रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Veldoda ,Cardamom use and benifit

 वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग
वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Veldoda ,Cardamom use and benifit


मराठी नाव: वेलदोडा, वेलची,

हिंदी नाव: इलायची

English name : Cardamom

कुळ : झिंजिबेरीस

इलेट्यारिया : हिरवा वेलदोडा.

आमोमम. : गडद तपकिरी रंगाचा मसाले वेलदोडा.

वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Veldoda ,Cardamom use and benifit


• हिरवे वेलदोडे विशेषत आहारात वापरले जातात जास्त प्रमाणात.

आकार

लहान अंडाकृती आकाराचा असून आतील बाजूस लहान लहान तपकिरी, काळपट रंगाच्या बिया आढळतात. या बियांपासून पुनर्लागवड केली जाते.

वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Veldoda ,Cardamom use and benifit


आढळणारे देश

भारत, श्रीलंका, मलेशिया, टांझानिया, ग्वाटेमाला.

हिरव्या वेलदोड्यात आढळणारे घटक:

कर्बोदके, सेल्युलोज, प्रथिने, अ, ब, क जीवनसत्त्व, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, तांबे, लोह, म्याग्नेशियम, फॉस्फरस, जस्त इत्यादी.

वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Veldoda ,Cardamom use and benifit


वेलदोड्याची आयुर्वेदिक औषधे महत्त्व:

• पोट विकार झाल्यास, पोट फुगी व गॅसेस प्रॉब्लेम झाल्यास दहा वेलचीची पूड करुन ती पाण्यात टाकून उकळून त्याचा काढा करुन दर दोन तासाने सेवन केल्यास अजीर्ण व पोटदुखी बरी होते.

• पित्त विकाराने उलटी होत असेल, किंवा अपचन क्रियेमुळे उलटीचा त्रास होत असेल तर वेलदोडे घालून काढा करुन पिण्याने फायदा होतो.

• थंडीच्या दिवसात कफ, खोकला झाल्यास आपण वेलदोडे व सुंठ पावडर एकत्र करुन त्यांचे सेवन मधासोबत दिवसातून चार पाच वेळा केल्यास कफ व खोकला कमी होतो.

• वेलदोड्यामध्ये भुक वाढवणारे घटक असतात. यामुळे भूक वाढते. तसेच थकवा दूर करण्याचे व त्वचा उजळ करण्याचे काम वेलदोडा करतो.

• पोटात आतील बाजूस अल्सर असेल आतील बाजूस जखमा होतात त्या बऱ्या करण्याचे, आग जळजळ कमी करण्याचे काम तसेच सूज कमी करण्यासाठी वेलदोडे खाणे फायद्याचे असते.

• अँटी ब्याक्टेरीया गुणधर्मामुळे तोंडातील वाढणारे घातक जिवाणू नष्ट करण्याचे काम वेलदोडा करतो. त्यामूळे जेवणानंतर एक तरी वेलदोडा खावा. ज्याने मुखशुद्धी होते.

• वेलदोडे खाल्याने सेक्स लाईफ सुधारते.

• शरीरातील वाईट कलोरेस्टरोल काढून टाकण्याचे काम वेलदोडा करतो. त्यामूळे ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यासाठी वेलदोडा खाणे फायद्याचे असते.

• शरीरात आयर्न म्हणजेच लोहाचे व कॅल्शियम वाढवण्याचे कार्य वेलदोडे करतात. व्हिटामिन सी त्यामध्ये मोठ्याप्रमाणात असते.

• पचनसंस्थेचे आरोग्य सुधारणेसाठी जठर व पोटाच्या समस्या, गॅसेस यावर वेलदोडे खाणे फायद्याचे असते.

• वेलदोडे, सुंठ, लवंग, शहाजिरे, यांची पेस्ट अपचनवर उपयुक्त आहे.

• पित्ताने जळजळ होत असेल तर वेलदोडे खाल्याने पित्त कमी होते.

• वेलदोड्याचा उपयोग चहा, वेगवेगळे गोड पदार्थ करताना केला जातो.

वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग Veldoda ,Cardamom use and benifit


• असा हा वेलदोडा बहुगुणी आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...