पिंपळ वृक्षाची औषधी माहितीPimpal tree information in marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पिंपळ वृक्षाची औषधी माहितीPimpal tree information in marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

पिंपळ वृक्षाची औषधी माहितीPimpal tree information in marathi

 पिंपळ वृक्षाची माहिती
पिंपळ वृक्ष माहितीPimpal tree information in marathi
पिंपळ वृक्षाची माहिती


स्थान :

हिमालय पर्वताच्या भागापासून ते कन्याकुमारी पर्यंत भारतात सर्वत्र आढळणारा वृक्ष म्हणजे पिंपळ या वृक्षाला अनन्य साधारण महत्व आहे.

उंची :

पिंपळ वृक्ष बहुवर्षीय असून तो १० ते १५ मीटर पर्यंत वाढतो.

• पिंपळाच्या झाडाची खोड पांढरट, गुलाबी व लालसर गुळगुळीत स्पर्शाची तंतुमय असते.

पाने :

• पिंपळाची पाने हृद्याकार असून त्यांचे देठ लांब असतात. कोवळी पाने ही दिसायला रेशमी गुलाबी रंगाची हळूहळू तांबूस होऊन नंतर हिरवीगार दिसतात.सुरवातीला येणारे अंकुर अनेक उपपर्णांनी झाकून जातात.

फुले व फळे :

पिंपळाची फुले ही हिरव्या रंगाची असून ती वाटोळी गोलाकार असतात. त्यामध्ये पुष्पाशय विकसित होते. ते पानाचा देठ तसेच फांदीच्या गेचक्यात विकसित होतात. त्यामध्ये काही नरपुष्पे तर काही मादिपुष्पे असतात. नरपुष्पे तीन पाकळीची तर मादीपुष्पे पाच पाकळीची असतात. यावर किडे भिरभिरतात व त्यामुळे परागसिंचन होऊन फळे लागतात.

• पिंपळाची फळे ही लहान नळीच्या आकाराची असतात जी पिकल्यावर पक्षी आवडीने खातात.



बिजप्रसार:

पक्षांनी खालेल्या फळातील बियांवरील आवरण त्यांच्या पोटातील उष्णतेने  गळून पडते. व ते ज्याठिकाणी विष्टा करतात तेथे पावसाळा सुरू झाल्यावर रुजतात. म्हणून पिंपळाची झाडे कधी भिंतीवर, कधी छपरावर तर कधी घरालगत उगवताना दिसतात.

 :पिंपळाच्या झाडाचे औषधी उपयोग 

• पिंपळाच्या झाडाची पाने ही बध्दकोष्टता, अतिसार तसेच रक्तासंबंधी समस्या दूर करतात.

• पिंपळाच्या पानातील तोडल्यानंतर येणारा दुधी स्त्राव डोळ्यात घातल्यास डोळेदुखी बरी होते.

• वेडाचे झटके येत असल्यास पिंपळाच्या कोवळ्या फांद्या उकळून ते पाणी पिल्यास वेडाचे झटके कमी होतात.

• पिंपळाच्या काड्या दंतमंजन ब्रश सारख्या वापरल्यास दात व हिरड्या मजबूत होतात.

• नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास पिंपळाच्या कोवळ्या पानांचे सेवन करावे जलद आराम मिळतो.

• पिंपळाची पाने वांझपणा कमी करण्यास मदत करतात.

• पिंपळ फांदीच्या टोकाचा भाग दुधात उकळून प्यायल्याने अपत्यप्राप्ती होते.

• पिंपळाच्या कोवळ्या पानांचा काढा पिल्यास त्वचा संवर्धन करतो.

पिंपळाची साल :

• पिंपळाच्या सालीत ट्यानिन रसायन असते. ते वेदना शामक आहे, तसेच जखमा भरण्याचे काम करते.

• पिंपळाची साल मधुर , शितल, कफग्न, रक्तसंग्राहक, गर्भस्थापक, मूत्रक असते. ती जखमा लवकर भरण्याचे काम करते.

• पिंपळ सालीचा रस २० ते ३० मिली. घेतल्यास खोकला बरा करण्याचे काम करतो.

• पिंपळाच्या सालीची पेस्ट जखमेवर किंवा कापलेल्या ठिकाणी लावल्यास ती बरी होण्यास मदत होते.

• पिंपळाच्या वाळलेल्या सालीची राख पाण्यात टाकून हे पाणी पिण्याने मळमळ, उलटी थांबते.

• पिंपळाच्या सालीचा रस कावीळ या रोगावर उपयुक्त आहे.

• पिंपळाची फळे सौम्य व रोचक असल्याने पोटाच्या समस्येवर उपयुक्त आहे.

• पिंपळाच्या वाळलेल्या फळाची बारीक पावडर मासिक पाळी झाल्यावर सलग १५ दिवस सेवन् केल्यास गर्भधारणा होण्यास मदत होते.

• पुरुषाने फळांची पावडर दुधातून रोज सेवन केल्यावर बळवृद्धी, वीर्यवृद्धी, पौरुषत्व वाढून नपुंसकता कमी होते.

• वाळलेल्या बिया मधासोबत खाल्यावर रक्तशुद्धी होते.


पिंपळ वृक्षाचे धार्मिक महत्त्व :

• हिंदू धर्मात पिंपळ वृक्ष ब्रह्मस्वरूप मानला जातो.

• भगवान श्रीकृष्णाने सत्याचा वृक्ष असे म्हंटले आहे.

• पिंपळाच्या मुळात ब्रह्मा मध्यभागी खोडात विष्णू व अग्रभागी शिव असतो.

• श्री विष्णू देवता पिंपळ पानात वास करतात.

• अथर्ववेद नावाच्या हिंदू ग्रंथात त्यास अश्वत्थ वृक्ष म्हंटले आहे.

• पुष्य नावाच्या नक्षत्राचा तो आराध्य वृक्ष आहे.

• या झाडाखाली मारुतीचा रहिवास आहे असे मानतात तो तोडणे पाप मानतात.

• हडप्पा कालीन नाण्यांवर पिंपळपानाची नक्षी आढळली असल्याने त्याचे प्राचीनत्व सिद्ध होते.

• बुद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती उरुवेला ( बुद्धगया) या ठिकाणी पिंपळ वृक्षाखाली झाली. म्हणून या वृक्षास तपवृक्ष देखील म्हणतात. बुद्ध धर्मात या वृक्षास धार्मिक महत्त्व आहे.

• बौद्ध भिक्षू पिंपळ सालीचा रस आपल्या वस्त्रांना लावतात व ती वस्त्रे वापरतात.

अशी आहे पिंपळ वृक्षाची माहिती


अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...