बाबुळ झाडाचे औषधी महत्व
• मराठी नाव. : बाबुळ, हिवर.
• हिंदी नाव. : बबूल, कीकर
• संस्कृत नाव: बबूलः (Babulah)
संख्याह्व, पुत्रंजिव, रजनीगंधा (काही ग्रंथांत)
• लॅटिन / शास्त्रीय नाव: Vachellia nilotica (पूर्वीचे नाव: Acacia nilotica)
• पाने :
लाजरीच्या झाडासारखी अनेकपर्णी व लहान ,मऊ, पिसासारखी रचना
• फुले :
गोंड्यासारखी गोल, पिवळसर रंगाची लहान व गुच्छात उमलणारी
• खोड :
अत्यंत कठीण जाड व मजबूत तपकिरी किंवा काळसर रंगाचे
• फांद्या :
काटेरी स्वरूपाच्या बारीक पण मजबूत जोडाक्षरी काटे असलेले
• आढळण्याचे ठिकाण :
कमी पाणी असलेल्या भागात सहज वाढते. गर्म व कोरडे वातावरण असलेल्या प्रदेशात सर्वत्र आढळते. शेतात, माळरानावर, बांधावर नैसर्गिकरित्या उगवते भारतात विशेषत: उष्ण हवामान असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते
कोरडे, रुक्ष व वालुकामय जमिनीत उत्तम वाढ
🌿 • फांद्या :
बाबुळच्या फांद्या मजबुत, काटेरी आणि भुरकट काट्यांनी भरलेल्या असतात, स्पर्श झाला तर टोचून दुखतात, म्हणून झाडाजवळ जाताना सावधानता आवश्यक
पूर्वीपासून बाबुळची डहाळी दातून म्हणून वापरण्याची परंपरा
ताजी फांदी घेऊन दात घासणे दात व हिरड्यांसाठी अत्यंत फायदेशीर
वाळलेली फांदी असल्यास ती रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास सकाळी मऊ होते आणि त्यामुळे दातून सहज करता येते. यामुळे दात स्वच्छ राहतात, पिवळेपणा कमी होतो आणि हिरड्या मजबूत होतात
नियमित वापराने दातांचे एकूण आरोग्य सुधारते
• फळे :
लांबट शेंगा असतात. शेंगांमध्ये अनेक बीजकोश (सेल्स) असतात. प्रत्येक बीजकोश छोट्या-छोट्या गोल गाठीसारखा दिसतो. दिसण्यात कापसाच्या गेजा (वस्त्रासारखे) एकाखाली एक जोडलेले असल्यासारखे, शेंगांचा रंग साधारण हिरवा ते तपकिरी
औषधी महत्व असणारे भाग : फांद्या, शेंगा, पाने, साल, डिंक.
🌿 • पाने :
लाजरीसारखी अनेकपर्णी आणि लहान
तोंडात फोड, दातदुखी, तोंड येणे (इन्फेक्शन) यावर उपयुक्त
तोंडाला वास येणे (Bad Breath) कमी करते
हिरवी पाने चावून खावीत किंवा चावून थुंकावीत — यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होऊन हिरड्या मजबूत होतात आणि दात घट्ट राहतात
– पायरिया, दातांना येणारा वास आणि पिवळेपणा कमी करण्यास मदत
पानांची पावडर करून त्यात मीठ घालून दंतमंजन म्हणून वापरता येते
दातांचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत नियमित वापराने ७–८ दिवसांत फरक जाणवतो.
🌿 • शेंगा (फळे) :
शेंगांतील बिया काढून वाळवाव्यात, थोड्या गरम करून चेचून पावडर (चूर्ण) तयार करावे
हे चूर्ण रोज १ चमचा कोमट पाण्यात मिसळून जेवणानंतर १ तासाने घ्यावे
स्त्रियांच्या पाळीमध्ये होणारे जास्त रक्तस्राव, पांढरे पाणी, तसेच पाळीदुखी कमी करण्यास उपयुक्त
मूळव्याध, त्वचेवरील खाज, आणि इतर त्वचारोगांवर फायदेशीर
सांधेदुखी, हाडांचे दुखणे, कंबरदुखी, गुडघेदुखी यावर आराम देते
शरीरातील वेदना कमी होऊन उर्जा व ताकद वाढविण्यास मदत करते.
🌿 • डिंक :
बाबुळचा डिंक चिकट, गडद, काचेसारखा दिसणारा गोंद असून नैसर्गिक ऊर्जा वाढवणारा म्हणून प्रसिद्ध आहे
शरीरातील थकवा दूर करणे, शक्ती व ताकद वाढवणे, शरीर ऊर्जावान ठेवणे यासाठी उपयुक्त
यात कॅल्शियम व खनिजे (मिनरल्स) जास्त प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत
सांधेदुखी, हाडेदुखी, सांध्यांना सूज, वेदना कमी करण्यासाठी विशेष लाभदायक
सांध्यांमध्ये वंगण (लुब्रिकेशन) निर्माण करण्यास मदत होते
वात, पित्त, कफ दोष संतुलित करण्यास सहाय्यक
कोरडा खोकला, तोंड कोरडे पडणे, तोंड येणे यावर आराम देते
बाजारात डिंक क्रिस्टलसारख्या खड्यांमध्ये किंवा पावडर स्वरूपात मिळतो
स्वतः झाडाच्या खोडातून डिंक काढूनही वापरता येतो
हिवाळ्यात डिंकाचा वापर करून लाडू बनवले जातात, जे शरीराला उष्णता व बळ देतात
डिंक पाण्यात भिजवून मऊ करून गरम दूधासोबत, किंवा बारीक कुटून शुद्ध तूपात परतून खाल्ल्यास अधिक फायदेशीर, डिंकाचे खडे कँडीसारखे चघळून देखील खाता येतात.
बाभळीची साल – दात व जिभेसाठी फायदेशीर उपाय
• बाभळीची साल दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करते.
• दातातून रक्त येणे, दात हलणे आणि दातांची वाढ नीट न होणे यावर उपयुक्त.
• साल पाण्यात कुटून बारीक करून ते पाणी उकळा.
• पाणी अर्धे होईपर्यंत उकळा आणि कोमट झाल्यावर गुळण्या करा किंवा प्या.
• दिवसातून दोन वेळा केलेल्या गुळण्यांनी चांगला फायदा होतो.
• जिभेवरील पांढरा व पिवळा थर कमी होतो.
• साल वाळवून चूर्ण तयार करा आणि एक ग्लास पाण्यात घालून उकळा.
• पाणी अर्धे झाल्यावर कोमट अवस्थेत गुळण्या करा किंवा प्या.
• हा उपाय दात व हिरड्यांच्या विविध विकारांवर मदत करतो.
बाभळीच्या लाकडाचा उपयोग :
• बाभळीचे लाकूड कठीण असल्याने घरे बांधताना वापरतात.
• शेतातील औजारे तयार करण्यासाठी उपयोगी.
• इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
• बाभळीचा डिंक लाख तयार करणाऱ्या किड्यांचे अन्न असतो.
• तयार होणारी लाख रंग व विविध उद्योगांमध्ये वापरली जाते.
• यामध्ये Tyanin (टॅनिन) नावाचा घटक असतो, जो औषधी दृष्टीने महत्त्वाचा आहे.
• बाभळीची पाने जनावरांच्या खाद्यासाठी उपयोगात येतात.
औषधी उपयोग
• सर्दी-खोकल्यामध्ये उपयुक्त.
• कंबरदुखी, सांधेदुखीमध्ये आराम देते.
• संडास लागल्यास (अतिसार/सैल शौच) सुधारण्यासाठी बाभळीच्या शेंगांची पावडर मधासोबत घेतल्यास लाभ होतो.
• अबालवृद्ध – म्हणजे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण घेऊ शकतात.
असे आहेत बाभूळ वनस्पतीचे आयुर्वेदिक फायदे.
• कोणतेही औषध आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.
Babhul jhadache ausdhi upyog Marathi madhe.








