• आपटा वनस्पती संपूर्ण माहिती apta vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti
*ओळख (Introduction)
आपटा ही भारतात विशेषतः महाराष्ट्रात आढळणारी महत्त्वाची औषधी व सांस्कृतिक वनस्पती आहे. दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पाने वाटली जातात, म्हणूनच ती लोकजीवनात पूजनीय मानली जाते. आयुर्वेदातही या झाडाचे विविध अवयव औषधनिर्मितीत वापरले जातात.
• नावे (Names)
• मराठी : आपटा
• हिंदी : आपटा / बिदारी
• English. : Bidi Leaf Tree / Mountain Ebony (regional usage)
• संस्कृत. : आपट / कांचनार (प्रादेशिक संदर्भात)
• शास्त्रीय (Botanical) नाव : Bauhinia racemosa
• कुळ (Family) : Fabaceae (Leguminosae)
• झाडाची रचना व अवयवांची माहिती (Morphology)
• खोड (Stem) : मध्यम उंचीचे, लाकडी व फांद्यांनी भरलेले झाड
• सालीचा रंग : करडसर-तपकिरी; काहीसा खरबरीत
• पाने (Leaves) : गोलसर व मधोमध थोडी दुभंगलेली (गायीच्या खुरासारखी) कोवळी पाने मऊ, हिरवट; पाठीमागून पांढरट वाळल्यावर औषधी उपयोग, तीन ते सहा सेमी लांब असतात.
• फुले (Flowers) : लहान, पांढरी-हिरवट किंवा फिकट पिवळी, मंजिरी (clusters) स्वरूपात येतात
• फळे (Fruits) : शेंगेसारखी लांबट फळे (pods), वाळल्यावर फुटून बिया बाहेर पडतात.
• मुळे (Roots) : खोलवर जाणारी मुळे असतात. खडक दुभंगतात. आयुर्वेदात मुळांची साल औषधात वापरली जाते
• औषधी गुणधर्म (Medicinal Properties)
कषाय (Astringent), जंतुनाशक, दाहशामक (Anti-inflammatory), पचनसुधारक, रक्तशुद्धी करणारे
• आपटा वनस्पतीचा आयुर्वेदिक औषधी उपयोग माहिती आहे का ?
• (Ayurvedic Uses)
• जुलाब लागल्यास, जुलाबातून रक्त पडत असेल तर आपट्याची पाने किंवा फुले पाण्यात भिजत घालून ती पाट्यावर चेचून वाटून पानी टाकून रस काढावा. व काळी मिरी व कांद्याचा रस काढून पेशंटला देत राहिल्यास रक्ती जुलाब बरी होते. असे चार ते पाच दिवस देणे लाभकारी असते.
• आपट्याची पाने व काड्या चेचून त्याचा रस उन्हात सुकवून कात बनवा. तो ही पाण्यातून घेणे लाभकारी असते.
• ताप आल्यावर डोके दुखत असेल तर आपटा झाडाची पाने कुटून त्याचा रसपूर्ण चोथा ( कल्प ) डोक्यावर कपाळी लावावा. डोकेदुखी बरी होते.
• लघवी करताना जळजळ होत असेल तसेच खर जात असेल तर आपटा पानांचा रस व दूध एकत्रित घेणे फायद्याचे असते.
• एखादी शरीरावर जखम असेल. व ती दुखत असेल. व शरीरावर मुक्का मार लागून एखाद्या ठिकाणी दुखत असेल तर आपटा पानांचा रस किंवा चोथा लावून त्यावर चिकटपट्टी लावणे लाभकारी असते.
• लिव्हरला सूज आली असेल, तसेच इन्फेक्शन झाले असेल तर आपट्याच्या मुळांचा रस किंवा चूर्ण पाच ग्रॅम घ्या. ते पाण्यात टाकून उकळून त्याचा काढा करा. थंड करून रोज पित राहिल्यास लिव्हर सुज कमी होते. व इन्फेक्शन कमी होते.
• जखमेवर आपट्याच्या काड्यां पाण्याने धुवून त्याचा व पानांचा कल्प बांधून ठेवल्यास जखम बरी होते.
• आपटा मुळांचा काढा जंत झाल्यास घेणे लाभकारी असते.
• सतत तोंड येत असल्यास आपट्याची पाने व काड्यांचा काढा करून सतत चूळ व गुळण्या केल्यास तोंडातील फोड बरे होतात.
• विंचू चावला असेल तर पाने व मुळे यांचा कल्प चोळा, विंचवाचे विष उतरेल.
• पोटात दुखत असेल तर आपट्याची पाने चेचून रस काढा. व मिरेपूड टाकून ते घेतल्यास लाभ होतो.
• नाळगुत आजार असेल तर पायात किडे पडल्यास सूज आल्यास पाने व काड्यांचा काढा घेत राहिल्यास जंत बाहेर जातात. व सूज कमी होते.
• पित्त व कफ दूर करण्यासाठी आपटा पाने रस पाण्यात उकळून व गाळून थंड करून पिल्यास कफ, पित्त कमी होते.
• उष्णता वाढल्याने लघवी साफ होत नाही, जळजळ, लघवी कमी होणे यावर पाने भिजत घालून नंतर मिक्सरला बारीक करून घ्या व ते पाणी पिल्यास फायदा होतो.
• तळपायांना आग होणे, त्वचा कोरडी पडणे, तोंड येणे यावर उपचार आपट्याच्या पानांचा काढा आहे.
• शरीरात मुतखडा झाल्यास आपटा पाने सावलीत वाळवून त्याचे चूर्ण काढा बनवून किंवा रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी वस्त्रगाळ करुन पिल्यास मुतखडा पडतो. सलग आठ दिवस प्यावे. म्हणून याला अस्मांतक म्हणतात.
• थायरॉईड समस्या असेल तर आपटा पाने सावलीत वाळवून त्याचे चूर्ण तयार करून ते अर्धा चमचा मधासोबत रोज घेत राहिल्यास थायरॉईड आटोक्यात येते.
• अवयव नुसार वापर : झाडाचा भाग आयुर्वेदिक उपयोग
• साल (Bark) : अतिसार, आमांश, जखमा, सूज
• पाने : त्वचारोग, जखमांवर लेप
• फुले : कफ-विकार, खोकला
• बिया : जंतनाशक, पचनासाठी
• मुळे : वात-कफ दोष कमी करण्यासाठी
• आयुर्वेदात आपटा वात-कफ शमन करणारी वनस्पती मानली जाते.
• सांस्कृतिक महत्त्व (Cultural Importance)
हिंदू धर्मात या वनस्पतीस अती महत्व आहे.
दसऱ्याला “सोने” म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देण्याची परंपरा आहे. विजय, समृद्धी व शुभेच्छांचे प्रतीक ही पाने असतात
• नैसर्गिक महत्व :
• या झाडाला अस्मांतक म्हणतात. कारण खडक दुभंगून वाढण्याची क्षमता या झाडात आहे.
• विद्युत दृष्ट्या न्यूट्रल हा वृक्ष आहे. या झाडावर वीज पडत नाही.
• या झाडाच्या नैसर्गिक उगवन क्षेत्रात पाण्याचा साठा जवळ भूगर्भात निर्माण होत असतो.
• लागवड व संवर्धन (Brief)
कोरडवाहू व अर्धकोरड्या भागात सहज वाढते
कमी पाण्यात तग धरते
बीयांद्वारे लागवड
• निष्कर्ष (Conclusion)
आपटा (Bauhinia racemosa) ही औषधी, पर्यावरणपूरक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची वनस्पती आहे. पारंपरिक ज्ञान व आयुर्वेदात तिचा उपयोग शतकानुशतके केला जात आहे. योग्य मार्गदर्शनाखाली तिचा औषधी वापर केल्यास आरोग्यदायी लाभ मिळू शकतात.
• टीप: औषधी उपयोग करण्यापूर्वी वैद्य/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आपटा वनस्पती व कांचनार यात फरक आहे.
अशी आहे आपटा वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती apata vanaspti vishyi ayurvedic aushadhi mahiti





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही माहिती शैक्षणिक व सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कृपया वैद्यकीय सल्ल्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.