अंजन वनस्पती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अंजन वनस्पती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

अंजन वनस्पती

 अंजन वनस्पती

अंजन वनस्पती


वनस्पतीशास्त्रीय नाव :

 हार्डविकिया बायनाटा. (Hardwickia binataroxlo

कुळ : caes alpinaceae

संस्कृत भाषेतील नावअंजन

हिंदी नाव: अंजन, इरुला, कराची.

मराठी नाव : अंजन

कन्नड नाव : कम्मारा,

मल्याळम व तमिळ नाव : आचा.

तेलगू : येपी.

आढळ:

• अंजन हा वृक्ष भारतीय उपखंडात सर्वत्र आढळतो. विशेषत भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, आदी.

 * हा वृक्ष शुष्क पानझडी अरण्यात आढळणारा आहे. उथळ वालुकामय तसेच खडकाळ जमिनीत भेदून लांबपर्यंत मुळे सोडतो. त्यामूळे जास्त काळ टिकून असतो. भारत देशात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पश्चीम बंगाल या राज्यात आढळतो.

अंजन वनस्पती


उंची: हे झाड १५ ते २५ मीटर उंच आहे.

खोड

मजबूत जाड वरील साल भेगाळलेली खडबडीत असते.

अंजन वनस्पती


पाने

अंजन वनस्पती


आपट्याच्या पानासारखी संयुक्त व द्विदल असतात. अंजन व कांचन वृक्ष एकसारखा दिसायला असतो. पण अंजन वृक्षाची पाने सुटी असतात. तर कांचन वृक्षाची जोड असणारी घडी होतात. ही जनावरांना चारा म्हणून वापरतात.

अंजन वनस्पती


फुले

अंजन वनस्पती


नाजूक छोटी पिवळ्या रंगाची असतात.

फळे

अंजन वनस्पती


या वृक्षाला शेंगा लागतात. त्या चपट्या असून दोन्ही बाजूला निमुळत्या असून तळाला एक बी असते.

लाकूड

अंजन वनस्पती


या झाडाचे लाकूड तांबडे, कठीण व जड असते.

हंगाम

या झाडाची पाने एप्रिल मध्ये झडतात. व ऑगस्ट मध्ये नवी पालवी फुटते. ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये फुलतात व फळे लागतात. व ती फळे जास्त काळ टिकतात.

उपयोग :

या झाडाच्या सालीपासून बळकट दोर बनवले जातात. झाडाच्या पानात ९%प्रथिने असतात. त्यामूळे जनावरांना चारा म्हणून वापरतात. लाकूड टिकावू व कठीण असल्याने इमारत बांधकाम, शेती अवजारे, चाके, जळण व कोळसा निर्मिती साठी केला जातो.


• अंजन वृक्षाचा औषधी उपयोग:

अंजन वृक्षाचा डिंक, मूळाचा चिक, पानांचा रस यांचा वापर गुप्त रोगावर केला जातो.


अशी आहे अंजन वनस्पतीची माहिती.


अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...