रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

आघाडा आयुर्वेदिक वनस्पती व तिचे उपयोग Aghada ayurvedic medicine sharb

 • आघाडा आयुर्वेदिक वनस्पती व तिचे उपयोग
आघाडा आयुर्वेदिक वनस्पती व तिचे उपयोग  Aghada ayurvedic medicine sharb


आघाडा वनस्पतीचे संस्कृत नाम : अपामार्ग

हिंदी : अपामार्ग, चिरचीटा, चिरचिरा, लटजिरा, उंगा

आघाडा वनस्पतीचे इंग्रजी नाव : Rough chaff Tree.

स्थान : भारत देशात सर्वत्र आघाडा वनस्पती आढळते.

• पावसाळ्याच्या दिवसात आपल्या परिसरात एक रान वनस्पती म्हणून ओळखली गेलेली एक वनस्पती आघाडा आहे. ती कोठेही सर्वत्र आढळते. रस्त्याच्या कडेपासून ते डोंगराच्या भागात जिथे तिच्या बीजाचा प्रसार होईल. तेथे आघाडा वनस्पती आढळते.

• आघाडा एक झुडूप वर्गीय वनस्पती. तिची उंची साधारण तीन ते चार फूट असते. पाने एक ते दोन इंच लांबीची ते पाऊण इंच रुंद असणारी हिरव्या रंगाची त्यावर गुलाबी रंगाचे जून झाल्यावर क्वचित ठिपके असतात. व काहीवेळा छिद्रे ही पडतात.

आघाडा आयुर्वेदिक वनस्पती व तिचे उपयोग  Aghada ayurvedic medicine sharb


• खोड हिरव्या रंगाचे असून एखाद्या दांड्यासारखे दिसते.

• आघाड्यास हिरव्या रंगाची फुले व फळे येतात. फळं एखाद्या सातू सारखी असतात. त्यावर रेशमी तकतकी असते. व ते एखाद्या काट्यासारखे शेंड्यास असते. त्यामुळे कोणीही प्राणी या रोपट्या जवळून गेला तर त्याच्या अंगाला चिकटून त्यांचा बिजप्रसार होतो. रानात कोठे त्याचे बीज पडेल. तिथे त्या रुजतात.

आघाडा आयुर्वेदिक वनस्पती व तिचे उपयोग  Aghada ayurvedic medicine sharb


आघाडा वनस्पतीचे प्रकार :

आघाडा वनस्पतीचे दोन प्रकार असून १) लाल आघाडा २) पांढरा आघाडा

आघाडा वनस्पतीचे औषधी उपयोग :

• दात दुखत असतील तर आघाड्याची पाने चोळून त्याचा रस लावावा, दातदुखी थांबते.

• आघाडा ही वनस्पती वातदोष नाशक, हृदयरोग निवारण करणारी, भूक वाढवणारी आहे

• पोटदुखी झाली असेल तर आघाड्याची पाने चोळून त्याचा रस काढून प्यावा.

आघाडा आयुर्वेदिक वनस्पती व तिचे उपयोग  Aghada ayurvedic medicine sharb


• शरीरात चरबी वाढली असेल तर आघाडा वृक्षाच्या बिया उपयोगी पडतात.

• जुनाट खोकला, अस्थमा, दमा असेल तर तो दूर करण्यासाठी आघाडा क्षार घ्यावे.

( आघाडा रोपे उपटून ती वाळवून जाळावी, त्याची राख एका गाडग्यात घ्यावी. व त्यात पाणी भरावे. बारा तास ते तसेच ठेवावे, त्यानंतर खालचा गाळ सोडून वरील पाणी एखाद्या लोखंडी तव्यात किंवा कढईत घेऊन आटवावे. तळाला जे तव्याच्या क्षार जमतात ते आघाडा क्षार होय.)

• मूतखडा निर्माण झाल्यास आघाडा वृक्षाची पाने वाटून त्याचा रस काढावा. व तो वरचेवर प्राशन करावा. त्यामुळे मूतखडा तुकडे होऊन गळून पडतो.

• सर्दीने नाक जाम झाले, नाकातील हाड वाढले, तर आघाड्यांच्या बिया, मेहंदीची पाने, जाईचा पाला अन् सैंधव मीठ समान घेऊन ते मिश्रण एकत्र वाटून तिळाच्या तेलात शिजवून आठवावे. ते दिवसातून दोन ते तीन वेळा नाकात ड्रोपच्या साहाय्याने घालावे.

• दम्याचा उपचार करण्यासाठी अमावस्येच्या रात्री आघड्याची पाने घेऊन त्यामधे मिरी टाकून ते बारीक करून त्याच्या गोळ्या कराव्यात व रोज एक गोळी रात्री खावी दमा कमी होतो

• खोकला असेल तर आघाड्याची वाळलेली पाने चूर्ण करून ती रोज मधासोबत घ्यावीत. खोकला बरा होतो.

• अपचन ,मूळव्याध, जुलाबावर आघाड्यांच्या पानांचा रस काढून तो मध किंवा उसाच्या रसा सोबत घेतल्यास जुलाब थांबतात.

• शरीरावरील जखमा झाल्यास आघाड्यांच्या पानांचा चोथा लावावा.

• डोळ्याचे विकार व आजार यावर , काचबिंदू यावर आघाड्यांच्या मुळीचा रस उपयुक्त असतो.

आघाडा आयुर्वेदिक वनस्पती व तिचे उपयोग  Aghada ayurvedic medicine sharb


• एखाद्या स्त्रीची प्रसूती नीट व्हावी, म्हणून आघाड्यांच्या बिया पाण्यात भिजवून वाटून त्याचा लेप बेंबी व योनी भोवती पूर्वीच्या काळी सुईनी लावत असत. त्यामुळे प्रसूती वेदना विरहित होई.

हिंदू धर्म व आघाडा वनस्पती :

• हिंदू देवता गणेशाचे पूजन करताना दुर्वा सोबत आघाडा वाहिला जातो.

• मंगळागौरीची पूजा करताना दुर्वा व आघाडा वाहिला जातो.

 आघाडा वनस्पती ची भाजी देखील करून खाल्ली जाते.

अशी आहे आघाडा वनस्पतीची माहिती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...