मसाले वेलदोडे (Black Cardamom) – आयुर्वेदिक औषधी माहिती (मराठी) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मसाले वेलदोडे (Black Cardamom) – आयुर्वेदिक औषधी माहिती (मराठी) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

मसाले वेलदोडे (Black Cardamom) – आयुर्वेदिक औषधी माहिती (मराठी)

 🌿 मसाले वेलदोडे (Black Cardamom) – आयुर्वेदिक औषधी माहिती (मराठी)

मसाले वेलदोडे (Black Cardamom) – आयुर्वेदिक औषधी माहिती (मराठी)


🔶 वेलदोडे (Cardamom) – Basic Information of Medicine

🔹 सामान्य परिचय

मराठी नाव : वेलदोडे, वेलची / मोठे वेलदोडे (Black Cardamom)

हिंदी नाव : बड़ी इलायची, काली इलायची / भूरी इलायची

इंग्रजी नाव : Black Cardamom / Greater Cardamom / Indian Cardamom

संस्कृत नावे :स्थूलैला, बृहदेला, भद्रैला, दिव्यगंधा, निष्कुटि इत्यादी

वैज्ञानिक (Botanical) नाव : Amomum subulatum Roxb.

कुल (Family) : जिंजिबेरेसी कुल (Zingiberaceae)

🔸 सूक्ष्म स्पष्टीकरण

इलायची हा मसाला दोन प्रकारांत मिळतो –

1. Elettaria cardamomum (हिरवी/लहान इलायची)

2. Amomum subulatum (Black Cardamom / मोठी किंवा काळी इलायची)

मसाले वेलदोडे (Black Cardamom) – आयुर्वेदिक औषधी माहिती (मराठी)


🌱 वनस्पती रचना (Plant Structure)

🌿 संरचना माहिती

पारिवारिक गट : Zingiberaceae (आले कुल)

प्रकार : सदाहरित, बहुवर्षिक शाकीय वनस्पती

🌿 खोड / मूळ

जमिनीखाली मूळखोड (Rhizome) असते. हे मूळखोड जाड, मांसल व विस्तृत असते.

याच राइझोममधून पाने व फुले उगवतात.

🌿 पाने

पाने लांबट, हिरवी, linear-lanceolate (तोफ्यासारखी) असतात.

🌸 फुले

लहान, फिकट हिरवी किंवा पिवळसर, कधी पांढऱ्या-व्हायोलिट छटेची फुले येतात.

🌰 फळ / बीज

फळे शेंगा (Pods) स्वरूपात येतात.

शेंगा साधारणतः तीन बाजूंनी त्रिकोणी असतात.

प्रत्येक शेंगेत अनेक काळी-तपकिरी बीजे असतात.

ही बीजे मसाल्याच्या व औषधी उपयोगासाठी वापरली जातात.

🔍 तुलना

Green Cardamom (Elettaria) पेक्षा

Black Cardamom (Amomum) च्या शेंगा मोठ्या, गडद रंगाच्या व धूर/कपूरयुक्त तीव्र सुगंध देणाऱ्या असतात.

🌾 जीवन माहिती (Life / Habitat / Growing)

🌱 नैसर्गिक निवास

पश्चिम घाट, भारतीय हिमालय, श्रीलंका व इतर उष्णकटिबंधीय प्रदेश.

मसाले वेलदोडे (Black Cardamom) – आयुर्वेदिक औषधी माहिती (मराठी)


☀️ आवश्यक अटी

उष्ण व आर्द्र हवामान

हलकी, सुपीक व किंचित ओलसर जमीन

सावली व योग्य आर्द्रता (Humidity)

🌿 वाढ व उत्पादन

राइझोममधून नवे तणे फुटतात

फुलांनंतर शेंगा तयार होतात

शेंगा वाळवून वापरात आणतात

पारंपरिक पद्धतीत धूर/आगीवर वाळवून खास सुगंध निर्माण केला जातो

🔸 Cardamom हा जगातील महागड्या मसाल्यांपैकी एक असून भारत, नेपाळ, भूतान इ. देशांत याची मोठी मागणी आहे.

🍛 वापर / उपयोग (Uses)

✨ पाककला

करी, भाजी, पुलाव, बिर्याणी, गरम मसाले यांत वापर

काही भागांत चहा किंवा मसाला-चहामध्ये वापर

🔥 गुणधर्म

कडू-तिखट

शरीरातील उष्णता वाढवणारे

मसाले वेलदोडे (Black Cardamom) – आयुर्वेदिक औषधी माहिती (मराठी)


🌿 आयुर्वेदिक औषधी गुणधर्म (Medicinal / Traditional Uses)

 खालील सर्व उपाय पारंपरिक लोकऔषधांवर आधारित आहेत.

• पोटात गॅस समस्या निर्माण होत असेल. तर मसाले वेलदोडे बिया आठ ते दहा जेवणानंतर खाऊन त्यावर कोमट पाणी प्यावे. गॅस अपचन समस्या दूर होते.

• हृदय रोग असेल, श्वास घेताना अडचण येणे. वेलदोडे जेवणानंतर अर्धा तासाने चावून खाणे. समस्या दूर होऊ लागते.

• कॅन्सर समस्या असेल तर बियांची पावडर एक ते दोन चिमट गरम पाण्यात टाकून जेवणानंतर एक तासाने घेत राहिल्यास कॅन्सर सेल्स सुरळीत होऊ लागतात.

• पुरुषात नामर्दी वाढत असेल. संभोग करताना अडचण येणे. यासाठी दोन ते तीन चमचे बियांची पावडर गरम पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ घेणे लाभकारी आहे.

• झोप येत नसेल व डोके जड झाल्यास मोठी वेलची चंदना प्रमाणे उगाळून डोक्यावर लेप लावल्यास फायदा होतो.

• पोटात गर्मी वाढल्यास तसेच रक्तात उष्णता निर्माण होऊन शरीरावर किस्तूड, फोड, पू वगैरे निर्माण झाल्यास जेवणाच्या अगोदर सकाळ संध्याकाळ आठ ते दहा दाणे चावून खा. फोड फुटून पस बाहेर निघून जाईल. किंवा ती बसून बरे वाटेल. व आराम मिळेल. रक्त साफ होईल.

• शरीरावरील फोडावर नारळ तेलात वेलची व बियांचे चूर्ण शिजवून ते तेल लावल्यास घाण निघून जाऊन रक्त शुद्ध होण्यासाठी मदत होते.

• तोंडाच्या आत फोड येणे, तोंड येणे. यासाठी मोठ्या वेलदोड्याच्या बिया चूर्ण व कोमट पाणी घेतल्यास आराम मिळतो.

• दात दुःखी असेल तर मोठ्या वेलदोड्याच्या बियांची पावडर गरम पाण्यात काढा करून गुळण्या केल्यास दात दुःखी कमी होण्यास मदत होते. किड दातातील निघून जाते.

• तोंडाचा वास येत असेल. तर वेलची खाणे फायद्याचे असते. दुर्गंधी दूर होते.

• उचकी लागत असल्यास मसाले वेलदोडा कुठून एक कप गरम पाण्यात उकळून ते द्रावण अर्धा कप करावे. व त्यात गुळ घालून खावे फायदा होतो.

• गरम थंड जेवण एकत्रित खाल्याने फूड पॉईझन झाल्यास मोठे वेलदोडे कुटून गरम पाण्यात उकळून ते पाणी थंड करून खडीसाखर टाकून पिल्यास पचन संस्था सुरळीत होते.

• लघवी मार्गात इन्फेक्शन झाल्यास, लागवीस त्रास होत असेल. जळजळ होत असेल तर एक तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून घ्या. त्यामध्ये वेलची बिया चूर्ण टाकून रात्रभर ठेवा. व सकाळी ते उठल्यावर पाणी प्या. लघवीस साफ होईल, अन् जळजळ थांबून, इन्फेक्शन दूर होण्यासाठी मदत होईल.

• स्वप्न दोष होत असेल तर वेलदोडा बियांचे चूर्ण एक ग्लास पाण्यात टाकून खडीसाखर घालून प्यावे. लाभ होतो.

• ताप आल्यास बियांची पावडर एक दोन चिमट खडी साखरेच्या पाण्यासोबत पित राहिल्यास ताप कमी होऊन त्याचे जंतू लघवी व संडास मार्गे निघून जाऊन ताप कमी होण्यासाठी मदत होते.

🌰 वापरात येणारे भाग

फळ / शेंगा (Pod) – मसाल्यासाठी

बीज (Seeds) – औषधी व स्वादासाठी

⚠️ सावधान

औषध म्हणून वापरताना प्रमाण व प्रकृतीनुसार आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पित्तदोष, पित्ताच्या गाठी असणाऱ्यांनी मोठा वेलदोडा टाळावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करावे.

🌿 निष्कर्ष

अशी ही मसाले वेलदोडे (Black Cardamom) विषयी सविस्तर आयुर्वेदिक औषधी माहिती.


मसाले वेलदोडे / बड़ी इलायची (Black Cardamom) – आयुर्वेदिक औषधीय जानकारी (हिंदी)

 🌿 मसाले वेलदोडे / बड़ी इलायची (Black Cardamom) – आयुर्वेदिक औषधीय जानकारी (हिंदी) 🔶 वेलदोडे (Cardamom) – Basic Information of Medicine 🔹...