कोथंबीर / हिरवे धने या वनस्पतीची औषधी माहिती. Kothambir / hirave dhane ya vanspati vishayi mahiti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कोथंबीर / हिरवे धने या वनस्पतीची औषधी माहिती. Kothambir / hirave dhane ya vanspati vishayi mahiti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५

कोथंबीर / हिरवे धने या वनस्पतीची औषधी माहिती. Kothambir / hirave dhane ya vanspati vishayi mahiti

 कोथंबीर / हिरवे धने या वनस्पतीची औषधी माहिती.

Kothambir / hirave dhane ya vanspati vishayi mahiti

कोथंबीर / हिरवे धने या वनस्पतीची औषधी माहिती.  Kothambir / hirave dhane ya vanspati vishayi mahiti


मराठी नाव : कोथंबीरी.धने

हिंदी नाव : हरा धनिया, धनिया

संस्कृत नाव : धन्यक / कुस्तुम्बरी

इंग्रजी नाव : Coriander

(पाने असतील तर: Coriander Leaves / Cilantro

बिया असतील तर: Coriander Seeds)

 सायंटिफिक नाव /शास्त्रीय नाव : :Coriandrum sativum

• पिकाची उंची

• कोथंबीरीचे रोप साधारण 30 ते 70 सेंमी उंच वाढते.

• योग्य हवामान व काळजी घेतल्यास झाड अधिक दाट व तजेलदार होते.

कोथंबीर / हिरवे धने या वनस्पतीची औषधी माहिती.  Kothambir / hirave dhane ya vanspati vishayi mahiti


🍃 पानांचा आकार

• खालची पाने रुंद, गोलसर व कापूसदार (खंडीत) असतात.

• वरची पाने बारीक, लांबट व पिसासारखी दिसतात.

• पाने हिरव्या रंगाची व सुगंधी असतात.

कोथंबीर / हिरवे धने या वनस्पतीची औषधी माहिती.  Kothambir / hirave dhane ya vanspati vishayi mahiti


🌼 फुले

• फुले लहान, पांढऱ्या किंवा फिकट गुलाबी रंगाची असतात.

• फुलोरा छत्राकृती (Umbel) प्रकारचा असतो.

• फुले येण्याचा काळ साधारण 45–60 दिवसांत येतो.

🌰 फळे

• फळे लहान, गोलाकार व सुगंधी असतात.

• सुरुवातीला हिरवी, नंतर पिवळसर ते तपकिरी रंगाची होतात.

• पूर्ण वाळल्यानंतर फळांना धने म्हणतात.

• प्रत्येक फळात साधारण २ बिया असतात.

• जेवण करताना सर्व पदार्थांत कोथंबीर घालतात. हे एक अन्नधान्य पीक असून. भारतात सर्वत्र याची लागवड केली जाते.

कोथंबीर / हिरवे धने या वनस्पतीची औषधी माहिती.  Kothambir / hirave dhane ya vanspati vishayi mahiti


• गुणधर्म :

चव कडू, गोड, तिख्त, उष्ण गुणाचे लघु गुण पचायला सोपे. स्निग्धता असल्याने आद्रता, ओलावा असतो. त्रिदोष निवारक आहेत. ( वात, पित्त, कफ) विकारावर प्रभावशाली हिरवे धने म्हणजे कोथिंबीर आहे.

कोथंबीर पिकाचे औषधी महत्व :

कोथंबीर / हिरवे धने या वनस्पतीची औषधी माहिती.  Kothambir / hirave dhane ya vanspati vishayi mahiti


• मूतखडा झाला असल्यास आपण कोथंबीर किंवा धणे बारीक कुटून अथवा पूड करून पाणी घालून पाच ते सहा मिनिटे उकळून घ्यावे. ते पाणी थंड करा सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना घ्या. आपल्याला बरे वाटेल.

• पोटात गॅस होणे ही समस्या असेल तर दोन कप पाण्यात जिरं, कोथंबीर, चहा पावडर व बडीशेफ आल्ले व थोडीशी साखर टाकून ते द्रावण चहाप्रमाणे उकळून घ्यावे, ते पिल्यानंतर पोटाची पचन यंत्रणा सुरळीत लागते. व गॅस समस्या दूर होते. तसेच खाल्लेले पचत नसेल, भूक लागत नसेल, सारखी तहान लागणे, पित्त होणे, मळमळ, उलटी, चिकट संडास होणे, मूळव्याध, पोटदुखी, जंताचा त्रास समस्या असेल त्यासाठी धने उपयुक्त आहेत. पित्त वाढल्याने उष्णता वाढते. अंगाची आग होणे, अंगावर रॅसेस येणे. लगवी गरम होणे, कमी होणे, लघवी करताना दुखणे, जळजळ होणे, त्यावर धने किंवा कोथंबीर खाणे लाभकारी असते. लघवी मार्फत सर्व उष्णता बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे.

• पोटात जंत वाढल्यास धने पूड चमचाभर मधात घालून चाटवल्यास मुलांना जंत त्रास कमी होतो.

• मोठ्या लोकांना पित्त त्रास असेल तर त्यांनी पाव चमचा धने पूड व खडीसाखर तेवढीच पाण्यासोबत घेतल्यास फायदा होतो.

• कफ विकारावर दम लागणे, खोकला यावेळी अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण व एक कप पाणी उकळून अर्धा कप करा. व थंड करून ते थोडे थोडे करून प्या लाभ होतो.

• अती आजारपण त्यावेळी खाल्लेली औषधे यामुळे उष्णता वाढते. तेव्हा चमचाभर धने पूड पाण्यात टाकून उकळून थंड केलेले पाणी रात्रभर ग्लास मध्ये भरून ठेवा व सकाळी ते पाणी प्या. उष्णता कमी होते.

• नाकातून रक्त येत असल्यास कोथंबीर, वीस ग्रॅम पाणी, कापूर, मिक्सरला बारीक करुन घ्यावे, तयार झालेला रस वस्त्रगाळ करून घ्यावा. त्याचे दोन दोन थेंब नाकात घालत राहिल्यास व कपाळाला चोळल्यास नाकातून रक्त येणे म्हणजेच गुन्हा फुटणे थांबते. व आराम मिळतो.

• डोळ्यांची जळजळ होत असल्यास बडीशेफ, साखर, धने सम प्रमाणात घेऊन ते बारीक करून त्याची पूड केल्यास व रोज जेवणानंतर सहा ग्रॅम खात राहिल्यास आपल्या डोळ्यांची व हातापायांची जळजळ कमी होते. थांबते.

• रक्तातील इन्सुलिन नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त धने असल्याने कोथंबीर अथवा धने रोजच्या आहारात खाणे फायद्याचे असते. तसेच रक्तातील उष्णता व इतर रक्त आजारात उपयुक्त धने पावडर आहे.

• व्हिटॅमिन ए व सी जास्त प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

• हिवाळ्यात अतिसार समस्या निर्माण झाल्यास कोथंबीर अन्नात समावेश करावा . पोटास आराम मिळतो.

• शरिरातील कोलेस्टेरॉल कमी करत असल्याने कोथंबीर आहारात असणे म्हणजे हृदय वाहिन्या मजबूत करण्यासाठी मदत करते.

• स्त्रियांना मासिक पाळीत त्रास होतो. अशावेळी अर्धा लिटर पाण्यात सहा ग्रॅम धने पूड व खडीसाखर मिसळून ते पाणी पिल्यास आराम मिळतो. व त्रास कमी होतो.

• व्हिटॅमिन ए व सी तसेच कॅल्शियम व मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असल्याने शरीरातील हिट, उष्णता, शरीरशुद्धी, बॉडी डेटाक्स करण्यासाठी उपयुक्त धने पाणी अथवा कोथंबीर खाणे फायद्याचे असते. आराम मिळतो.

• खोकला, तहान सारखी लागणे, ताप येणे, डोळे दुखी, उलटी येणे यावर उपाय म्हणून तसेच भूक वाढवणे, तोंडास चव येण्यासाठी , मानसिक अस्वस्थता, बेचैन वाटत असेल तर धने पावडर अर्धा चमचा व खडी साखर अर्धा चमचा एकत्र करून सेवन करावे शरीर शुद्धी होते.

कोथंबीर / हिरवे धने या वनस्पतीची औषधी माहिती.  Kothambir / hirave dhane ya vanspati vishayi mahiti


• अशी आहे कोथंबीर म्हणजेच धने या वनस्पतीची उपयुक्त आयुर्वेदिक औषधी माहिती.

Kothmbir mhanje dhane vanaspatichi ayurvedic mahiti.


नागरमोथा वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती (Nagarmotha Vanaspati – Ayurvedic Aushadhi Mahiti)

  🌿 नागरमोथा वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती ( Nagarmotha Vanaspati – Ayurvedic Aushadhi Mahiti) 🔹 मराठी नावे :  नागरमोथा, लव्हाळा, लव्हग...