आल्ल्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Ginger is useful for health लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आल्ल्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Ginger is useful for health लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

आल्ल्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Ginger is useful for health

 आल्ल्याचे औषधी गुणधर्म व उपयोग

Ginger is useful for health

आल्ल्याचे औषधी गुणधर्म व उपयोग  Ginger is useful for health


• मराठी नाव : आल्ले

• हिंदी नाव : अद्रक

• इंग्रजी नाव : Ginger

• शास्त्रीय नाव : Zingiber officinale.


• स्वरूप: आल्ले हे एक भूमिगत खोड असून ते एक पिक आहे.

• रंग : भुरकट पिवळसर तपकिरी.

• पाने : हिरव्या रंगाची मध्यम आकाराची गडद हिरव्या रंगाची असतात.

• आहारात वापर : आल्ले वनस्पतीच्या खोडाचा वापर आहारात केला जातो.

आल्ल्याचे औषधी गुणधर्म व उपयोग  Ginger is useful for health


• आल्ल्यात असणारे घटक :

आल्ल्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, फॉस्फरस,व्हिटामिन ए, बी, सी असते.

• आल्ल्यातील औषधी गुणधर्म व वापर:

आल्ल्याचे औषधी गुणधर्म व उपयोग  Ginger is useful for health


• आल्ले हे चहातून, जेवणातून तसेच इतर पदार्थातून आहारात वापरले जाते.

• आल्ले खाल्यामुळे रक्तात असणारे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. तसेच रक्त पातळ होते. रक्तात गुठळ्या होत नाहीत.

• आल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

• ज्या लोकांना हृदयविकार म्हणजेच ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी नियमित अर्धा इंच आल्ले व काही लसूण पाकळ्या एकत्रित चेचून खाल्या पाहिजे.

• पित्त विकार असलेल्या लोकांनी तसेच जर उलट्या होत असतील, गरोदर अवस्थेत दुसऱ्या ते पाचव्या महिन्या दरम्यान होणाऱ्या उलट्या व त्यापासून होणारा त्रास, तेलकट पदार्थ खाल्यामुळे होणारे विकार यासाठी आल्याचा रस अर्धा चमचा, पुदिन्याच्या पानांचा रस अर्धा चमचा व अर्धा चमचा मध यांचे चाटण तयार करून दिवसातून तीन वेळा तरी सेवन केले तरी आराम मिळतो, तसेच उलट्या थांबतात. व् अन्न पचनासाठी मदत होते.

• अपचन व असिडिटी साठी आल्ल्याचे नियमित सेवन चांगले असते.

• आल्ल्याच्या नित्य सेवनाने रोग प्रतिकार शक्ती वाढते.

• आल्ल्याच्या पाण्याचा काढा करून रोज पिल्यास डायबेटिस म्हणजेच मधुमेह कमी होण्यास मदत होते.

• आल्यात अँटी ऑक्सीडेंट, अँटी इन्फालमेंटरी घटक असल्याने कॅन्सरचा धोका कमी करते.

• आल्ले घालून तयार केलेला चहा पिल्याने घसा दुखित आराम मिळतो. व् सर्दी खोकला कमी करण्यासाठी मदत होते.

• स्त्रियांना मासिक पाळीत त्रास होत असेल तर त्यांनी आल्ल्याचा तुकडा, साखर कपभर पाण्यात टाकून उकळून ते पाणी पित राहिल्यास मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी होतात.

• आमदोषात पोटात होणारी कळ थांबवण्यासाठी आल्लें घालून केलेला लिंबू सरबत उपयोगी पडतो. दिवसातून तीन वेळा घेतल्याने आराम मिळतो.

• सर्दी,ताप अंगदुखी, सांधेदुखी, पाठदुखी यावर आल्याचा चहा नियमित सेवन करणे लाभकारी असते.

आल्ल्याचे औषधी गुणधर्म व उपयोग  Ginger is useful for health


• आल्ले केव्हा खावू नये?

• आल्ले उष्ण तत्वाचे असल्याने उन्हाळ्यात कमी खावे.

• उच्च रक्तदाब,पोटात अल्सर असेल, रक्तपित्ताचा त्रास असेल तर आल्ले खावू नये.

असे आहेत आल्ल्याचे औषधी उपयोग 

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...