Ativish vanaspati लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Ativish vanaspati लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २१ मार्च, २०२६

अतिविष वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती Ativish vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti

 

अतिविष वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती
Ativish vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti

अतिविष वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Ativish vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti


• नाव :

• मराठी भाषेत : अतिविष / अतिश .

• हिंदी भाषेत : अतीस / अतिविषा.

• संस्कृत भाषेत : अतिविषा, शिशुभेषज.

• इंग्रजी भाषेत : Indian Atees / Aconite

• शास्त्रीय नाव : ( Scientific Name) Aconitum heterophyllum


वनस्पती स्वरुप ( plant Structure)

• पाने : 

 साधी हिरवट रंगाची दातर्या असलेली, आकाराने मध्यम लंबगोलाकार असतात.

• फुले : 

निळसर जांभळ्या रंगाची फुले असतात. घाटीच्या आकाराची असतात.

• फळे : 

लहान शेंगेच्या रुपात फळे येतात. त्यामध्ये बिया असतात.

• खोड : 

सरळ हिरव्या रंगाचे थोडे नाजूक उंची सर्वसाधारण १ ते १.५ मीटर असते.

• मूळ : 

सर्वात उपयुक्त औषधी भाग , बारीक, लांब व गाठी असतात.

अतिविष वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Ativish vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti

गुणधर्म :

 लघू, रुक्ष, हलकेपणा.

• रस : तिख्त ( कडू).

• वीर्य : उष्ण

• विपाक : कटू

• त्रिदोष शामक आहे. वात, कफ, पित्त दोष निवारण करते.

• कडवी अतिश ही खरी औषधी गुणवत्ता असलेली आहे.

औषधी गुणधर्म ( Medicinal Benefits ):

अतिविष वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Ativish vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti

• पोटात दुखत असेल, जुलाब होत असतील, चिकट मल पडत असेल, तर यावर अतिश औषधी उपयोगी आहे.

बेलगिरी १०० ग्रॅम, अतिश १०० ग्रॅम व सुंठ १०० ग्रॅम वाटून चूर्ण सकाळ संध्याकाळ लस्सी सोबत घेतल्यास आतडी मजबूत होतात.

• सर्दी असेल तर १०० ग्रॅम अतिश मुळे पावडर, सुंठ १०० ग्रॅम आणि हळद १०० ग्रॅम घ्या. एकत्रित चूर्ण करा. एक चमचा पावडर आणि एक चमचा मध रोज चाटण जेवल्यानंतर एक तासाने करा. फायदा होईल.

• कोरडा व ओला खोकला असेल तर अतिश कडू व काकडा सिंधू १०० ग्रॅम दोन्ही घ्या चूर्ण करा. एक चमचा पावडर, एक कप पाण्यात उकळून अर्धा कप करावे. थंड झाल्यावर गाळून मध घालून चहा प्रमाणे पित राहावे. अबालवृद्द यांनाही चालते. खोकला बरा होतो.

• अस्वस्थता वाटत असेल, उलटी , मळमळ, गरगरने होत असेल तर अतिश कडवी ५० ग्रॅम, मुलेठी ५० ग्रॅम एकत्र करा. रोज अर्धा चमचा , एक चमचा मधात मिसळा व खा, चाटण करा. उलटी, मळमळ, गरगरने कमी होईल.

• शरीरावर कराट, फोड उठणे, किस्तूड उठणे, पस जाणे यावर अतिश व मंजिष्ठा पावडर एकत्रीत अर्धा चमचा जेवणानंतर एका तासाने सकाळ, संध्याकाळ सेवन करावे.

• भगंदर , मूळव्याध, मोठ्या आतड्याला सूज येणे यावर अतिश व हरड एकत्रित वाटलेले चूर्ण एक चमचा रोज सकाळ, संध्याकाळ जेवणानंतर एका तासाने घेतल्यास. मोठे आतडे स्वस्थ होऊन सूज कमी होते. फोड नष्ट होतात.

• डोकेदुखी, मानसिक आरोग्य खालावणे, निराश असणे, चक्कर, बेशुद्ध होणे या मेंदूशी निगडित समस्या यावर अप्पामार्ग १०० ग्रॅम, अतिश १०० ग्रॅम वाटून तिळाचे तेल २०० ग्रॅम घेऊन त्यात शिजवा. व गाळून तीन थेंब दोन्ही नाकात घाला,डोक्यावर व गळ्याला मालिश करा. असे एक आठवडा ते महिना करत राहिल्यास डोक्याच्या समस्या दूर होतात.

• हृदय, फुप्फुसे, यकृत म्हणजे लिव्हरला सूज आल्याने बिघाड झाल्याने तसेच अन्य औषधाने हात पाय सुजतात. तेव्हा अतिश १०० ग्रॅम, पुनरनवा १०० ग्रॅम, गोखरू १०० ग्रॅम वाटून पावडर एकत्रीत करा. एक चमचा रोज एक कप पाण्यात मिसळून उकळा अर्धा कप करा. मध घालून सकाळ संध्याकाळ घेत राहिल्यास मलमूत्राद्वारे संसर्ग निघून जातो. व आपली तब्येत ठीक होते.

• पोट अपचन, अँसिडिटी, जळजळ, ढेकर येणे, अमाशय आजार यासाठी अतिश १०० ग्रॅम, सुंठ १०० ग्रॅम, काळी मिरी ५० ग्रॅम पावडर करून एकत्र मिसळून डब्यात भरुन ठेवा. रोज एक चमचा सकाळ, संध्याकाळ जेवणानंतर गरम पाण्यासोबत खा. अमाशय व पचन तंत्र सुधारणेस मदत होते.

• प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुकलेले आवळा पावडर, मुलेठी व अतिश प्रत्येकी १०० ग्रॅम चूर्ण एकत्रित करा. रोज एक चमचा मधासोबत सकाळ संध्याकाळ जेवणानंतर एका तासाने सेवन करा. रस, रक्त, धातू नीट होऊन वृद्धी होते. शरीरात बॅक्टेरिया व दुष्ट व्हायरस राहणार नाहीत. शरीर स्वस्थ होते.

• कमजोरी शरीरात आल्यास. अंगदुखी, स्टिरॉइड वाढणे, अंग फुगणे, हाडे कमकुवत होणे. यावर उपाय अतिश व अश्वगंधा प्रत्येकी १०० ग्रॅम एक चमचा गाईच्या दुधात घालून सकाळ संध्याकाळ घेत राहिल्यास पाचन अग्नी सुधारते. भूक लागते. व हाडे रक्त, मज्जा, मास मजबूत होतात.

• पोटात किडे, जंत झाल्यास अतिश १०० ग्रॅम, वावडिंग १०० ग्रॅम पावडर एकत्रीत करा, अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ खा. किड निघून जाते. किंवा अतिश कडवी १० ग्रॅम पावडर घेऊन ती २० ते ३० ग्रॅम नारळ तेलात किंवा मोहरीच्या तेलात मिसळून उकळा. व थंड करून कापसाच्या बोळ्याने मुलाच्या गुदद्वारात लावा. किडे बाहेर पडतात.

• सेक्स समस्या पुरुष निर्माण झाल्यास अतिश १०० ग्रॅम, अश्वगंधा १०० ग्रॅम, सफेद मुसळी १०० ग्रॅम व कुंजच्या बिया १०० ग्रॅम एकत्रित वाटलेले चूर्ण एक चमचा पावडर गाईच्या दुधात घालून उकळा व त्यात मध घालून खात राहिल्यास सेक्स समस्या दूर होते.

• जुना ताप असेल. रस, रक्त, मास यामध्ये ताप मुरलेला असेल. थकवा येत असेल. तर चिरायत १०० ग्रॅम, गिलोय १०० ग्रॅम, अतिश १०० ग्रॅम पावडर एकत्रीत करून त्यातील एक चमचा मिश्रण एक कप पाण्यात मिसळून उकळा अर्धा कप करावे आणि जेवणानंतर एका तासाने सेवन करा. असे सलग आठवडा किंवा पंधरा दिवस करावे. ताप नाहीसा होतो.

• दम्याचा त्रास असेल तर अतिश १०० ग्रॅम, हळद १०० ग्रॅम, मुलेठ १०० ग्रॅम वाटून पावडर एकत्रीत करा. रोज सकाळी व सायंकाळी जेवणानंतर एक चमचा घेतल्यास श्वास व्यवस्था नीट होते. बडका कमी होतो. अस्तमा कमी होतो. थंड किंवा आंबट खाऊ नका.

• दूध पिताना दुधास वास येत असेल तर अतिश व शतावरी प्रत्येकी १०० ग्रॅम घेऊन त्यामध्ये लहान वेलदोडा वाटून एक चमचा चूर्ण सकाळ संध्याकाळ गाईच्या दुधात घालून उकळून घ्यावे. शरीर मजबूत होण्यास मदत होते.

अतिविष वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Ativish vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti

नुकसान/ महत्वाची सूचना :

मात्रे पेक्षा अधिक घेऊ नये. तसेच आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने वात, कफ, पित्त दोष पाहून मात्रा ठरवावी. लहान मुलांना अर्धा चमचा मात्रा वापरणे लाभदायक आहे. नाहीतर खाज, खूजली व उलटी, मळमळ सुरू होते. अती तेथे माती. अती विष नावाप्रमाणे विषारी असते. त्यामुळे योग्य प्रमाणात घेतल्यास अमृताचे कार्य करते.

अतिविष वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती

Ativish vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti

Aloe Vera Plant Information in English | Benefits, Uses and Ayurvedic Properties

🌿 Aloe Vera Plant Information in English | Benefits, Uses and Ayurvedic Properties ✨ Introduction Aloe Vera, known as Korphad in Marathi a...