अडुळसा वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती
Adulasa vanaspati information in Marathi
चक्रवाक ऋषींच्या मते
अर्थ : जोपर्यंत वासा म्हणजे अडुळसा ही औषधी वनस्पती या सजीवसृष्टीत आहे. तोपर्यंत जगण्याची आशा आहे.
• मराठी नाव : अडुळसा, अडोसा, अडूसा. वासा
• इंग्रजी नाव: मलबार नट Malbar nut
• हिंदी नाव: अडाल्सो,
• संस्कृत नाव: सिंहिका, वसाका, अटरूष,
• स्थान : भारत, श्रीलंका, आग्नेय आशिया
• प्रकार: सदाहरित.
• अडुळसा वृक्षाचे प्रकार :
१) हिरवा अडुळसा २) लाल अडुळसा
• उंची : हे एक झुडूप असून ते १.२ ते२.५ मीटर पर्यंत वाढते. अनेक ठिकाणी कुंपण करण्यासाठी याचा वापर केला जातो.
• खोड : लहान लहान काटक्याचे स्वरूपात याचे खोड असते. मुख्य बुंधा थोडा जाड असतो. त्याला या लहान कटक्यांसारख्या फांद्या असतात. त्यास पाने व फुले येतात.
• पाने : अडुळसा वनस्पतीची पाने लंबवर्तुळाकार असून गडद हिरवागार वा पोपटी रंग त्यांना येतो. ती भाल्याच्या टोकाच्या पात्यासारखी असतात.
• फुले : या झाडाची फुले ही फांद्यांच्या टोकाला एका एकमेकात टोप ठेवलेल्या खोबणीत कोश ठेवल्या प्रमाणे येतात. त्यांचा रंग पांढरा असतो.
• फळे : या झाडाची फळे बोंडा सारखी टोकदार व गोलाकार असतात.
• गुणधर्म : लघु, रुक्ष, शित.
• अडुळसा वनस्पतीचे औषधी उपयोग:
• रक्त पित्ताचा त्रास असेल, क्षय रोगात अडुळसा खूप उपयुक्त आहे.
• जास्त जागरण झाल्याने शरीरात पित्त वाढते त्यामुळे रक्त पित्ताचा त्रास होतो. तसेच मूळव्याध रोगात रक्त स्त्राव होत असेल तसेच नाकातून, कानातून रक्त पडत असेल पित्ताची उष्णता शरीरात वाढल्यास ती कमी करण्यासाठी आपण अडुळसा आहारात घेवू शकतो.
• सर्दी, ताप, खोकला येणे यावर अडुळसा पानांचा काढा करून दिवसातून तीन ते चार वेळा पिल्यास असे सलग चार पाच दिवस केले तर खोकला बरा होतो. तसेच सर्दी, ताप कमी होण्यास उपयुक्त अडुळसा काढा आहे.
• अतिसारचा त्रास असेल, तसेच त्वचा रोग झाल्यास त्याने खुजली होत असेल तर अडुळसा वनस्पतीची पाने चिरडून त्याचा रस काढून मध टाकून त्याचे सेवन केल्यास लाभ होतो.
• अडुळसा वृक्षाचे मूळ हे गर्भ निष्क्रमणोपयोगी, उन्हाळे लागणे, स्वेत पदर यासारख्या रोगात वापरले जाते.
• त्वचेवर अडुळसा पाने वाटून त्याचा चोथा लावल्यास त्वचा उजळते. तसेच डोकेदुखी असेल तरी देखील अडुळसा पानांचा चोथा कपाळावर लावला जातो. ज्यामुळे आराम मिळतो.
• कफ सिरप बनवताना अडुळसा वनस्पतीची पाने वापरतात.
• उष्णता वाढल्याने उन्हाळे लागणे, कावीळ रोगात अडुळसा उपयुक्त आहे. यासाठी अडुळसा वनस्पतीची पाने व फुले यांना वाटून त्याचा काढा करून पिणे लाभदायक असते.
• अडुळसा पाने व फुलांचा रस काढून पिल्यास रक्ताभिसरण चांगले होते.
• सर्दी,कफ, यामुळे छाती जाम होते, श्वसनास त्रास होतो, त्यावेळी दम्याचा त्रास सुरू होतो अशावेळी अडुळसा पानांच्या विड्या बनवून ओढल्यास कफ पातळ होऊन निघून जातो. व दमा कमी होतो.
• अडुळसा पाने शेक देवून त्यांचा फुलासवे रस काढून त्यामधे मध व पिंपळी चूर्ण टाकून त्याचे चाटण बनवावे व सेवन करावे, सर्दी, ताप, खोकला, कफ यामध्ये लाभदायक आहे.
• क्षय रोगात अडुळसा पानांचा दोन चमचे रस काढून त्यामध्ये ज्येष्ठ मध घालून अष्टमांश काढा बनवतात जो क्षय रोग कमी करतो.
• कावीळ व रक्तपित्तात अडुळसा पानांचा रस त्यामधे दोन चमचे मध व पन्नास ग्रॅम साखर घालून तयार केलेले द्रावण पिल्यास आपणास कावीळ व रक्तपित्त बरी होण्यास मदत होते.
• अडुळसा वनस्पतीची मूळाची साल काढून त्याचा रस व मध घेतल्यास रक्तपित्त कमी होते.
• अडुळसा पानांचा वाटून चोथा करावा व तो संधिवात असल्यास त्या दुःखर्या जागी लावल्यास आराम मिळतो.
• त्वचा विकार, खरूज उठल्यास अडुळसा पाने वाटून त्यात आंबेहळद घालून त्यावर लेप लावत राहिल्यास खरूज निघून जाते. खरुजेत अडुळसा पाने घालून उकळलेले पाणी घेऊन अंघोळ केल्यास खरूज कमी होऊ लागते.
• अडुळसा पानांचा रस व मध रोज एकत्र एक महीना घेत राहिल्यास कफ निघून जातो.
• पोटातील जंतू मारक असल्याने अतिसार रोगात अडुळसा पानांचा रस व काढा घेणे फायद्याचे असते.
• कोरडा खोकला असल्यास अडुळसा पाने शेकून त्यापासून काढलेला रस व मध घेणे फायद्याचे असते.
• लघवी बंद होणे , किंवा थांबणे यावर सलग सात ते आठ दिवस अडुळसा पानांचा रस घेत राहिल्यास लघवी सुरळीत होते.
• मलेरिया रोगात अडुळस्याची पाने व विड्याची पाने यांचा धूर करून घेतल्यास लाभदायक असते.
•अडुळसा वनस्पतीचे सेवन कसे करावे?
• काढा करून तसेच वाटण करून तिचे सेवन केल्यास लाभदायकच असते. काढा करताना पिकण्यास आलेली पिवळी पाने जास्त करून वापरली जातात.
• अडुळसा पाने शेक देवून त्यांचा फुलासवे रस काढून त्यामध्ये मध व पिंपळी चूर्ण टाकून त्याचे चाटण बनवावे व सेवन करावे,
आपल्या आसपास अडुळसा उपलब्ध होत नसेल. तर त्यासंबंधी औषधी विषयी ज्यादा माहिती खालील वेबसाईटवर जाऊन पाहू शकता आणि खरेदी करू शकता.
👉 https://amzn.to/4sxbOe2
• अशी आहेत अडुळसा वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती व उपयोग.
Adulasa vanaspati information in Marathi




