दगडीपाला आयुर्वेदीक औषधी वनस्पती विषयी माहिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दगडीपाला आयुर्वेदीक औषधी वनस्पती विषयी माहिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

दगडीपाला आयुर्वेदीक औषधी वनस्पती विषयी माहिती

 दगडीपाला आयुर्वेदीक औषधी वनस्पती विषयी माहिती

दगडीपाला आयुर्वेदीक औषधी वनस्पती विषयी माहिती


नाव

दगडीपाला, हरळा, कंबरमोडी, बुगडी, टणटणी, कुटकुटी.

हिंदी नाव

परदेशी, घमरा.

संस्कृत नाव :

 संधान.

• ही एक गवताळ वनस्पती आहे.

पाने : 

ही एक गवतवर्गीय वनस्पती असून तिची पाने हिरव्या रंगाची व अनेक कोण असणारी दात्री असतात. व त्यांचा स्पर्श खरखरीत दगडा सारखा लागतो.

दगडीपाला आयुर्वेदीक औषधी वनस्पती विषयी माहिती


फुले : 

पानाच्या जवळील शेंड्याकडून बारीक हिरवे दांडे निघतात. व त्यावर पांढरट पिवळसर रंगाची दले असतात. व मध्यजागी पिवळसर कोश असतो. ज्याचे रूपांतर बिजात होत.

बिजांचा प्रसार : 

याच्या बिजांचा प्रसार एक तर हवेमार्फत होतो. किंवा गवात खाणाऱ्या प्राण्यांच्या विष्ठेतून होतो.

दगडी पाला वनस्पतीचे औषधी उपयोग :

दगडीपाला आयुर्वेदीक औषधी वनस्पती विषयी माहिती


• दगडी पाला हा आंटिसेप्टिक, आंटिफंगल, आहे.

• एखादी जख्म शरीराला झाली असता. व रक्त वाहन शरीराबाहेर होत असेल तर ते थांबवण्यासाठी दगडी पाल्याची पाने चेचून लावली जातात. यामुळे रक्तस्त्राव थांबतो. व जख्म आकसते. व बरी होते.

• मूतखडा झाल्यास दगडी पाल्याची पाने ओंजळभर सूर्योदयानंतर तोडून त्याचा रस काढावा. व तो सकाळी उपाशीपोटी प्यावा. असे सलग पांढरा दिवस करावे. मूतखडा गळून पडेल.

• जागरण झाल्यास, शरीरातील उष्णता वाढते. तसेच तोंड येणे, तोंडात फोड येणे अशा समस्या निर्माण होतात. तेव्हा दगडी पाल्याचा रस सल्लग दहा ते बारा दिवस घ्यावा. फायदा होतो.

• कंबर दुःखी, पाठ दुखी, गुडघे दुःखी असेल. तेव्हा दगडी पाल्याची पाने चेचून त्याचा रस काढून तो तेलात शिजवून ते तेल लावून मालिश केल्यास बरे पडते.

• कंबरदुखी व सूज आली असेल तर दगडी पाला वाटून लावतात. त्यामुळे सूज उतरते.

डेटॉल व आयोडीन पेक्षा जखम लवकर बरी करण्याची व निरोगी राखण्याचे काम दगडी पाला करतो

• दगडी पाल्याची फुले कुस्करून ती खोबरेल तेलात टाकून ते तेल म्हाका, आवळ्याची पाने घालून शिजवा. व गाळून ते तेल रोज आपल्या केसांच्या रोमांन म्हणजेच मुलांना लावल्यास फायदेशीर होते. केस काळे होतात. व निरोगी राहून वाढतात.

• फंगल इन्फेक्शन किंवा त्वचारोग झाल्यास दगडी पाल्याचा रस गोमूत्रात घालून लावत राहिल्यास फंगल इन्फेक्शन कमी होते.

• सोयर्यासीस, इतर त्वचारोगात गोमूत्र, पिवळा धोत्रा, करंज, चींच,कोरफड, झेंडूची पाने, दुधी वनस्पतीची पाने, सिसम वनस्पतीची पाने, दगडी पाल्याची पाने कणेरीची पाने समप्रमाणात घेऊन ती वाटून पंधरा दिवस भिजवून ठेवावी. व ते मिश्रण लावत राहिल्यास त्वचा रोग कमी होतो. बरा होतो.

• दगडी पाल्यात ट्यानीन,क्यारोटोनाईड, फलेवेनाईडस, सेंटाओरीन, बेरेंगेस असते.

• रक्तातील विषारी घटक काढून टकण्याची क्षमता असल्याने व प्रतिकार क्षमता वाढवत असल्याने दगडी पाल्याचा रस उपाशीपोटी घेतल्यास लाभ होतो.

• दगडी पाला हा कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतो. त्यामुळे त्याचे सेवन करतात.

मर्यादा :

• दगडी पाल्याच्या रसाच्या सेवनाने काही लोकांना अलर्जी होत असेल. तर त्यांनी त्याचे सेवन करू नये.

• गरोदर स्त्रियांनी दगडी पाल्याचा रस पिऊ नये.

• मधुमेह रुग्णांनी आयुर्वेदीक वैद्यांच्या सल्याने दगडी पाल्याचे सेवन करावे.

विशेषत कोणतीही वनस्पती औषधे सेवन करताना वैद्याचा सल्ला घ्यावा.

अशी आहे 

दगडीपाला आयुर्वेदीक औषधी वनस्पती विषयी माहिती

ayurvedikvanaspati.blogspot.com



अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...