रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

एरंड वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती Erand /castor bean plant information in marathi


मराठी नाव : एरंड


Erand /castor bean plant information in marathi

इंग्रजी नाव

castor bean plant.

लॅटिन नाव : 

Ricinus conmunis.

कुल

Euphorbiaceac

स्थान : 

आशिया व आफ्रिका खंडात ही वनस्पती आढळते.

वाढ 

: ही एक छोटीशी झुडुप उंचीची वनस्पती आहे. या वनस्पतींची उंची ही २ ते ४ मीटर उंच आहे.

• रानात, जंगलात, एखाद्या शेताकडेला ही वनस्पती आढळते.

एरंड वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Erand /castor bean plant information in marathi


खोड :

या वनस्पतीचे खोड हे बारीक नळी सारखे असून त्यावर पेरे असतात. एक प्रकारे ऊसाच्या कांड्यासारखी रचना असणारे.

• या वनस्पतीची पाने ही छत्री सारखी असून एखाद्या चांदणी सारखी वाटतात. मध्य भागाशी शिरेने जोडलेली असतात गडद हिरव्या किंवा तांबूस रंग त्यावर असतो.

फळ :

या वनस्पतीची फळे ही लहान काटेरी असतात. पण काटे मऊ असतात. जे बिजप्रसार होण्यासाठी उपयुक्त असतात.

बिया :

फळाच्या आतील बाजूस अनेक भाग दिसून येतात. त्यात काळसर रंगाच्या बिया असतात.

त्यावर पांढरट रेषा दिसून येतात.

वनस्पतीचा प्रकार :

लहान आकाराची एरंड: 

यामधेे एरंडाच्या वनस्पतीचा अकार लहान असून त्यातील बियांचे तेल व मुळांचा औषधात वापर करतात.

तांबडी एरंड :

याचे तेल तीव्र उग्र असते. ते औषधात वापरतात.

वर्षायु : एक वर्ष जगणारा एरंड ती वर्षायू एरंड होय.

दीर्घायु एरंड : जी जास्त वर्ष जगते.

• या झाडाच्या बियांना एरंडी असे म्हणतात.

एरंड वनस्पतीचे आयुर्वेदीक उपयोग :

एरंड वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Erand /castor bean plant information in marathi


• एरंड तेल हे कडू, तिक्त, गोडसर चिकट असे असते.

• पोट साफ होत नसेल तर एरंडेल तेलाचे सेवन सकाळी उपाशीपोटी केले जाते. ते गरम पाणी किंवा कोऱ्या चहात टाकून घेतल्यास पोट साफ होते.

• कंबर दुखी, पाठदुखी व अन्य वातविकाराने जर अंग दुखत असेल. तर त्यावर उपाय हा एरंडेल तेलाचा होतो. त्यामधे एरंडेलने मालिश केल्यावर वात दोष कमी होतो.

• आमवात रोगात जर एरंडेल तेल सेवन केले तर बराच फरक पडतो कडकडून भूख लागून वातविकार नाहीसा होतो.

• तीक्ष्ण गुण असल्याने एरंडेल तेल सर्व शरीरातील भागात पसरते. त्यामुळे आपणास सर्व आजारांवर उपयोगी पडते. यामुळे विरेचन क्रियेत याचा वापर केला जातो.

• शरीरात जागोजागी गाठी होणे यावर एरंडेल तेल सेवन करत राहिल्यास व वरून मालिश करत राहिल्यास गाठी विरून जातात. व शरीर निरोगी होण्यास मदत होते.

• वारंवार ताप येत असेल तर पोटातील विकार, उदर शुळ, तसेच पोटात मल साठून राहिल्यास एरंडेल तेल घेत राहिल्यास शरीर शुद्धी होते.

• एरंडेल तेलामुळे बुध्दी व स्मरणशक्ती वाढते.

• सुशुताचाऱ्यांमते वय स्थापक असून कामवर्धक व शुक्रधातू वाढवतो.

• सामर्थ्य, शक्ती व बलवर्धक एरंडेल तेल असते. त्याच्या नियमित सेवनाने कांती सुधारते. व त्वचा व केसांसाठी सुद्धा फायदा होतो.

• पित्त वाढणे, जळजळ छातीत होणे यासाठी येरंडेल तेल घेतात.

• येरंडेल तेल हे लहानापासून मोठ्यांपर्यंत सेवन केल्यास फायदेशीर असते.यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी सहा मिली रोज असे सलग तीन दिवस घेतल्यास शरीर पूर्ण शुद्ध होते.

• एरंडेल तेल हे विशेषत वर्षातून शरद व वसंत ऋतूत घेतले जाते. यावेळी उष्णता वाढून आजार वाढतात. तेव्हा या काळात एरंडेल तेलाचे सेवन चांगले.

• एरंडेल तेल चहा, गरम पाणी, लिंबूपाणी, यामधून घ्यावे.

• तीन दिवस विरेचन केल्यावर लगेच आहार घेताना हलका आहार घ्यावा. यामधे ताकभात किंवा पेज सेवन करावी.

• मोठ्या प्रमाणात किड नियंत्रण करण्याचे काम एरंड करते. त्यामुळे शेतकरी शेताच्या बांधावर एरंड वनस्पती लावतात. व पिकांचे संरक्षण करतात.

अशी आहे एरंड वनस्पती विषयी आयुर्वेदीक औषधी माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...