रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

हिरडा वनस्पतीची माहिती

  हिरडा वनस्पतीची माहिती

हिरडा वनस्पतीची माहिती


स्थान :

 भारत देशात सर्वत्र हिरडा हा वृक्ष आढळतो. तसेच दक्षिण व आग्नेय आशियात हिरडा वृक्ष आढळतो.

हिरड्याची अन्य नावे : 

मराठी भाषेत हिरडा, हिंदी भाषेत हरितक या नावाने ओळखला जातो.

हिरडा वनस्पतीची संस्कृत नावे :

हरितकी, हेमवती, अभया, पाचनी, श्रेयसी, प्रमथा, प्राणदा, प्रपथ्थ्या,

हिरड्याचे शास्त्रीय नाव : magnoliphyta

इंग्रजी नाव : Myrobalans.

हिरडा या झाडाची उंची :

२५ ते ३० मीटर वाढते.

खोडाची उंची

 ७ ते१० मीटर. लाकूड अत्यंत कठीण

साल

करड्या रंगाची साल त्यावर असंख्य चिरा असतात.

पाने : 

हिरडा वनस्पतीची माहिती


हिर्ड्याची पाने अडुळसा वनस्पतीच्या पानासारखी असतात. लांब, टोकदार, असंख्य शिरा असणारी हिरव्या रंगाची लंबगोलाकार असतात.

फुले :

हिरडा वनस्पतीची माहिती


फुले ही पांढरट – पिवळसर रंगाची असून ती फांद्यांच्या टोकाला व पानांच्या गेचक्यात असतात. नवीन फुलं सुवासिक असतात. जुन्या फुलांना उग्र गंध असतो.

फळे :

हिरडा वनस्पतीची माहिती


 फळे सुरवातीस हिरव्या रंगाची असतात. पिकल्यावर पिवसळ फिकट लांबटवर्तुळाकार असतात. आतील बाजूस बी एकच असून ती दगडासारखी कठीण असते.

• दोन ते अडीच वर्षाच्या झाडास बाळ हिरडा असे म्हणतात.

• दहा वर्षांचे झाड झाले की त्यास फळे लागू लागतात त्यास सुरवरी हिरडा म्हणतात.

हिरडा या वनस्पती च्या जाती :

 १) अभया,२) रोहिणी, ३) विजया,४) चेतकी, ५)जीवन्तिका ६) पुतना

हिरडा वनस्पतीची माहिती


बाळ हिरडा :

फळात बिया तयार होण्या अगोदर गळून पडणारे फळ, म्हणजे बाळ हिरडा होय. याचा वापर मुख्यतः लहान मुलांच्या औषधात करतात.

चांभार हिरडा :

थोडे अपरिपक्व झालेली हिरड्याची फळे चांभारी हिरडा या नावाने ओळखले जाते. याचा वापर कातडी कमावण्यासाठी केला जातो.

हिरडा वनस्पतीची माहिती


रंगारी हिरडा : 

रंग तयार करताना वापरतात.

सुरवारी हिरडा :

 पूर्णपणे जेव्हा फळ पक्व होते. त्यास सुरवारी हिरडा असे म्हणतात. याचा उपयोग औषध निर्मितीसाठी केला जातो.

हिरडा वनस्पतीचे औषधी महत्त्व :

हिरडा वनस्पतीची माहिती


त्रिफळा चूर्ण हे औषध तयार करण्यासाठी आवळा, बेहडा, यासोबत हिरडा या वनस्पतीचा उपयोग केला जातो.

• पोटदुखीचा त्रास असेल पोटाचे आजार असतील तर हिरड्याचे चूर्ण दिले जाते.

• शरीरात अशक्तपणा, कमजोरी असेल तर हिरडा चूर्ण दिले जाते.

• पोटात गर्मी जास्त झाल्यास तसेच पोट साफ होत नसेल तर हिरड्याचे चूर्ण घेतात.

• पोट व अन्य आजारावर हिरड्याची फळे पाण्यात भिजत ठेवतात. व नंतर ती उकळून ते पाणी रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी घेतल्यास बरे वाटते.

• हिरड्या मध्ये आंबट, कडू, गोड, तुरट, तिखट चव असल्याने कफ,पित्त, वात दोषावर तो गुणकारी आहे. फक्त सेवन करताना एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. म्हणजे योग्य मात्रा समजते.

• अतिसार, आव पडणे, यामध्ये हिरडा गुणकारी आहे. हिरड्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता सुधारते.

• कुष्ठ रोगात, इसब यासारख्या आजारावर हिरडा उपयुक्त आहे. पोट साफ करत असल्याने शरीरातील रस नीट राहतात. व रोगांना प्रतिबंध करतो.

• मूळव्याध या रोगात सैंधव मिठासोबत हिरडा चूर्ण खायला देतात. तसेच रक्त पडत असेल तर हिरड्या पासून बनवलेले कवाथ देतात. तसेच हिरडा बी उगाळून त्या जागी लावतात.

• हिरडा चूर्ण खाल्याने शरीरात हलकेपणा येतो. तसेच कफ दोष दूर करतो.

• वापरानुसार हरीतकी हिरडा, बाळ हिरडा व सूरवारी हिरडा असे प्रकार पडतात.

• हिरड्याच्या पक्व बिया वळवून त्या एरंडेल तेलात तळाव्यात नंतर त्याचे चूर्ण करावे. यामुळे हिरड्याचा रुक्षपणा कमी होतो. व एरंडेल तेलाचा स्निग्धपणा वाढतो. यामुळे विरंचक गुण वाढतो. त्यामुळे मलावरोध समस्या दूर करण्यासाठी तोंडाद्वारे एक चमचा चूर्ण रोज घ्यावे. त्यामुळे शरीरातील सर्व मलावरोध समस्या दूर होतील.

• दात घासण्यासाठी हिरडा चूर्ण वापरतात.

• हिरडा फळे भिजवून त्यापासून अंजन बनवतात. व डोळ्यात घालतात. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

• पोटातील अल्सर, जखमा यांवर हिरडा चूर्ण उपयोगी पडते.

• स्थूलपणा, अजीर्ण होणे यासाठी हिरडा चूर्ण घेतात.

• मधुमेह रोगात देखील हिरडा उपयोगी पडतो.

• हिरडा वृक्षाची साल, फळ, पाने मूळ या भागांचा वापर चूर्ण करताना करतात. यामध्ये जास्त साल व फळाचा वापर करतात.

• हिरड्याचे ऋतू नुसार वापर :

• चैत्र, वैशाख महिन्यात वसंत ऋतू असतो. तेव्हा हिरडा चूर्ण मधासोबत घ्यावे.

• ज्येष्ठ, आषाढ महिन्यात ग्रीष्म ऋतू असतो तेव्हा हिरडा चूर्ण गुळा सोबत घ्यावे.

• श्रावण, भाद्रपद महिन्यात वर्षा ऋतू असतो तेव्हा हिरडा चूर्ण सैंधव मिठासोबत घ्यावे.

• आश्विन व कार्तिक महिन्यात शरद ऋतू असतो तेव्हा हिरडा चूर्ण साखरे सोबत किंवा गुळासोबत घ्यावे.

• मार्गशीर्ष व पौष महिन्यात हेमंत हा थंड ऋतू असतो. तेव्हा आपण हिरडा चूर्ण सुंठ पावडरीसोबत घ्यावे.

• माघ व फाल्गुन महिन्यात शिशिर ऋतू असतो तेव्हा हिरडा चूर्ण आपण पिंपळी चुर्ण सोबत घ्यावे.

• अशा प्रकारे हिरडा हा बहुगुणी, वनौषधी, उपयुक्त आरोग्यदायी आहे.

हिरडा वनस्पतीची माहिती


हिरडा वनस्पतीची माहिती

हिरडा वनस्पतीचे लाकूड अत्यंत कठीण असते. ज्याचा उपयोग फर्निचर करण्यासाठी तसेच इमारत बांधकामात करतात.

असा आहे बहुगुणी हिरडा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...