• वासनवेल /पातालगारुडी / जलजमनी वनस्पतीची आयुर्वेदिक औषधी माहिती.
• ही वनस्पती भारतात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते.
• नावे :
• मराठी नाव : वासनवेल, पातालगारुडी.
• हिंदी नाव : जलजमनी.,अंबष्टा, पातालगारुडी
• इंग्रजी नाव : Velevetleaf / False pareira .
• संस्कृत नाव : पाठा , पाथा, अंबष्टा
• शास्त्रीय भाषेत नाव : cissampelos pareira
• वनस्पतीची रचना ( plant discription):
• खोड :
हिरवट रंगाचे, मऊ लवचिक असते. वेलवर्गीय असून इतर झाडावर चढते.
• पाने :
हृदयाच्या आकाराची गडद हिरवी मागील बाजूस रोमांच असणारी असतात. मऊ थोडी मखमली असतात. त्यावरील शिरा स्पष्ट दिसतात.
• फुले :
• लहान एक लिंगी, पिवळ्या रंगाची गुच्छ स्वरूपात येणारी असतात.
• फळे :
• लहान आकाराची वाटोळी गोलाकार वांगी कलरची.
• मुळे :
• लांब पांढरट असतात. जमिनीत खोलवर पसरलेली असतात.
• या वनस्पतीची पाने व मुळे औषधात वापरली जातात.
• औषधी गुणधर्म :
• गुण : मधुर, कटू.
• वीर्य : शीत गुणांची ही वनस्पती आहे.
• विपाक : कडू आहे.
• आढळणारे देश : भारत देशात सर्वत्र ही वनस्पती आढळते.
• वासनवेल, पातालगारुडी. वनस्पतीचे औषधी उपयोग :
• पुरुष वीर्यामध्ये शुक्राणू कमी असतील , स्त्रियांच्या मासिक पाळीत असलेला अनियमितपणा. असेल तर दहा पंधरा पाने पाट्यावर वाटून पानांचा स्वरस काढा तो एक चमचा व खडीसाखर व काळी मिरी पावडर एक, एक चमचा घालून घेत राहिल्यास मासिक पाळी नियमित होते. तसेच पुरुष शुक्राणू वाढतात. सलग आठवडा घ्यावे. पुरुषांनी जास्त दिवस घ्यावे.
• शुक्र स्तंभक असल्याने वरील उपाय प्रभावी होतो. पुरुष शुक्राणू वाढतात.
• अपचनाचा त्रास असेल, पोट साफ न होणे, अजीर्ण असेल, अतिसार असेल तर ही वनस्पती दीपन पाचन व अनुलोमक असल्याने पोटाचे विकार बरे करते. पचनसंस्था व्यवस्थित करते. यासाठी पानांचा स्वरस काढा व तो रोज एक चमचा खडीसाखर घालून घेणे लाभकारी आहे.
• त्वचा रोग असेल, लालसर डाग पडणे , खाज सुटणे, यासाठी पाने वाटून त्याचा रस त्वचेवर लावणे लाभकारी असते.
• रक्त अशुद्ध असेल तर त्यावर या वनस्पतीचा स्वरस एक चमचा खडीसाखर टाकून घेणे फायद्याचे असते. सलग दहा दिवस घेत राहिल्यास रक्त शुद्धी होते. आम वात आजारात रक्त शुद्ध करण्यासाठी ही औषधी वापरली जाते.
• कफ असेल व श्वसन आजार निर्माण होत असतील तर या वेलीच्या पानांचा रस खडीसाखरेसोबत घेत राहिल्यास कफ कमी होतो. व श्वसनाचे आजार कमी होतात.
• लघवी साफ न होणे, जळजळ, होणे, वेदना लघवी करताना होणे यासाठी या वनस्पतीच्या पानांचा रस खडीसाखरेसोबत घेणे उपयुक्त आहे. तसेच या वनस्पतीच्या मुळांचा काढा ही उपयुक्त आहे. अपचन होत असेल तर या वनस्पतीच्या मुळांचे चूर्ण एक चमचा खडीसाखर एक चमचा, आले रस एक चमचा हे मिश्रण रोज खाणे लाभकारी असते.
• विष नाशक म्हणून उपयुक्त औषधी आहे. दूषित विष शरीरातील काढण्यासाठी या वनस्पतीची पाने उपयुक्त आहेत.
• डेंग्यू रोगाचे तसेच अन्य विषाणू रोधक ही वनस्पती असल्याने या वनस्पतीचा वापर करुन HQCS नावाचे औषध बनवले जात आहे.
• आपल्याला जर वासनवेल /पातालगारुडी / जलजमनी या वनस्पतीपासून बनवलेली औषधी पहायची असेल. व तिच्यापासून बनवलेली औषधी जर हवी असेल तर आपण खालील वेबसाईटवर जाऊन पाहू शकता आणि खरेदी करू शकता
• टीप :
• कोणतीही औषधी घेत असताना जवळील आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे चांगले असते. तसेच दिलेल्या मात्रेत घेतल्यास लाभकारी आहे.
पाने पाहून वनस्पती निवडावी व ती उपयोगात आणणे फायद्याचे आहे. थोड्या मात्रेत औषध घेणे लाभकारी आहे.



