रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

कढीपत्ता वनस्पती विषयी माहिती Curry leaves tree information in Marath

 कढीपत्ता / कडीपत्ता वनस्पती विषयी माहिती
Curry leaves tree information in Marathi

मराठी नाव : कढीपत्ता /कडीपत्ता 

हिंदी नाव: 

कडीपट्टा, मिठा निंब

वैज्ञानिक नाव: 

 मुराया कोएनिगी.

स्थान

दक्षिण आशिया खंडात भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, चीन,

रचना

हे एक छोटेसे झुडपी रोप आहे. पाच ते सात फूटापर्यंत या वृक्षाची वाढ होते. याच्या पानांचा विशेषत आहारात वापर केला जातो.

• याला लहान मेंदी सारखी पाने असतात, पानांना एक कडवट सुगंधी वास असतो. एक छान चवदार स्वरूप पानांचे असते. दोन्ही बाजुस निमुळती मध्यभागीं फुगीर अशी पाने एका दांडीला येतात.

• याला छोट्या आकाराची फळे गोलाकार गोटी सारखी येतात. यापासून मिळणाऱ्या आतील बियातून बीज प्रसार होतो.

कढीपत्ता वनस्पती विषयी माहिती  Curry leaves tree information in Marath


कढीपत्त्याचे औषधी उपयोग :

• डोक्यात कोंडा होत असल्यास कडीपत्याच्या पानांचे चूर्ण करून ते दह्यात भिजवून लावावे. व थोड्या वेळाने केस धुवावेत. डोक्यातील कोंडा कमी करतो. तसेच केस काळे राहतात. पांढरे केस कमी होण्यास मदत करते.

• कडीपत्त्या मध्ये आयर्न म्हणजेच लोह हा घटक असतो. याचा आहारात उपयोग नियमित केल्यास शरीरात आयर्न घटक वाढण्यास मदत होते.

• पचन शक्ती वाढवण्याचे काम कडीपत्याने होते.

• कडीपत्त्यात डायकलोरोमिथेन, एथिलीन हा घटक असतो जो कलोरेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. ज्यामुळे शरीरातील बॅड क्लोरेस्टेराल कमी करते. व चांगले कलोरेस्टेरोल वाढवते.

कढीपत्ता वनस्पती विषयी माहिती  Curry leaves tree information in Marath


• कडीपत्त्यात ट्यानीन, कार्बाजोल अल्कलाईन तत्व हे लिव्हरची कार्यक्षमता वाढवते. लिव्हर निकामी होऊ देत नाही.

• कडीपत्त्यात असणारा हायपोग्लासेमिक घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. त्यामूळे मधुमेह रोग असलेल्या लोकांनी कडीपत्ता आहारात ठेवणे लाभकारी असते.

• आनिमिया म्हणजे पांडूरोग यावर कडीपत्ता गुणकारी आहे. जो शरीरात लोह वाढवतो.

• कडीपत्त्यात लोह, कॅल्शियम, वेनेडियम , मिनरल, असते. जे रक्त वाढीस मदत करते.

• जुलाब होत असल्यास कडीपत्ता सेवन करने लाभकारी असते.

• हृदयाशी संबंधित आजारात कडीपत्ता उपयोगी पडतो.

• केमोथेरपी, रेडिओथेरपीमुळे झालेली शरिराची झीज भरून काढण्यासाठी कडीपत्ता सेवन करावा त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करते.

• अँटी आक्सिडेंट हा घटक कडीपत्यात असल्याने शरीरात कफ साचत नाहीं. व त्यामुळे कडीपत्ता चूर्ण घेवून ते दोन -चार दिवस एक चमचा मध घालून सेवन करने लाभकारी असते. त्यामुळे कफ कमी होतो व खोकला बरा होतो.

• ल्याक्टीक असिड असल्याने अपचन समस्या दूर करण्यास मदत कडीपत्ता करतो.तसेच पित्त दोष निवारण करतो.

• कडीपत्यात अँटीईन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने शरीरातील सूज कमी करतो, सांधे दुखी,, जॉइंट पेण होत असेल, आर्थरायटीस समस्येत कडीपत्ता गुणकारी आहे.

• ज्याव्यक्तीस थकवा, मळमळ, उलटी आशा समस्या असेल तर आपण कडीपत्ता नियमित सेवन करने लाभदायक आहे.

• व्हिटॅमिन ए कडीपत्यात असल्याने ते डोळ्याचे आरोग्य सुधारणेस मदत करते.

कढीपत्ता वनस्पती विषयी माहिती  Curry leaves tree information in Marath


• चेहऱ्यावर कडीपत्याचे तेल लावल्यास त्वचेवर येणारे मुरम (पिंपल्स) कमी करण्याचे काम कडीपत्ता करतो.

• सुर्या पासून निघणार्या अल्ट्राव्हायोलेट किरणामुळे त्वचेचे नुकसान होते त्यावर कडीपत्ता तेल गुणकारी असते.

• कडीपत्यात जीवनसत्व अ, बी, सी, इ जीवनसत्व असते.

• खोबरेल तेलात कडीपत्याच्या पानांचे चूर्ण घालून ते उकळून ते तेल केसांना लावल्यास केसांना भक्कमपणा येतो.

• कढीपत्त्याच्या पानांचा रोजच्या आहारात वापर करतात. यासाठी वेगवेगळ्या भाज्या, आमट्या बनवताना फोडणीत कडीपत्ता वापरतात.

• चटणी मिसळताना कडीपत्ता वापरला जातो.

• कडीपत्त्यापासून टॉनिक देखिल बनवले जाते.

कढीपत्ता वनस्पती विषयी माहिती  Curry leaves tree information in Marath

• कडीपत्ता सेवन केल्याने साईड इफेक्ट काही होत नाहीत. मात्र गरोदर अवस्थेत याचे सेवन मर्यादित करावे.

• अशी आहे कढीपत्ता वनस्पतीची माहिती

Curry leaves tree information in Marathi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...