रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

बेडकीचा पाला/ गुडमार या वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती Bedkicha pala / gudmar information in Marathi

 बेडकीचा पाला/ गुडमार या वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती

Bedkicha pala / gudmar information in Marathi

बेडकीचा पाला/ गुडमार या वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Bedkicha pala / gudmar information in Marathi
बेडकीचा पाला/ गुडमार


• मराठी नाव : बेडकिचा पाला

• हिंदी नाव : गुडमार

• संस्कृत नाव : मेषशृंगी

• लॅटिन अमेरिका भाषेतील नाव : Gymnema Sylveste


• रचना : ही एक जंगली वेल आहे. ती सहज वाढते. एखाद्या झाडाच्या अथवा खोडावर चढलेली आपणास पाहायला रानात भेटते.


• पाने : साधे पान या प्रकारात या वेलीची पाने येतात. ती एकामागोमाग एक असतात. तसेच वेलीच्या खोडाच्या दुतर्फा सामोरा समोर सुद्धा येतात.

बेडकीचा पाला/ गुडमार या वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Bedkicha pala / gudmar information in Marathi


• फुले : लहान लहान पिवळ्या रंगाची फुले या वनस्पतीस येतात.

बेडकीचा पाला/ गुडमार या वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Bedkicha pala / gudmar information in Marathi


• लक्षणे : बेडकीचा पाला म्हणजेच गुडमार हे औषध लघु गुणाचे आहे, प्रकृतीने उष्ण, काशाय रस युक्त रुक्ष असते, चवीला कडवट असून याच्या सेवनाने दहा ते पंधरा मिनिटे तोंडाची चव जाते. गोड चव लागत नाही.

बेडकीचा पाला/ गुडमार या वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Bedkicha pala / gudmar information in Marathi


बेडकीच्या पाल्याचे औषधी गुणधर्म व महत्त्व :

• मधुमेह रोग : बेडकीचा पाला हा शरीरात वाढलेली साखर नियंत्रणात आणतो. यासाठी साखर म्हणजेच मधुमेह असल्यास या वेलीची पाने रोज सेवन केल्यास शरीरातील साखर नियंत्रित होते.

• शरीरात पेन क्रिया वाढवते. त्यामुळे शरीरात इन्सुलिन वाढूण शरीरात उत्तेजना वाढवण्याचे काम बेडकीच पाला म्हणजेच गुडमार करते.

• हृदय : शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे हृदयावरील प्रेशर कमी होते. व हार्ट म्हणजेच हृदय क्रिया सुरळीत सुरू होते. ब्लडप्रेशर कमी करते. बीपी नियंत्रीत ठेवते.

• कफ व वात विकारावर उपाय :

शरीरात कफ वाढला असेल तर बेडकीच्या पाल्याच्या सेवनाने कफ पातळ होऊन निघून जातो. तसेच सास फुलणे त्यामुळे दम लागणे देखील कमी होते. तर वात दोषावर देखील प्रभावी हा बेडकीचा पाला आहे.

• जठर :

उष्ण गुणधर्म असल्याने जठर क्रिया सुधारून अन्न पचनासाठी मदत करते. तसेच लिव्हरचे कार्य सुधारण्याचे काम देखील बेडकिचा पाला करतो.

• मूत्र विसर्जन क्रिया सुधारते. शरीरातील ग्लुकोज वाढलेले कमी करून ते नियंत्रित करण्यासाठी मूत्र विसर्जन क्रिया सुधारते. यामधे लघवीला साफ होत नसेल किंवा लघवी करताना जळजळ होत असल्यास ती कमी करण्यासाठी मोलाची मदत ही वन औषधी बेडकीचा पाला म्हणजेच गुड मार मदत करते.

• स्त्री समस्या : स्त्रियांना मासिक पाळीत वेदना होत असेल, स्त्राव निघत नसेल. तर बेडकीचा पाला सेवन केल्यास लाभ होतो. स्त्राव निघण्याचे प्रमाण वाढते. व गर्भाशय क्रिया सुधारते.

• बेडकीच्या पाल्याचे सेवन कसे करावे?

• बेडकीच्या वेलीची पाने रोज सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर त्याचे चूर्ण रोज पाण्यासोबत एक ते तीन ग्रॅम घ्यावे.

बेडकीचा पाला/ गुडमार या वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Bedkicha pala / gudmar information in Marathi


• बेडकीचा पाला चूर्ण कसे करावे?

बेडकीच्या वेलीची पाने तोडून ती सावलीत वाळवावीत व त्याचे चूर्ण करावे. विशेषत उन्हाळ्याच्या दिवसात नवीन पालवी फुटून निर्माण झालेली पाने घेवून त्याचे चूर्ण करने लाभदायी असते. कारण त्यावेळी सूर्यप्रकाश ही भरपूर असतो.


• बेडकीचा पाला म्हणजे गुडमारचे सेवन करताना घ्यावयाची दक्षता:

• बेडकीचा पाला ज्या व्यक्तींना साखर आहे त्यांनी हा पाला खाताना आपली शुगर लेवल चेक करावी. व जर कमी असेल तर सेवन करू नये. तसेच जवळील तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप औषधे घेणे चांगले असते. वाढलेली साखर कमी करताना ती काही दिवसांनी चेक केल्यास कमी झालेली जाणवते. त्यावेळी नियंत्रित झाल्यावर थोडाकाळ सेवन थांबवावे.

• अशी आहे बेडकीच्या पाला म्हणजे गुडमार या औषधी वनस्पती विषयी ऐतिहासिक माहिती.

Bedkicha pala / gudmar information in Marathi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...