चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti

 चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती

Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti

• मराठी नाव : चिंचूर्डी

• वनस्पती प्रकार : 

ही एक रान वनस्पती असून ती कुठेही पहाडी भागात अथवा नदीकाठी रस्त्याच्या कडेला आढळते. हे एक रोपवर्गीय झाड आहे. पावसाळी दिवसात हे उगवते दोन ते चार फूट उंच असते. ऑगस्ट ते नोव्हेंबर मध्ये यांना फळे लागतात.

• पाने : 

या वनस्पतीची पाने वांग्याच्या झाडासारखी असतात. त्या प्रमाणेच काटे असून मधून बारीक जांभळी शेड असते.

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti

• फुले : 

लहान आकाराची वांग्याच्या झाडासारखी फुले येतात.

• फळे : 

लहान टोमॅटो किंवा कांगुण्यासारखी हिरवट फळे असून त्यावर हिरवे देठ असतात. ती एके जागी चार ते पाच या संख्येत असतात. यांची चव कडवट असून त्यांची कोवळी कोवळी फळे काढून भाजी केली जाते. पिकल्यावर ही फळे पिवळ्या रंगाची दिसतात.

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti

• चींचुर्डी(चिंचूरडे) फळांचे आयुर्वेदिक औषधी महत्त्व :

• चिंचूर्डीची फळे पित्त शामक असतात. पित्त विकार असलेल्या लोकांनी या झाडाची फळे भाजी करून खाल्यास पित्त विकार कमी होण्यासाठी मदत करतात. सुरवातीस कडू नंतर गोडसर चव लागते.

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti

• वेदना शामक गुणधर्म या फळात असल्याने कंबरदुखीसाठी देखील या फळांची भाजी खाल्ली जाते.

• कफ, पित्त व वात दोष असणाऱ्या लोकांसाठी या फळांची भाजी उपयुक्त असते.

• पोट साफ होण्यासाठी मदत करते.

• भूक लागत नसेल तर भूक वाढवण्याचे काम चिचुरडे करते.

• महत्त्वाची सूचना :

चिंचुर्डे सारखी रिंगणी किंवा भुई रिंगणी असते. तिची पाने देखिल याच पानासारखी मात्र थोडी आकाराने मोठी असतात. त्याची फळे लहान वांग्यासारखी असतात. ही विषारी आहे. ती खावू नये.

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti
विषारी भुईरिंगणी

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti
विषारी रिंगणी

  • वरील दोन्ही झाडे व फळे चींचुर्डी सारखी दिसतात. पण विषारी आहेत. खावू नयेत.

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...