शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari

 चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी

Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari

चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी  Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari


• हिंदी नाम : चींचुर्डे,

• मराठी नाम : चींचुरडी,

• वनस्पती प्रकार : 

यह एक पौधा है lबारिश के दिनो मे उगने वाला, बेंगन की तरह दिखने वाला, इसके पत्ते भी बेंगन की तरह ही है l यह हमारे आस पास के नदी के राह के अगल - बगल उगने वाला तथा पहाडी पर उगने वाला एक पौधा है l जून महिने से यह उगने शुरु होता है l और ऑगस्ट से नव्हंबर तक इसे फुल, फल लगते है l

• कद: 

 इस वनस्पती का कद चार या पाच फूट उंचा इसका कद होता है l

चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी  Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari


• पत्ते :

 बेंगन के पौधे की तरह इसके पत्ते होते है l

• फल: इस वनस्पती के फल नन्हे टमाटर की तरह दिखते है l इनकी सब्जी बनाकर खाते है| पकने पर पिले हो जाते है l इनका स्वाद कडवा होता है l

चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी  Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari


चींचुर्डी के बारे मे आयुर्वेदीक जाणकारी :

• चींचूर्डी के फल पित्त शामक होते हैl इस कारण जिन्हे पित्त के विकार होते है l वह लोग अगर इसकी सब्जी बनाकर खाते है l तो उनका पित्त विकार नियंत्रण मे रहता है l

• पित्त के साथ वेदनाशामक गुणधर्म इन फल मे होणे के कारण कमर दर्द होणे वाले लोगोंको इसका इस्तेमाल करना चाहिए कमर दर्द से राहत देता है l

चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी  Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari


• जीन लोगों को कफ, वात, पित्त विकार है l उन लोगो के लिये रामबाण है यह चींचूर्डी के फल की सब्जीl उन्हे इसे खाना लाभकारी है l

• पेट साफ न होणा, इस समस्या का उपाय है यह चींचूर्डी की सब्जी l

• भूक अगर न लगती हो तो यह चींचुर्डी खाना लाभकारी है l


महत्त्व पुर्ण जाणकारी :

चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी  Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari
भुईरिंगणी एक जहरीला पौधा

चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी  Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari
रिंगणी एक जहरीला पौधा 


• चींचुर्डी के तरह भुई रिंगनी और रिंगनी का पौधा होता है l उसके पत्ते भी इस तरह होते है l लेकीन उसके फल हरे बेंगन की तरह होते है l लेकीन यह जहरीले पेड है l इसका सेवन अपनी सेहत के लिये हानिकारक है l


रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti

 चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती

Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti


• मराठी नाव : चिंचूर्डी


• वनस्पती प्रकार : 

ही एक रान वनस्पती असून ती कुठेही पहाडी भागात अथवा नदीकाठी रस्त्याच्या कडेला आढळते. हे एक रोपवर्गीय झाड आहे. पावसाळी दिवसात हे उगवते दोन ते चार फूट उंच असते. ऑगस्ट ते नोव्हेंबर मध्ये यांना फळे लागतात.

• पाने : 

या वनस्पतीची पाने वांग्याच्या झाडासारखी असतात. त्या प्रमाणेच काटे असून मधून बारीक जांभळी शेड असते.

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti


• फुले : 

लहान आकाराची वांग्याच्या झाडासारखी फुले येतात.

• फळे : 

लहान टोमॅटो किंवा कांगुण्यासारखी हिरवट फळे असून त्यावर हिरवे देठ असतात. ती एके जागी चार ते पाच या संख्येत असतात. यांची चव कडवट असून त्यांची कोवळी कोवळी फळे काढून भाजी केली जाते. पिकल्यावर ही फळे पिवळ्या रंगाची दिसतात.

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti


• चींचुर्डी(चिंचूरडे) फळांचे आयुर्वेदिक औषधी महत्त्व :


• चिंचूर्डीची फळे पित्त शामक असतात. पित्त विकार असलेल्या लोकांनी या झाडाची फळे भाजी करून खाल्यास पित्त विकार कमी होण्यासाठी मदत करतात. सुरवातीस कडू नंतर गोडसर चव लागते.

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti


• वेदना शामक गुणधर्म या फळात असल्याने कंबरदुखीसाठी देखील या फळांची भाजी खाल्ली जाते.

• कफ, पित्त व वात दोष असणाऱ्या लोकांसाठी या फळांची भाजी उपयुक्त असते.

• पोट साफ होण्यासाठी मदत करते.

• भूक लागत नसेल तर भूक वाढवण्याचे काम चिचुरडे करते.

• महत्त्वाची सूचना :

चिंचुर्डे सारखी रिंगणी किंवा भुई रिंगणी असते. तिची पाने देखिल याच पानासारखी मात्र थोडी आकाराने मोठी असतात. त्याची फळे लहान वांग्यासारखी असतात. ही विषारी आहे. ती खावू नये.

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti
विषारी भुईरिंगणी

चिंचूर्डी वनस्पती विषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Chinchurdi vanspati vishyi ayurvedik mahiti
विषारी रिंगणी

  • वरील दोन्ही झाडे व फळे चींचुर्डी सारखी दिसतात. पण विषारी आहेत. खावू नयेत.

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

कुडा वनस्पतीविषयी आयुर्वेदिक औषधी माहिती Kuda vanaspati vishyi ayurvedic mahiti

 कुडा वनस्पतीविषयी आयुर्वेदिक औषधी माहिती

Kuda vanaspati vishyi ayurvedic mahiti

कुडा वनस्पतीविषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Kuda vanaspati vishyi ayurvedic mahiti


• मराठी नाव : कुडा,

• हिंदी नाव : दुधा, कुर्या,

• संस्कृत नाव : कुटज,

• काश्मिरी नाव : कोर,

• बंगाली नाव : कुर्ची,

• गुजराती नाव : कडो,

• तमिळ भाषेतील नाव : कुटचप्पालै,

• इंग्रजी नाव : Holarrhena Pubescence,

• वनस्पती शास्त्रीय नाव : Holarrhena antidysentarica,

• कुळ : करवीर,


कुडा वनस्पतीच्या जाती :

१)पांढरा कुडा, २) काळा कुडा, पांडू कुडा ३) तांबडा कुडा,

कुडा वनस्पतीविषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Kuda vanaspati vishyi ayurvedic mahiti


• वनस्पती प्रकार : 

ही एक झुडूप वर्गीय वनस्पती आहे.

• पाने : 

या झाडाची पाने साधे पान या प्रकारात मोडतात.


• फुले : 

या झाडास पांढरट रंगाची फुले येतात. स्वस्तिक, तगर किंवा मोगर्याच्या फुलासारखी दिसतात. सुगंधी असतात.


• फळे : 

या झाडाला चवळी सारख्या शेंगा लागतात. त्यामधे बिया असतात.

कुडा वनस्पतीविषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Kuda vanaspati vishyi ayurvedic mahiti


• बिया : 

फळात असणाऱ्या लहान बिया दिसायला जवाच्या बियांसारख्या असतात. त्यांना इंद्रजव म्हणून ओळखतात. याची चव थोडी कडू, तुरट चवीच्या बिया असतात. या बियांचा विशेषत आयुर्वेदिक औषधात वापर केला जातो.


• मुळे :

 वाकडी तिकडी उदाच्या रंगाची याची मूळे असतात.

• साल : 

या झाडाच्या सालीचा उपयोग हा विशेषत आयुर्वेदिक औषधात वापरतात.



कुडा वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी महत्त्व:


• कुडा वनस्पती दीपक स्तंभ असल्याने ताप, ज्वर कमी करणारी असल्याने एखाद्या व्यक्तीस ताप आला असेल. तर कुडा वनस्पतीच्या सालीचा काढा करून दिल्यास ताप कमी होण्यासाठी मदत होते. कुडाच्या सालीचे चुर्ण घेत राहिल्यास हिवताप होत नाही.

• कुडा वेदना शामक आहे, सांधे दुखी असेल, जॉइंट पेन म्हणजेच हाडांच्या जोडातील दुखणे असेल, तसेच आमवाताचा त्रास होत असेल तर कुडा वनस्पतीची साल काढून ती सावलीत वाळवा, सुंठ व हिरडा चुर्ण घेवून सकाळ संध्याकाळ सलग तीन महिने घेत राहिल्यास सांधे दुखी विकार कमी होण्यासाठी मदत होते.

• अतिसार म्हणजेच हगवण असेल तर कुडाच्या सालीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ एक चमचा घेतं राहिल्यास अतिसार समस्या कमी होण्यास मदत होते.

• दात दुखी झालेली असेल तर कुडाच्या सालीचा काढा करून त्या पाण्याने गुळण्या केल्यास दात दुखी थांबते.

• क्षार धर्मीय , अल्कोहोल असणाऱ्या तसेच पाण्यात कुडा वनस्पतीचे चूर्ण सहज मिसळते. जर पाण्यात आम्ल प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर कुडा वनस्पतीचे चुर्ण जास्त प्रमाणात मिसळते, विरघळते.

• कुडा वनस्पतीची साल व बिया रक्त संग्राहक व वेदनाशामक आहेत. यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा कळा येत असतील तर त्यावर कुडा वनस्पतीची साल उपयुक्त आहे. रक्त वाढवणारी आहे.

कुडा वनस्पतीविषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Kuda vanaspati vishyi ayurvedic mahiti


• रक्ती मूळव्याध असेल तर कुडा वनस्पतीच्या शेंगातील बिया ज्यांना इंद्रजव म्हणतात या बियांचे भाजून केलेले चुर्ण चवीला थोडे कडवट - असते. त्याचे चिमुटभर चूर्ण सेवन केल्यास रक्ती आव, मूळव्याधीवर ती प्रभावी औषधी आहे. त्यामुळे ती बरी होण्यास मदत होते. तसेच कुडाच्या पानांच्या विड्या ओढल्याने किंवा इंद्रजव चूर्ण रोज खाल्याने मूळव्याध बरा होतो. रक्त येणे देखील बंद होते.

• इंद्रजवाच्या सेवनाने पोटात वायू धरत नाही. व भुख ही खूप लागते. पोटात वेदना असतील पोटशूळ असेल तर कमी होण्यासाठी बेंबी भोवती इंद्रजवाचे तेल चोळावे. आराम मिळतो.

• कुडाच्या कोवळ्या शेंगा घेवून त्यांची भाजी करून खाल्यास पोटातील जंत नष्ट होण्यास मदत होते.

कुडा वनस्पतीविषयी आयुर्वेदिक औषधी माहिती  Kuda vanaspati vishyi ayurvedic mahiti


• उलटी होत असेल तर इंद्रजवाचा काढा करून त्याच्या सेवनाने उलटी थांबण्यास मदत होते.

• दात दुखी असेल तर कुडाच्या सालीचा काढा करून घेऊन गुळण्या कराव्यात. तसेच हिर्डीतून रक्त येत असेल. मुखदुर्गंधी यावर इंद्रजवाचे चूर्ण चोळावे. हिरड्या घट्ट होतात. व मुखदुर्गंधी दूर होते.

• जुनाट दमा असेल तसेच फुफुसा संबंधी आजारावर इंद्रजव चूर्ण उपयोगी असते.

• कुटजारिस्ट औषध हे कुडा वनस्पती पासून बनवले जाते. जे वरील सर्व रोगांवर उपयुक्त आहे. हे पांढरा कुडा वनस्पती पासून बनवले जाते.


टीप : 

कुडा वनस्पती चे औषधी उपयोग करताना आयुर्वेदीक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेणे फायद्याचे असते.

•अशी आहे कुडा वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती Kuda vanaspati vishyi ayurvedic mahiti 


सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४

अमरवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती Amarvel vanaspati vishyi mahiti

 अमरवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती
Amarvel vanaspati vishyi mahiti
अमरवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Amarvel vanaspati vishyi mahiti


• मराठी नाव : अमरवेल, आकाशवेल,

• हिंदी नाव : अंबरवेल,

• इंग्रजी नाव : cascuta


• वनस्पती प्रकार : 

 ही एक परोपजीवी वनस्पती असून ही दुसऱ्या वनस्पतीवर वाढून तिच्यातील अर्क सेवन करते. जंगलातील विशाल झाडावर ती वाढते. दिसायला पिवळसर रंगाची ही वेल संपूर्ण परिसर व्यापून टाकते.

अमरवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Amarvel vanaspati vishyi mahiti


• पाने : 

या वेलीची पाने लहान आकाराची साधे पान या प्रकारात मोडतात.

• फुले : 

 पांढरट रंगाची लहान लहान फुले या वनस्पतीस येतात.

• फळे : 

पिवळसर रंगाची लहान फळे या वनस्पतीस येतात.

अमरवेल वनस्पतीचे आयुर्वेदिक फायदे :

अमरवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Amarvel vanaspati vishyi mahiti


• डोक्याचे केस गळत असतील , टक्कल पडत असेल, केस पांढरे पडत असतील तर अमर वेल घेवून ती वाटून ती पाण्यात उकळून घ्या व अंघोळ केल्यानंतर त्या पाण्याने आपले केस धुतल्यास केस गळणे थांबून मजबूत होतात. व नवीन केस उगवण्यासाठी सुरुवात होते. सलग तीन चार महिने हा प्रयोग करावा.

केसांच्या आरोग्यासाठी अमरवेल पावडर घेऊन ती खोबरेल तेलात घालून उकळून ते तेल डोक्यास लावल्यास देखील फायदा होतो.

अमरवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Amarvel vanaspati vishyi mahiti


• मेहंदी मध्ये अमरवेलं पावडर टाकून त्याची पेस्ट केसांना लावावी केसांचे आरोग्य सुधारते.

• लहान मूल अथवा कोणी पुरुष वा स्त्री यांचा शारीरिक विकास थांबलेला असेल, थकवा जाणवत असेल तर देशी गाईच्या तुपातून रोज अर्धा चमचा अमरवेल वाळवून केलेली पावडर खायला दिल्यास विकासास मदत होते. थकवा निघून जातो. व जोश निर्माण होतो.

• अमरवेल पावडर सेवन करत राहिल्यास पुरूषातील स्टेस्थोस्टेरोन वाढवते. प्रजनन क्षमता वाढवून मांसपेशी मजबूत करते.

• एखादया स्त्रिस गर्भधारणा होत नसेल , गर्भ स्थिर राहत नसेल तर शुक्राणू कमी होणे यावर अमरवेल उपयुक्त आहे. यासाठी अमरवेल पावडर चमचाभर खाणे रोज उपयुक्त आहे. याने गर्भधारणा होण्यास मदत होते. व पुरुषाचे शुक्राणू वृध्दी होण्यास व वीर्य दाट होण्यास मदत होते. स्त्रियांनी मासिक पाळी झालेल्या पाचव्या दिवसापासून घेणे फायद्याचे असते.

• शरीरावर जखम झाल्यास अमरवेल तोडून ती वाटून त्याचा लेप लावल्यास जखम बरी होण्यासाठी मदत होते. ती शीत गुणक पित्त शामक असल्याने जखमेची जळजळ कमी करण्याचे काम करते.

• डोळ्यांना सूज आल्यास अमरवेल घेवून वाटून त्याचा रस डोळ्याच्या बाजूने लावल्यास शितलता येते. जळजळ कमी होते.

• लिव्हर मध्ये खराबी आल्यास तसेच लिव्हरला सूज येणे व इतर व्याधी निर्माण होणे यावर अमरवेल पावडर खाणे फायद्याचे असते. तसेच ओलसर अमरवेल घेवून वाटून तिचा रस पंधरा ते दहा ml घेणे फायद्याचे असते. तसेच अमरवेल वाटून त्याचा चोथा व रस बेंबी भोवती लावणे देखील फायद्याचे असते.

अमरवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Amarvel vanaspati vishyi mahiti


• तोंडात फोड येतात.त्यावर अमरवेल पानांचा रस किंवा गाठीची पावडर किंवा रस काढून त्यावर लावल्यास फायदेशीर आहे.

• शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करून हृद्यासंबंधी आजार बरे करण्यासाठी अमरवेल उपयुक्त आहे.

अमरवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Amarvel vanaspati vishyi mahiti


• आयर्न, कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन सी असल्याने आनिमिया रोगात अमरवेल उपयुक्त असते.

• किडनीला सूज आल्यास तसेच किडनी दोष घालवण्यासाठी अमरवेल पावडर किंवा रस लाभकारी असतो. मुत्रविकार बरे करण्यासाठी मदत करते.

• पचन शक्ती सुधारते. व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अमरवेल उपयुक्त आहे. यासाठी अमरवेल घेवून ती वाटून तिचा रस खाणे फायद्याचे असते. किंवा त्याचा चाळीस ते पन्नास ml काढा करून पिणे चांगले असते. याने आतड्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

अमरवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Amarvel vanaspati vishyi mahiti


• पुरुष अंडकोश वृध्दी होऊन सूज आल्यास अमरवेल घेवून त्यास वाटून ती लावल्यास सूज कमी होते.

• त्वचा रोग असेल तर अमरवेल घेवून त्याचा रस काढून तो लावत राहिल्यास त्वचा रोग बरा होण्यासाठी मदत होते. तसेच त्याचा वाटून चोथा लावल्यास देखील फायदा होतो.

• बद्धकोष्ठता, बवासिर, रक्ती मूळव्याध असेल अमरवेल रस दहा ml तसेच दोन ते तीन काळी मिरी घालून रोज खात राहिल्यास फायदा होतो.

• शारीरिक कमजोरी असेल तर अमरवेल घेवून एका क्वाटनच्या रुमालात बांधून ती दोन कप दूध घेवून त्यात पानी थोडे घालून ते एका भांड्यात घेवून ती पोटली त्यात टाकून उकळा, थोडया वेळाने दूध पाणी आटून अर्धे झाले की ती पोटली काढून ते दूध पिल्यास शरीरात जोश येतो.

• हाडे मजबूत करणे यासाठी फडक्यात बांधून ती दुधात घालून शिजवून ते दूध पिणे फायद्याचे असते .

• तसेच सांधे दुःखी, गुडघे सुजणे यावर अमरवेल पाण्यात गरम करून ती फडक्यात बांधून शेक देणे लाभकारी असते.

• साखर मधुमेह रुग्णासाठी अमरवेलीच्या बिया वाटून त्याचे चूर्ण करून ते पाच ग्रॅम पर्यंत दिल्यास ब्लड शुगर म्हणजेच मधुमेह नियंत्रणात येण्यासाठी मदत होते.

अमरवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Amarvel vanaspati vishyi mahiti


अमरवेल खाताना घ्यावयाची काळजी :

• अमरवेल आहारात घेताना पित्त, वात, कफ विकार लक्षात घेवून तज्ञ वैद्यकीय आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेणे फायद्याचे असते.

• गर्भवती स्त्रियांनी वैद्याच्या सल्याने अमरवेल चूर्ण खाणे फायद्याचे असते.

• अशी आहे अमरवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती.

• Amarvel information in Marathi


सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

वावडिंग वनस्पती विषयी माहिती Vavding plant benefits and information in Marathi

 वावडिंग वनस्पती विषयी माहिती

Vavding plant benefits and information in Marathi

वावडिंग वनस्पती विषयी माहिती  Vavding plant benefits and information in Marathi


• मराठी नाव : वावडिंग,

हिंदी नाव : वायविडिंग/ विडंग/ बायविडंग,

• Latin Name : Emblia Ribes,

• गुजराती नाव : बावडिंग,

• बंगाली भाषेत नाव : बिडंग,

वावडिंग वनस्पती विषयी माहिती  Vavding plant benefits and information in Marathi


“विडंग कटू तिक्ष्णोष्णम रुक्षम वन्हीकरम लघू l शुलोध्मानोदार श्लेष्मकृमि वातविबंधनुत ll”

-भाव प्रसाद निघंटू

• रस : कडू,

• विपाक : कडू,

• वीर्य : उष्ण,

• गुण : लघू, रुक्ष, तीक्ष्ण,


• वावडिंग हे तीख्त, उष्ण गुणधर्म असणारे, हलके गुणधर्म असल्याने कफ व वात विकार दोष कमी करण्याचे काम करते. मात्र पित्त दोष वाढवणारे औषध आहे.

वावडिंग वनस्पती विषयी माहिती  Vavding plant benefits and information in Marathi


• वनस्पती : 

ही एक जंगलात आढळणारी झुडूप वर्गीय वनस्पती असून ती एका रोपा सारखी आहे. तिला साधी पाने असून यास लागणारी लहान लहान फळे जी काळया मिरी सारखी दिसतात. त्याचा उपयोग हा विशेषत औषधात केला जातो.


वावडिंग वनस्पतीचे औषधी उपयोग :

वावडिंग वनस्पती विषयी माहिती  Vavding plant benefits and information in Marathi


• वावडिंग हे कृमी, कीटक नाशक आहे. दात किडले असतील, दातांना कीड लागलेली असेल तर वावडिंगची पावडर पाण्यात टाकून काढा करावा. व तो आपल्या तोंडात धरून ठेवावा. दातातील कीड नष्ट होईल.

• त्वचा विकार : 

 वावडिंग कुष्ठघ्न आहे. त्यांचे चुर्ण करावे.पाण्यात घालून पेस्ट करावी व त्वचेवर जर खरूज, उठल्यास, अथवा संसर्ग झाल्यास त्यावर लेप लावावा. त्वचा रोग बरा होतो. तसेच त्वचा निखारण्याचे काम करते. चर्म रोगावर उपायकारक, त्वचे संबंधी समस्येवर उपयुक्त वावडिंग आहे.


• सर्दी पडसे असल्यास, डोक्यात सर्दी साठून डोकेदुखी असेल. तर वावडिंगचे तेल आपल्या नाकात दोन ते तीन थेंब टाकावे. कफ पातळ होऊन निघून जातो. व डोकेदुखी थांबते. तसेच डोक्यास तेलाची मालिश करावी, डोकेदुखी थांबते.

वावडिंग वनस्पती विषयी माहिती  Vavding plant benefits and information in Marathi


• पचन संस्था : 

अन्न पचन होत नसेल, अजीर्ण झाल्यास, जेवण नीट पचत नसेल, पोटात कृमी, जंत झाल्यास, तसेच गॅसेस प्रॉब्लेम असेल, मलोस्तर्जन नीट होत नसेल पोट फुगी होत असेल,तर वावडिंग चूर्ण पाव चमचा दिवसातून दोन वेळा मद किंवा गूळ अथवा गरम पाण्यात टाकून सेवन करावे. तसेच झोपण्यापूर्वी एरंडेल तेल एक चमचा किंवा त्रिफळा चुर्ण एक चमचा खावे. कृमी कीटक नाश पावतात. तसेच पोट साफ होण्यासाठी मदत होते. तसेच लहान मुलांना पोटात जंत, किडे झाल्यास विडंग चूर्ण व अजवाईन चूर्ण गरम पाण्यात घालून काढा करून दिले जाते. यामुळे शरीरातील जंत नष्ट होतात. व पोट साफ होते.


• मूत्र विसर्जन क्रियेमध्ये जर लघवी करताना जळजळ होत असेल, युरीन समस्या यावर विडंग चुर्ण उपयुक्त आहे.


• डायबिटीस म्हणजेच मधुमेह असल्यास विडंग चूर्ण, हळद, मुलेठी, गोक्षूर व सुंठ एकत्र सम प्रमाणात घेवून त्याचे मधासोबत घेणे फायद्याचे असते.

• रक्ताभिसरण : 

रक्त शुद्ध करते, व रक्ताभिसरण सुधारते.

वावडिंग वनस्पती विषयी माहिती  Vavding plant benefits and information in Marathi


• नाडी व मेंदू संबंधी समस्या :

मेंदूशी संबंधीत आजार,वारंवार झटके येणे, पक्षाघात म्हणजे प्यारेलेसिस मध्ये उपयुक्त वावडिंग आहे. यासाठी वावडिंग चूर्ण , लसूण व दूध यांचे मिश्रण घेवून त्यामधे पानी घाला. व ते गरम करून आटवून निम्मे करा. असा क्षीर पाक करुन गाळून प्या. पक्षाघात बरा होण्यासाठी मदत होते.

वावडिंग वनस्पती विषयी माहिती  Vavding plant benefits and information in Marathi


वावडिंग सेवन कसे करावे?

• वावडिंग फळाचे चूर्ण घेवून ते दोन, तीन चमचे गरम पाण्यात टाकून घेणे फायद्याचे असते.

• पाच ते दहा ग्रॅम विडंग चुर्ण घेवून गरम पाणी, दूध व मद यासोबत घेता येते.

• विडंग बियांचे चूर्ण पाण्यात टाकून त्याचा उकळून काढा करावा, तो काढा करून घेताना दहा ते पंधरा m l एका वेळी घेणे फायद्याचे असते.


• हे आहेत वावडिंग फळाचे आयुर्वेदिक औषधी महत्त्व Vavding plant benefits and information in Marathi


सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

अगस्त्या या आयुर्वेदीक औषधी वनस्पतीविषयी औषधी माहिती, Agstya Aurvedik vanaspati information in Marathi

 अगस्त्या या आयुर्वेदीक औषधी वनस्पतीविषयी औषधी माहिती, Agstya Aurvedik vanaspati information in Marathi

अगस्त्या या आयुर्वेदीक औषधी वनस्पतीविषयी औषधी माहिती, Agstya Aurvedik vanaspati information in Marathi


• मराठी नाव : अगस्त्य,

• महाराष्ट्र कोकण प्रदेश नाव : हादगा.

• संस्कृत भाषेतील नाव : अगस्त्य, मुनिद्रुम, कुंभयोनी,

• हिंदी नाव : अगस्त्य, बासना, हतीया,

• कन्नड नाव : अगासे, केपागण,

• इंग्रजी नाव : Scarlett Wisteria

• वनस्पतीस शास्त्रीय नाव : Sesbania grandiflora,

अगस्त्या या आयुर्वेदीक औषधी वनस्पतीविषयी औषधी माहिती, Agstya Aurvedik vanaspati information in Marathi


• स्थान : दक्षिण आशिया, आग्नेय आशिया या ठिकाणी ही वनस्पती विशेषत आढळते.

• अगस्त्य झाडाची उंची : 

 सरासरी ८ ते १० मीटर उंच हे झाड असते.

• आयुर्मान : 

सरासरी ३ ते ४ वर्ष या वनस्पतीचे आयुर्मान आहे.

• पाने : 

संयुक्त पान प्रकारात या झाडाची पाने आवळा या वनस्पतीच्या पानासारखी असतात.

अगस्त्या या आयुर्वेदीक औषधी वनस्पतीविषयी औषधी माहिती, Agstya Aurvedik vanaspati information in Marathi


• फुले : 

फुलांच्या रंगावरून या झाडाचे चार प्रकार दिसून येतात.

यामध्ये पांढरी, लाल, निळी व पिवळी फुले अशा प्रकारची फुले या झाडाला येतात. कोयरी सारखी खालील बाजूस दिसतात व वरून देठ हिरवा असतो. ही शिव शंकरास वाहिली जातात.

• ही फुले कडवट, तिखट, उष्ण प्रकृती असणारी, मधूर , कोरडी, कफ व पित्त विकार कमी करणारी असतात.

अगस्त्या या आयुर्वेदीक औषधी वनस्पतीविषयी औषधी माहिती, Agstya Aurvedik vanaspati information in Marathi


फळ :

 या वनस्पतीस फुलानंतर अनेक शेंगा लागतात. त्यातील बियांपासून पुन्हा लागवड केली जाते.


अगस्त्य वनस्पतीमध्ये असणारे घटक:

• व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B , व्हिटॅमिन c आयर्न, कॅल्शियम व इतर सचेतन जागृत करणारे घटक असतात.

अगस्त्या या आयुर्वेदीक औषधी वनस्पतीविषयी औषधी माहिती, Agstya Aurvedik vanaspati information in Marathi


अगस्त्य वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी महत्त्व :

• मायग्रेन या मेंदूशी निगडित आजार असेल तर अगस्त्य वनस्पतीची पाने तोडून ती वाटावीत व त्याचा रस काढून तो दोन्ही नाकात दोन दोन थेंब घालावा. त्रास कमी होईल.

• अर्धं शिशीचा त्रास असेल तर डावी डोक्याची बाजू दुखत असेल तर उजव्या नाकपुडीत व उजवी दुखत असेल तर डाव्या नाकपुडी मध्ये अगस्त्य पानांचे चार ते पाच थेंब घालावेत. त्रास कमी होण्यास मदत होते.

• सर्दी, पडसे असेल, त्यामूळे कफ झालेला असेल, तर सकाळी अनुषापोटी म्हणजेच रिकाम्या पोटी अगस्त्य वनस्पतीची पाने वाटून काढलेला रस दोन ते तीन थेंब नाकातून घातल्यास कफ पातळ होऊन निघून जातो. व सर्दी पडसे कमी होते.

• ताप म्हणजे ज्वर असेल तरी देखील या वनस्पतीचा पानांचा रस नाकात घातला जातो.

• डोळ्याची जळजळ, त्रास होत असेल तरी नाकाद्वारे याच्या पानांचा रस घातला जातो.

• स्त्रियांना योनीविषयक असणाऱ्या समस्या, शारीरिक अशक्तता असेल. तसेच धातू दुर्बलता यावर या झाडाची फुले घेवून ती पाण्यात टाकून ते पाणी उकळून पाच ते दहा ग्रॅम मात्रेत घेत राहिल्यास या समस्या कमी होतात.

• पोटाचे विकार असतील, आतड्यात काही जखमा झाल्या असतील, अल्सर असेल,आतील बाजूस सूज आलेली असेल. तर अगस्त्य झाडाची पाने किंवा फुले ( फुले फक्त हिवाळ्यात मिळतात ) घेवून त्यांना बारीक वाटून त्यांचा रस काढावा व रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा रस प्यावा. मात्र रस घेतल्या नंतर एक तास काही खाऊ नये. एक तासा नंतर साधा आहार घ्यावा, तेलकट, तळलेले,मसालेदार पदार्थ, मिरची मसाले खावू नयेत. आतील अल्सर बरा होण्यासाठी व सूज कमी होण्यासाठी मदत होते. तसेच पोटातील बिघाड, आतील इन्फेक्शन घालवण्यासाठी अगस्त्य पान घेवून त्यामधे दिड कप पाणी घालून ते उकळून आटवून पाव कप करून काढा करून पिण्यास द्यावे लाभकारी असते.

• बद्धकोष्ठता असेल, रक्त पडत असेल, तर अगस्त्य झाडाची पाने वाटून त्याचा रस चमचा भर घेणे रोज सकाळी अनुशापोटी चांगले असते.

• विषरोधक म्हणून देखील अगस्त्य झाडाची पाने व फुले उपयोगी आहेत.

• या झाडाची साल कडवट पौष्टिक रुचकर आहे.शक्तिवर्धक म्हणून ओळखली जाते.

• अनिमिया रोगामध्ये लाभकारी या झाडाच्या पानांचा रस आहे.तसेच चिंता कमी करण्याचे काम करतात.

• स्त्रियांना मासिक पाळी त्रास असेल,स्वेत पदर असेल, तर अगस्त्य झाडाची पाने व फुले यांची पावडर करून किंवा ती ओली वाटून चमचा भर रस पिणे लाभकारी असते.

• एखाद्या व्यक्तीस वारंवार चक्कर येत असेल, मूर्च्छित होत असेल, शुद्ध हरपने, वारंवार मिरगीचे दौरे पडणे, यावर अगस्त वनस्पतीच्या पानांचा किंवा फुलांचा रस , काढून त्यांचे चार पाच थेंब नाकात टाकल्यास अशा व्यक्तीस शुद्ध येते.

अगस्त्या या आयुर्वेदीक औषधी वनस्पतीविषयी औषधी माहिती, Agstya Aurvedik vanaspati information in Marathi


अगस्त्य वनस्पतीचे सेवन करताना घ्यायची काळजी :

• या झाडाची पाने,फुले मूळ, साल, फळे यामधे औषधी गुणधर्म आहेत. मात्र याचे मर्यादेत सेवन करावे. जास्त प्रमाणात सेवन केल्यास मळमळ, उलटी, वमन, दस्त यासारख्या समस्या निर्माण होतात. विशेषत आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी सेवन करावे.

ही आहे 

अगस्त्या या आयुर्वेदीक औषधी वनस्पतीविषयी औषधी माहिती, Agstya Aurvedik vanaspati information in Marathi

अक्रोड विषयी आयुर्वेदिक माहिती Akrod vishyi mahiti

 अक्रोड विषयी आयुर्वेदिक माहिती

Akrod vishyi mahiti

अक्रोड विषयी आयुर्वेदिक माहिती  Akrod vishyi mahiti


• मराठी नाव : अक्रोड

• संस्कृत नाव : अक्षोर,

• हिंदी नाव : अखरोट,

• इंग्रजी नाव : Walnut,

• लॅटिन नाव : Aleurites,

 Trailoba,

अक्रोड विषयी आयुर्वेदिक माहिती  Akrod vishyi mahiti


• स्थान : 

भारत देश, चीन व इराण देशामध्ये अक्रोडाची झाडे आढळतात.

• उंची : 

हे एक जंगली झाड असून ते इतर झाडाप्रमाणे उंच असते. खोड जाड, असून हे झाड २५ ते ३० मिटर उंच वाढते. किंवा त्यापेक्षा ही जास्त वाढते.

• हल्ली याची कृषी पीक म्हणून लागवड केली जाते.

• पाने : 

साधे पान या प्रकारात या झाडाची पाने येतात.

• फळे : 

या झाडाला गोलाकार फळे येतात या फळाच्या आत कठीण कवचामध्ये गर असतो. त्याचा सुक्या मेव्यामध्ये समावेश करतात. हाच भाग आयुर्वेदात आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. असे सांगितलेले आहे.

अक्रोड विषयी आयुर्वेदिक माहिती  Akrod vishyi mahiti


• गुणधर्म : 

उष्ण गुणाचे व बियातील गर साधारण बदमासारखी चव अणारा हाच घटक आपण आहारात समावेश करतो.

अक्रोड मध्ये असणारे घटक :

व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन बी २, प्रोटीन, फोलेट,फायबर, पोटॅशियम, फॉस्फरस, म्याग्नेशियम, तांबे, सेलेनियम ओमेगा थ्री, फॅटी आम्ल हे औषधी गुणधर्म असतात.

अक्रोड विषयी आयुर्वेदिक माहिती  Akrod vishyi mahiti


अक्रोडाचे औषधी महत्त्व :

• अक्रोडामध्ये असणारे ओमेगा थ्री व फॅटी आम्ल यामुळे शरीरातील हृदयासाठी मदतनीस म्हणून अक्रोड काम करते.

• अक्रोड मध्ये असणाऱ्या काही औषधी घटकामुळे बुद्धीवर्धक म्हणून ते कार्य करते. त्याचा आकार मेंदू सारखा आहे. व याच्या सेवनाने बुध्दीची कार्यक्षमता कमी होते. ती वाढवून चांगले बुध्दीचे कार्य सुधारण्याचे काम अक्रोड करते.

• शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याचे व गुड कोलेस्टेरॉल वाढवण्याचे काम अक्रोड करते. वजन कमी करते. मात्र रोज दोन ते तीन अक्रोड खाणे ते ही रात्री भिजवून सकाळी खाणे फायद्याचे असते.

• ओमेगा थ्री व फॅटी आम्ल असल्याने शरीरास आतून मजबूत करुन व तंदुरुस्त ठेवून चपळता आणते, वाढत्या वयाची निष्क्रियता कमी करून तरतरी आणते.

• शरीराच्या आतील बिघडणे सूज येते. सांध्याच्या जोडात येणारी सूज असो यामुळे हृदय व हाडांचे दुखणे वाढू शकते. अक्रोड मध्ये असणाऱ्या अल्फा लिनोलोईक आम्ल, पॉली फिनोल या घटकाने सूज कमी होऊन आरोग्य सुधारते. म्हणून रोज अक्रोड खाणे फायद्याचे असते.

• बॅड कोलेस्टेरॉल कमी करते. त्यामुळे हृदय क्रिया सुरळीत सुरू ठेवते. व हृदय विकारापासून वाचवते.

• कॅन्सरचा नाश करणारे गुणधर्म यामध्ये असतात. बेस्ट कॅन्सर होण्यापासून वाचवतात.

• इ व्हिटॅमिन असल्याने केसांचे आरोग्य सुधारते, तसेच त्वचेचे आरोग्य सुधारून तेजस्वी करते, शरीरातील ताण कमी करण्याचे काम अक्रोड करते.

• गुडघे दुखी, कंबर दुखी, तसेच दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण अक्रोड खाणे फायद्याचे असते.

• गर्भवती स्त्रियांनी रोज तीन ते चार अक्रोड खाणे फायद्याचे असते. बाळाची वाढ नीट होण्यासाठी व गर्भवती स्त्रीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ते फायद्याचे असते.

• डायबिटीस म्हणजेच मधुमेह असलेल्या रुग्णांनी देखील अक्रोड खाणे फायद्याचे आहे.

अक्रोड विषयी आयुर्वेदिक माहिती  Akrod vishyi mahiti


अक्रोड आहारात कसे घेतात :

• अक्रोडाची दोन ते तीन फळे फोडून त्यातील गर थंड पाण्यात भिजत घालून सकाळी ते खावे. फायद्याचे असते.

• लोणचे, चटणी,ज्यूस करण्यासाठी देखील अक्रोड वापरतात. तर याचे तेल काढून त्याचा वापर खाण्यात करतात.


अक्रोड खाण्याचे तोटे :

• ज्या व्यक्तींना पित्त विकार व उष्णतेचा त्रास असेल तर त्यांनी अक्रोड अल्प प्रमाणात वैद्याच्या सल्याने खाणे फायद्याचे असते.

अशा व्यक्तींनी जास्त प्रमाणात सेवन केल्यास मळमळ उलटी होते.

• जर रक्त पातळ होण्याची गोळी खात असाल तर व ज्या लोकांमध्ये कॅलरीज कमी आहेत. त्या लोकांनी अक्रोड खाणे टाळावे. वैद्याचा सल्याने खाणे फायद्याचे असते.

• इतर उपयोग :

• अक्रोडाचे तेल साबण तयार करण्यासाठी वापरतात.

• याच्या लाकडाचा वापर बंदुकीचे बुंदे करण्यासाठी केला जातो.


• अशी आहे अक्रोड फळाविषयी आयुर्वेदिक माहिती

Akhrod vishyi mahiti


अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...