रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

पानफुटी वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती Panfuti plants benefits of health

 पानफुटी वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती

Panfuti plants benefits of health

पानफुटी वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती  Panfuti plants benefits of health


• मराठी नाव : पानफुटी, घायमारी.

• हिंदी नाव : पथ्थरचट्टा.

• इंग्रजी नाव : Bryophyllum Pinnatum, Kalanchoe pinnata • मूळस्थान : मादागास्कर

• आढळणारे ठिकाण : उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात

पानफुटी वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती  Panfuti plants benefits of health


• रचना : ही वनस्पती एक ते दोन मीटर उंच वाढत असून या वनस्पतीचे खोड हे मऊ असते. तसेच ते हिरवट रंगाचे असते. पाने अंडाकृती असून त्यास नक्षी सारख्या लहान अर्धचंद्राकृती कडा असतात. कायम वर्षभर ही वनस्पती हिरवी असते. सदाहरित असते.


• लागवड : या वनस्पतीचे पान हेच लागवडी साठी वापरले जात असून पान हे मातीत गाडले जे  गेले किंवा पडले तरी ते रुजून त्यापासून पुन्हा निर्मिती या वनस्पतीची केली जाते. या वनस्पतीला बिया नसतात.

पानफुटी वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती  Panfuti plants benefits of health


पानफुटीचे औषधी गुणधर्म व उपयोग :

• किडनी मधील बिघाड, तसेच मूत्राशय विकार, यामध्ये लघवी साफ न होणे, तसेच मुतखडा झाल्यास या वनस्पतीच्या पानांचा रस काढून त्याचे सेवन करावे. असे सलग सेवन करत राहिल्यास मूत्राशयातील खडा बारीक होत जाऊन निघून जातो. तसेच मूत्राशय आजार देखील बरे होतात. मुतखडा रोगात या वनस्पतीस संजीवनी मानले आहे.

• शरीरावरील भागावर फोड उठल्यास पानफुटीच्या पानांना गरम करून बारीक करून त्याचा लेप लावावा. फोड बरे होतात.

• शरीरावर जखमा झाल्यास पानफुटीच्या पानांचा बारीक वाटून लेप लावत राहिल्यास असे सलग चार पाच दिवस केले असता जखम बरी होऊ लागते.

• पान फुटीच्या पांनाचा रस काढून त्याचे अर्क काढून त्याचे सेवन करत राहिल्यास उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मदत होते. रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच रक्त शुद्ध होते.

• डोके दुखी झालेली असेल तर पान फुटीची पाने वाटून त्याचा लेप डोक्यावर लावावा कपाळी चोळावा. डोकेदुखी कमी होते. विशेषत रात्री झोपताना लावल्यास खूप फायदा होतो.

• मूळव्याध रोगात पानफुटीच्या पानांचे सेवन करने लाभकारी असते.

• पोटासंबंधी विकारावर देखील पानफुटी उपयुक्त आहे.

• डोळ्यांची जळजळ होत असल्यास तसेच डोळ्यातून पाणी येत असल्यास, पान फुटीच्या पानांचा रस काढून डोळ्याच्या सभोवती लावून चोळल्यास डोळ्यांची जळजळ कमी होते. व डोळे निरोगी होण्यासाठी मदत होते.

पानफुटी वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती  Panfuti plants benefits of health

• डोकेदुखी असेल तर पानफुटीच्या पानांचा रस काढून त्यामधे नारियल तेल घालून कपाळावर लावावे. डोकेदुखी थांबते.
• स्त्रियांच्या योनी मार्गात संसर्ग झाला असेल तर पानफुटीच्या पानांचा काढा करून त्यामध्ये दोन ग्रॅम मध घालून ते मिश्रण सेवन केल्यास फायदा मिळतो. तो दिवसातून दोन वेळा तरी सेवन करावा.

पान फुटीचे सेवन कसे करावे?

• पानफुटीची पाने रोज सकाळी एक ते दोन रिकाम्या पोटी सेवन करावित.

• मुतखडा असेल तर पानांचा रस काढून त्यामध्ये मध घालून ते मिश्रण सेवन रोज सकाळी व संध्याकाळी करावे.

• पान फुटीच्या पानांची भज्जी व पकोडे करुन आपण खावू शकतो.

• पान फुटीची पाने रोज सकाळी गरम पाण्यासोबत देखील खाल्यास फायदा मिळतो.

• जर एखाद्या अजारावर औषध किंवा गोळ्या चालू असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप याचे सेवन करावे. तसे पाहता ही वनस्पती एक प्रकारचे अन्न आहे. त्यामुळे याच्या सेवनाने कोणतेही नुकसान होत नाही.

• हे आहेत पानफुटी वनस्पतीचे फायदे.

पानफुटी वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती

Panfuti plants benefits of health

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...