रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहितीीAnkol vruksh Information in marathi

 अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहिती

Ankol vruksh Information in marathi

अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहितीीAnkol vruksh Information in marathi


वनस्पती शास्त्रीय नाव : आयलेजियम ल्यामार्की,

इंग्रजी नाव : Dakshin Dhera, Dhera, Thel, Ankul.


इंग्लिश नाव : Saga – leaf – Alangium

लॅटिन नाव : Alangium – Lamarkil.

संस्कृत नाव : अंकोल दीर्घकील,

हिंदी नाव : ढेरा, थेल, अंकुल.

मराठी नाव : आंकुल.

स्थान : 

आंकोल वनस्पती ही भारतात सर्वत्र आढळते. पण विशेषत ही हिमाचल प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात विशेषतः आढळते.

झाडाची उंची :

तीन ते सहा मीटर वाढ असणारे ही एक वनस्पती आहे.

खोड :

 या वनस्पतीचा खोड हे २.५ ते ३.०० इंच जाडीचे खोड असते.

फांद्या / शाखा :

अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहितीीAnkol vruksh Information in marathi


 या वनस्पतीच्या फांद्या या वेड्यावाकड्या असतात.

साल : राखाडी रंगाची खडबडीत साल अंकोल झाडाची असते

पाने :

 लंबगोलाकार पाने या वनस्पतीची असून टोकदार असतात. कन्हेरी सारखी पाने असून लांब व रुंद असतात. या वनस्पतीस बारा महिने पालवी असते.

फुल :

अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहितीीAnkol vruksh Information in marathi


या वनस्पतीचे फुल हे पांढ-या रंगाचे असते. फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात ते फुलते. यांना गोडसर वास असतो.

फळ :

अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहितीीAnkol vruksh Information in marathi


 अंकोलाची फळे ही बेरीच्या फळासारखी असून सुरवातीस लालसर नंतर काळसर दिसतात. साल काढल्यावर आतील गर पांढरट दिसतो. गोड चवीचे हे फळ असते.

मूळ :

 अंकोलाचे मूळ पिवळसर रंगाचे तेलकट व टणकदार असते.

बी :

 अंकोलाच्या बियापासून तेल काढले जाते.

अंकोल वृक्षाचे औषधी महत्त्व :

अंकोल वृक्षाची आयुर्वेदिक माहितीीAnkol vruksh Information in marathi


• अंकोल वृक्षाच्या मुळात ०.८ % अंकोटिन द्रव्य असते. यामधील अंश 0.2% त्याच्या तेलात असते. हे तेल रोगविरोधी गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग औषधात करतात. या तेलाची चव तुरट कडू व थोडी तिख्त असते. याची प्रकृती तीक्ष्ण, उष्ण व स्निग्ध असते.

• रक्तदाब कमी करण्यासाठी याचा मूळाचा वापर केला जातो.

• अंकोलाचा रस हा विष, कफ, पित्त,वात, शूल, कृमी, सूज आम व रक्तदोष कमी करण्यासाठी वापरतात.

• याचा रस कुत्रे, मांजर, उंदीर, साप यांच्या विषावर गुणकारी आहे.

• अंकोलाच्या बियांचे व मूळाचे तेल अंघोळ करताना लावल्यास त्याचा उपयोग त्वचारोगावर होतो.

• अंकोलाचे तेल वात व कफ नाशक आहे.

• अतिसार व विषबाधा झाल्यास अंकोलाच्या मूळाची साल तांदळाच्या धुतलेल्या पाण्यात उगाळून मधासवे घेतल्यास फरक पडतो.

• पोटात कृमी वाढले असतील तर त्यासाठी अंकोलाचा रस वापरतात

• त्वचारोग, वायूने अंग दुखणे, जलोधर, सूज, दाह, ज्वर, मुत्रावरोध,इत्यादी विकारावर अंकोलाच्या मूळाचे तेल वापरतात.

• यासाठी आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घ्यावा योग्य मात्रा सांगतील.

रोज अन्कोल फळ दोन किंवा तीन जेवणानंतर सकाळी खाल्यास पुरुषाचे विरी वाढते व सेक्स क्षमता वाढवण्याचे काम करते.

अशी आहे अंकोल वृक्षाची माहिती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...