रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

कडुलिंब वनस्पतीNeem tree information in marathi

 कडुलिंब वनस्पती
Neem tree information in marathi

शास्त्रीय नाव : Azadirachta indica

कुळMeliaceae

कडुलिंब वनस्पतीची इतर नावे :

निंब, अरिष्ट, परिभद्र(संस्कृत) नीम (हिंदी) लिंब,बाळंतलिंब, कडुलिंब (मराठी)

कडुलिंब वनस्पतीNeem tree information in marathi
कडुलिंब वनस्पती
Neem tree information in marathi


कडुलिंब वनस्पती कोठे आढळते : 

भारतत देश, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ तसेच भारतीय उपखंडात सर्वत्र आढळते.

• कडुलिंब ही वनस्पती कधीही प्रदूषण करत नाही.

अवयव : 

खोड, मूळ, पाने, बी, साल हे अवयव या झाडाचे अत्यंत कडू असतात.

उंची : 

हा वृक्ष ३० ते ६० फुटापर्यंत वाढ होणारा असून दिसायला डेरेदार आहे.

मुळ

सोटमुळ असून हा वृक्ष भारतीय पठारी भागात मुख्यतहा आढळतो.

खोड : 

अत्यंत कठीण असे खोड व मजबूत असते. याच्या लाकडाचा उपयोग इमारत बांधकाम व पेट्या बनवण्यासाठी केला जातो.

पाने : 

या झाडाची पाने दात्री असून गडद हिरव्या रंगाची असतात. एखाद्या कापणीच्या खुरप्याच्या आकाराची असतात. त्यांना दोन्ही बाजूंनी दात्र्या असतात.

कडुलिंब वनस्पतीNeem tree information in marathi


फळे : 

या झाडाची फळे गोलाकार असून कच्ची असताना हिरव्या रंगाची असतात. तर पिकल्यावर पिवळी असतात. चवीला कडू असतात.

कडुलिंब वृक्षाचे औषधी महत्त्व :

कडुलिंब वनस्पतीNeem tree information in marathi


• कडुलिंबाच्या डहाळ्याच्या काड्या या कडू असतात. त्यांचा वापर दात घासण्यासाठी केला जातो. यामुळे दातातील कीड नष्ट होते.

• आयुर्वेदात या वृक्षास जंतू नाशक म्हणून मानतात. पोटातील कृमी नाशक म्हणून याच्या पानांचा रस वापरतात.

• गोवर, कांजिण्या रोगावर उपचार म्हणून कडुलिंबाचा पाला अंथरून त्यावर झोपवतात.

• सर्प विषावर तसेच शरीरात गर्मी वाढल्यास कडुनिंबाचा काढा देतात.

• पोटात जंत झाल्यावर पानांचा रस काढून तो गुळात कालवून खायला तीन - चार दिवस दिल्यास जंत पडून जातात.

• अंगाला खाज सुटली असेल. तर कडुलिंब पाला टाकून पाणी उकळून त्याने अंघोळ घालतात.

• ताप आल्यावर सकाळ संध्याकाळ कडुलिंब सालीचा काढा देतात.

• शरीरावर जखमा झाल्यास त्यावर कडुलिंबाचा पाला चेचून लावतात. जखमा बऱ्या होतात.

• दूषित रक्तामुळे शरीरावर त्वचेवर डाग पडल्यास कडुलिंबाचे तेल लावतात.

• कडुलिंब पावडर करून शेतात टाकल्यास ती कीड नाशक असते. तसेच खत म्हणून उपयोगी पडते.

• पायाला कुरूप झाले तर त्यावर रोज कडुलिंबाचे तेल रोज लावले तर ते बरे होते.

• फॅटी एसिड तेलात असते. त्यामुळे कडुलिंब तोंडावरील जखमा, मुरूमा बर्या करतो म्हणून त्याचा उपयोग त्वचा समस्या दूर करण्यासाठी करतात.

• कडुलिंब तेलात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्याने खराब त्वचा दुरुस्त करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

• कडुलिंबाचे झाड हे आक्सिजनचा प्रमुख स्तोत्र असल्याने तो ताजी हवा सोडतो. त्यामुळे आपल्याला निरोगी आयुष्य मिळते.

• फॅटीक एसिड , जीवनसत्व, बुरशीनाशक असल्याने त्वचेवर पडलेल्या सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

• कडुलिंबाची पाने उपाशीपोटी रोज सेवन केल्यामुळे मधुमेहापासून मुक्त होतो.

• कडुलिंबाची पाने रोज खाल्याने कर्करोगापासून मुक्ती मिळते.

• कडुलिंब घातलेले तेल वापरल्यास केस गळती थांबते.

• कडुलिंब तेलाने मालिश केल्यास सांधेदुखी व हाडे दुःखी बरी होते.

• डोक्यातील केसात कोंडा झाल्यास कडुलिंब पानांचा चोथा करून केसांना लावल्यास केसातील कोंडा नाहीसा होतो.

• कडुलिंबाच्या बियांपासून खत तयार करून शेतात टाकतात.

• असा हा कडुलिंब कफ,पित्त, कृमी नाशक, रक्त दोशांतक त्वचाविकार, डायबेटिस, जंत यावर फायदेशीर असतो.

• हा उत्तर भाद्रपदा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे 

Neem tree information in marathi


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...