ausdhi vanaspati लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ausdhi vanaspati लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

अतिबला / पेटारी / मुद्रिका वनस्पतीAtibala / petari / mudrika vanaspti

 अतिबला / पेटारी / मुद्रिका वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती

अतिबला / पेटारी / मुद्रिका वनस्पतीAtibala / petari / mudrika vanaspti

• मराठी नाव : पेटारी, मुद्रिका, करडी. अतिबला

• हिंदी नाव : कंगनी, अतिबला,

• संस्कृत नाव : अतिबला, कंकतीका.

• इंग्रजी नाव : Indian Mallow / country Mallow

• शास्त्रीय नाव : Abutilon indicium


वनस्पती परिचय : 

ही एक झुडूप प्रकारात मोडणारी वनस्पती आहे. साधारण एक ते दोन मीटर उंच वाढते. भारतात सर्वत्र रानात आढळते.

• खोड : 

हिरवट मऊ केसाळ असते. जून झाल्यावर कडक दिसते.

• पाने : 

 पसरट हृदयाच्या आकाराची असतात. मऊ व केसाळ असतात.

• फुले : 

पिवळ्या रंगाची मध्यम आकाराची दले असणारी असतात. वर्षभर किंवा विशेषत पावसाळ्यात येतात.

• फळे : 

हिरव्या रंगाची फळे जाड दातेरी असतात व फुगीर याच्या आतील बाजूस बिया असतात. दिसायला एखाद्या चक्रासारखी दिसतात. पिकल्यावर तपकिरी दिसतात.

• मूळ : 

 लांब व मजबूत असतात. यांचा औषधात जास्त उपयोग होतो.

• गुण : 

चवीला तिखट, कडू , पचण्यास सुलभ स्निग्ध गुण असलेली वात,पित्त नाशक आहे.

अतिबला / पेटारी / मुद्रिका वनस्पतीAtibala / petari / mudrika vanaspti


अतिबला / पेटारी / मुद्रिका वनस्पतीचे औषधी उपयोग :

• कोरडा खोकला असेल. किंवा उलटीतून रक्त पडत असेल. तर फुलांचे चूर्ण एक ते दोन ग्रॅम तूपासोबत सेवन करावे. फायदा होईल.

• मूळव्याध असेल तर या वनस्पतीच्या मुळांचे चूर्ण मधासोबत खावे. किंवा मुळांचा काढा करून २० ते ३० मिली प्यावे. लाभकारी असते.

• साधा खोकला असेल, किंवा वारंवार खोकला येत असेल तर या वनस्पतीच्या बियांचे चूर्ण व अडुळसा पानांचं एकत्रित काढा दहा ते वीस मिली घेणे लाभकारी असते.

• कोणताही मुत्र विकार असेल. लघवी साफ न होणे, जळजळ, व अन्य विकार यावर या झाडाच्या मुळांचा काढा १०ते २० मिली घेतल्यास फायदा होतो. किंवा कुटून त्या एक ग्लास पाण्यात टाका रात्रभर भिजत ठेवा. सकाळी काढा करून १०ते २० मिली प्या.

• कावीळ झाल्यास मुळांचे चूर्ण एक ते दोन ग्रॅम मधासोबत घ्या. किंवा मुळांचा काढा वीस ते तीस मिली घ्या. कावीळ बरी होते.

• स्त्रीयांना मासिक पाळीत रक्त जास्त जात असेल. तर मुळांचे चूर्ण एक ते दोन ग्रॅम मधासोबत घ्या. आराम मिळेल.

• पुरुष वीर्य तक्रारी येत असल्यास मुळांचा काढा किंवा मुळांचे चूर्ण किंवा पानांचा रस घेत राहिल्यास वीर्याशी संबंधित समस्या दूर होते.

• अतिबलाची मुळे व बिया बलवर्धक व शक्ती वर्धक आहेत. ज्या शरीर मजबूत करतात.

• सर्दी, ताप, खोकला कमी करतात. वेदना शामक आहेत. त्वचा विकारावर देखील प्रभावी औषधी आहे.

अतिबला / पेटारी / मुद्रिका वनस्पतीAtibala / petari / mudrika vanaspti


• आपल्याला अतिबला औषधी व त्यांपासून बनवलेली औषधे हवी असतील. तर जवळील मेडिकल मध्ये पहावीत. उपलब्ध होत नसतील तर ती खाली दिलेल्या वेबसाइटवर जाऊन आपण पाहू शकता आणि खरेदी करू शकता

👉 https://amzn.to/4c8jgpc

टीप :

 वरील प्रमाणे अतिबला / पेटारी / मुद्रिका या वनस्पतीचे औषधी महत्व आहे. दिलेल्या मात्रेत घेतल्यास लाभकारी असते. पण औषधी नीट पारखून घ्यावी. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे लाभकारी असते.

• अशी आहे अतिबला / पेटारी / मुद्रिका वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती Atibala / petari / mudrika vanaspti vishyi ayurvedic aushadhi mahiti


Aloe Vera Plant Information in English | Benefits, Uses and Ayurvedic Properties

🌿 Aloe Vera Plant Information in English | Benefits, Uses and Ayurvedic Properties ✨ Introduction Aloe Vera, known as Korphad in Marathi a...