रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

लाजाळू वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती Lajalu plant benefits in Marathi

 लाजाळू वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती

Lajalu plant benefits in Marathi

लाजाळू वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Lajalu plant benefits in Marathi


• मराठी नाव : लाजाळू, लाजवंती,

• हिंदी नाव : लाजवंती, छुईमुई,

• इंग्लिश नाव : Tough me not / Mimosa Pudica

• आढळणारे ठिकाण : भारत देशात सर्वत्र.


• रचना : हे एक काटेरी झुडूप असून याची वाढ ही दोन ते तीन फूट वाढू शकते. काही वेळा ही भूमिगत विस्तारलेली असते.

• पाने :

या झाडाची पाने ही संयुक्त प्रकारची असतात. चिंचेच्या पानासारखी असून त्यापेक्षा आकाराने लहान असून स्पर्श केल्यावर मिटतात.

लाजाळू वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Lajalu plant benefits in Marathi


• खोड :

बारीक काटकीसारखे खोड असून त्यावर काटे असतात.

• फुले : या झाडाची फुले लहान गोंड्यासारखी असून त्यांचा रंग फिकट गुलाबी असतो.

• बिया : अत्यंत बारीक बिया असतात.

• हिंदू धर्मात तसेच आदिवासी भागात ही वनस्पती पूजनीय आहे.

लाजाळू वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Lajalu plant benefits in Marathi


लाजाळू वनस्पतीचे औषधी उपयोग:

• शारिरीक दुर्बलता कमी करण्यासाठी तसेच शरीरात तरतरी येण्यासाठी लाजळूच्या बियांचे चूर्ण करून दुधामध्ये घालून सेवन करावे लागते.

• शरीरावर जखमा झाल्यास लाजाळूच्या पानांना वाटून त्याचा चोथा जखमेवर लावल्यास जखम बरी होते.

• रक्तपित्ताचा त्रास होत असेल तर लाजाळूच्या पानांचा रस काढून तो २० ml घ्यावा रक्तपित्ताचा त्रास कमी होतो.

• मूळव्याधीचा त्रास असेल त्यावर आपण लाजाळूच्या पानांचा रस घ्यावा, तसेच त्याच्या बियांचे चूर्ण किंवा पानांचा चोथा मूळव्याध झालेल्या ठिकाणी जेथे कोंब आले असतील तेथे लावावा. त्याचा फायदा होतो. मूळव्याध बरा होतो.

• मुतखड्याचा त्रास होत असेल तर लाजाळूच्या पानांचा रस घेत राहिल्यास मुतखडा विरघळून जातो.

लाजाळू वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Lajalu plant benefits in Marathi


• योनिभस्म रोगात मास बाहेर येणे यावर लाजळूच्या पानांचा वाटून लेप लावत राहिल्यास बाहेर आलेला मासल भाग आतील बाजुस जाण्यास मदत होते.

• हाडे तुटणे, तसेच शरीरातील मांसपेशी दुखावणे यावर आपण लाजाळूच्या पानांचा रस सेवन केल्यास हाडे जोडण्यास मदत होते. तसेच मास पेशी तंदुरुस्त होतात.

• पोटात अल्सर झाल्यास तो बरा करण्यासाठी लाजाळू उपयुक्त होते. लाजाळूच्य पानांचा रस सेवन करत राहिल्यास अल्सर बरा होतो.

• वारंवार लघवीला जावे लागत असेल, तसेच मुत्राशयाजवळ जळजळ होत असेल. तर आपण लाजाळूची पाने वाटून बेंबीच्या खालील भागात त्याचा लेप लावावा. लघवी कमी होते. व किडणीवरील प्रेशर कमी होते.

• मूळव्याध, भगंदर रोगात लाजाळूच्या मूळांची व पानांची पावडर करून ती दुधातून घ्या. तसेच त्याची पेस्ट लावल्यास मूळव्याध कोंब गळून पडतात. व् ती बरी होते.

• पुरुषात वीर्य कमी निर्माण होत असेल, किंवा स्त्रियांमध्ये हार्मोन्सची कमतरता असेल तर लाजाळूची पाने १०० ग्रॅम घेवून ती ३००ml पाण्यात उकळून त्याचा काढा करून काही दिवस पित राहिल्यास वीर्य वृध्दी होते. व स्त्रियांत हार्मोन्स वाढतात.

• मधुमेह असल्यास लाजाळूच्या पानांचा रस पित राहिल्यास साखर नियंत्रित करण्यासाठी मदत होते.

• मूळव्याध असल्यास तसेच जखम असेल तर लाजळूच्या पानांचा रस किंवा बियांची पावडर दुधात टाकून सात ते पंधरा दिवस खाल्यास जखम व मूळव्याध बरी होते.

लाजाळू वनस्पतीचा वापर कसा करावा?

• लाजाळूच्या पानांचा रस काढून तो रोज सकाळी उपाशी पोटी घेवू शकतो.

• लाजळूच्या बिया बारीक वाटून पेस्ट करून त्या दुधातून आपण घेवू शकतो.

• गरम पाण्यात लाजाळूची पाने टाकून त्याचा काढा करून रोज सकाळी व रात्री घेवू शकतो.

आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप औषधे घेणे फायद्याचे ठरेल. तसे पाहता ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. तिचा विशेषत साईड इफेक्ट होत नाही.

अशी आहे 

लाजाळू वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती

Lajalu plant benefits in Marathi



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...