ठेवते. मुळे व साल वेदनाशामक असल्याने तिची पेस्ट करुन लावली जाते.

• शरीरात असणाऱ्या मूलाधार चक्राचे असंतुलन झाले की उदर (पोटाचे) तसेच पायाचे विकार उद्भवतात, प्यारालीसिस सुद्धा होऊ शकतो. त्यावर उपाय म्हणून या झाडाच्या फुलांचा रस सेवन करत राहिल्यास आपले हे चक्र संतुलित होते.

• मूळव्याध असेल तर सदाफुलीची पाने घेवून त्यांना चिरडून त्याचा चोथा जर मूळव्याध म्हणजेच बावासिरचे जागी लावत राहिल्यास ती समूळ बरी होण्यास मदत होते.

• वारंवार डोकेदुखी निर्माण होणे, झोप न लागणे, मानसिक तणावामुळे चिडचिड निर्माण होणे, यावर सदाफुलीची फुले घेवून उकळलेल्या पाण्यात टाका व दोन मिनिटे ठेवा नंतर ती काढून ते पाणी थंड करून प्या. तुम्हाला लाभ मिळेल. सदाफुलीच्या पानांचा मुरांबा करून रोज थोडा सेवन केल्यास शांत झोप लागते.

• चेहऱ्यावर डाग पडणे, फोड उठून त्यात पू निर्माण होणे, किंवा अंगावर कोठेही फोड उठणे यावर सदाफुलीची फुले घेवून त्यांना चिरडून लावल्यास किंवा पानासोबत फुले चिरडून लावल्यास फोड बरे होतात. व डाग ही जातात.

• तसेच ब्याक्टेरीय नाश करणारे गुणधर्म पानात असल्याने सदाफुलीची पाने चिरडून जखमेवर लावतात.

• एखादी मधमाशी चावली असेल, किंवा विंचू चावल्यावर व अन्य किडे कीटक चावल्यास सदाफुलीची पाने व फुले यांना वाटून लावल्यास आराम मिळतो.

• अंगाला खाज सुटली असेल तर सदाफुलीची फुले, पाने व कडुलिंबाची पाने सम प्रमाणात एकत्र घेवून त्यांना वाटून रोज दिवसातून तीन वेळा सकाळ, दुपार, संध्याकाळ लावत राहिल्यास असे काही दिवस लावल्यास खाज, खूजली कमी होण्यास मदत होते. बरी होते.

• सदाफुलीच्या दोन -चार फुलांना टाकून उकळलेले पाणी पिल्यास रक्तदाब कमी होतो.

• शरीरावर खरचटले व जखमा झाल्यास सदाफुलीच्या पानांचा रस लावा. बरे वाटेल.

• केस गळणे थांबविण्यासाठी सदाफुलीच्या पानांचा रस लावल्यास केस गळणे थांबते.

• सदाफुली वर संशोधन झाले आहे. कॅन्सर रोग बरा करण्यासाठी सदाफुली वापरतात. ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर रोगात सदाफुलीचा वापर केला जात आहे. तसेच कॅन्सर मध्ये केली जाणारी क्युमोथेरपी मध्ये सदाफुली औषध म्हणून वापरली जात आहे.

• मासिक पाळीत स्त्रियांना रक्तस्त्राव होताना त्रास होत असेल तर त्यांनी सदाफुलीची पाने गरम पाण्यात भिजत रात्रभर ठेवून त्या पानांचा अर्क काढून पिल्यास त्याचा लाभ होतो.

सदाफुलीचे औषधी महत्त्व    Sadaphuli che aushdi mahatva


सदाफुली वापरताना घ्यायची काळजी :

• सदाफुली आरोग्यदायी असल्याने सेवन करताना तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्याने तिचे सेवन करावे.

• जखमेवर लावताना, तसेच फोड उठल्यावर लावताना, व किडा चावल्यास लावताना कोणताही धोका नाही.

• या वनस्पती जवळ साप, विंचू सारखे प्राणी जवळ येत नाहीत. कारण ही विष प्रधान आहे. तिचे सेवन मर्यादित व तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे लाभकारी आहे.

• अशी आहे सदाफुली वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती


अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...