कुष्मांड / कोहळा / पेठा या फळाची आयुर्वेदिक महत्व
नाव :
• मराठी नाव : कुष्मांड / कोहळा / पांढरा भोपळा/ पेठा
• हिंदी नाव : पेठा , कददू ( सफेद कददू), कुष्मांड
• इंग्रजी नाव : Ash Gourd, Winter Melon, White Pumpkin.
• संस्कृत नाव : कुष्मांड ( kushmanda).
• शास्त्रीय नाव : Benincasa hispida.
• परिचय :
कुष्मांड म्हणजे कोहळा ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. भारतात सर्वत्र आढळते. सर्वत्र तिची लागवड केली जाते. आयुर्वेदात या वनस्पतीला अत्यंत महत्वाचे स्थान असून तिचा औषधी उपयोग आहे. मोठ्या प्रमाणात आहारात वापर केला जातो.
• वनस्पती रचना : ( Plant Structure)
• मूळ : ( Roots)
कुष्मांड वनस्पतीची मुळे तंतुमय असतात. जमिनीत खोलवर पसरतात. व वनस्पतीला आधार देतात.
• खोड :
लांब खोड असून मऊ असते. वेलीसारखे पसरत जाणारे असून खोडावर सूक्ष्म केस असतात. खोड आधार घेऊन वाढते.
• पाने :
पाने रुंद, मोठी गोलाकार असतात. त्यावर थोडे केसाळपणा असतो. हिरव्या रंगाची असून त्यावर स्पष्ट शीरा दिसतात.
• फुले :
पिवळ्या रंगाची असतात. नर व मादी फुले वेगवेगळी असतात. आकर्षक असल्याने मधमाश्यांना आकर्षित करतात. मधमाशांमुळे परागीभवन होते व फलधारणा होते.
• फळ :
मोठे गोल किंवा लांबट असते. वरून पांढरा रंग असतो.
कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पांढरे दिसते. आतमध्ये पांढरा गर असून त्यांपासून पेठा नावाची मिठाई बनवतात.
बिया: फळाच्या आत पांढरट रंगाच्या बिया असतात.
• गुणधर्म :
हे फळ शीतल थंड प्रवृत्तीचे असून पचनास हलके पौष्टिक व ताजेतवाने करणारे व शरीरातील उष्णता कमी करणारे आहे.
• कुष्मांड / कोहळा / पेठा या फळाची आयुर्वेदिक महत्व व उपयोग :
• शरीरातील वात व पित्त दोष कमी करण्याचे काम हे फळ करते.
• मेंदूची मेधा धारणा म्हणजेच स्मरणशक्ती वाढवते. तसेच बुद्धी तेज करण्यासाठी उपयुक्त कुष्मांड उर्फ कोहळा खाणे फायद्याचे आहे.
• विस्मरण शक्ती कमी करते, तसेच मानसिक तणाव, झटके येणे, मीर्गी येणे या समस्या कमी करण्याचे कार्य कुष्मांड उर्फ कोहळा करतो.
• मानसिक ताण कमी करुन चांगली झोप देत असल्याने शरीर तंदुरुस्त राहते.
• सारखी तहान लागणे, घशाला कोरड पडणे या समस्या कमी करतो.
• अनुलोमक असल्याने संडासला साफ न होणे.कब्ज समस्या, गॅसेस होणे यासारख्या समस्या दूर करतो. पोट साफ होण्यासाठी मदत करतो. पचनक्रिया सुधारतो. व अजीर्ण कमी करतो.
• पित्त शामक असल्याने शरीरातील गर्मी दूर करतो.
• पोटात किडे , झाले असतील. तर त्यांना मारून मलाद्वारे बाहेर काढण्यासाठी मदत करतो.
• हृदयास ताकद देण्यासाठी मदत करतो.
• फुप्फुसे बळकट करण्यासाठी मदत करतो.
• रक्तपित्त समस्या असेल. नाकातून रक्त येणे यावर उपाय कुष्मांड उर्फ कोहळा खाणे लाभकारी असते. रक्त संग्राहक आहे.
• लघवीस साफ होत नसेल, मुतखडा होत असेल. तर कुष्मांड उर्फ कोहळा खात राहिल्यास मुतखडा तुकडे होऊन बाहेर जातो. व लघवी साफ होऊ लागते.
• शुक्रधातू वाढवण्यासाठी मदत करतो.
• शरीरातील उष्णता कमी करुन पित्त स्थिर ठेवतो. भूक वाढवतो.
• पोटातील किडे काढण्यासाठी बियांचे चूर्ण ३ ते ५ ग्रॅम घेणे फायद्याचे आहे.
• बुद्धी शांत करतो. आणि कामोत्तेजना वाढवतो.
• कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
• वापर कसा करावा ?
• रोज सकाळी याचा कुटून स्वरस काढून त्याचा ज्युस रोज १० ते ३० मिली घेणे फायद्याचे आहे.
• पेठा नावाची मिठाई बनवून खाल्ली जाते.
• भाजी करून तसेच सूप करुन खाल्ले जाते.
• आयुर्वेदिक औषधात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
• लागवड : पाणी निचरा होणारी उष्ण व दमट हवामानात चांगली वाढ होते. विशेषत पावसाळी ऋतूत लागवड करतात.
👉 https://amzn.to/3QyclOI
• टीप :
कुष्मांड उर्फ कोहळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते एक अन्न आहे. ते एक पौष्टिक अन्न आहे. आयुर्वेदात आहारात, आरोग्यात उपयोगी कुष्मांड उर्फ कोहळा आहे. त्याचे साइड इफेक्ट नाहीत. पण योग्य प्रमाणात घेणे फायद्याचे आहे.कुष्मांड / कोहळा / पेठा या फळाची आयुर्वेदिक महत्व
Kushmand / kohla / petha ya phalachi ayurvedic aushadhi mahiti



