अहिवंतगड किल्ला / Ahivant fort
• स्थान :
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात अहिवंतगड सातमाळा डोंगर रांगेत आहे.
• उंची :
सदर किल्ला हा सरासरी ४००० फूट उंचीवर आहे.
• जवळचे ठिकाण : वणी.
• अहिवंतगड किल्यावर जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• नाशिक ते अहिवंतगड हे अंतर ५५ किलोमीटर आहे.
• मुंबई या आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून – नाशिक - दिंडोरी – वणी – नांदुरी मार्गे आपण अहिवंतगड किल्यावर जाऊ शकतो.
• गडावर पायथ्यापासून जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
• अचला किल्ल्याच्या पायथ्यापासून जवळून आपण अहिवंतगड किल्यावर जाऊ शकतो.
• बेगवाडी मार्गे दुसरी वाट गडावर जाते.
• तिसरी वाट ही दरेगाव मार्गे जाते.
• गडावर पाहण्यासारखी ठिकाणे :
बस अथवा खाजगी वाहनाने वणी नांदुरी रोडने आपण घाट संपताच लागणाऱ्या दरेगाव फाटा येथून दरेगावात जाऊन पोहोचतो. दरेगावात मारुती मंदीर आहे. तेथून जवळून एक वाट अहिवंत गडाकडे जाते. सपाट माळ लवंडल्यावर आपणास दाट जंगल लागते. तेथून पुढे छोटी टेकडी चढून गेल्यावर समोर अहिवंतगड व बुद्ध्या डोंगर लागतो. रानवाटेने आपण खिंडीत येतो. खिंडीत आल्यावर डावीकडे बुद्ध्या डोंगर तर उजवीकडे अहिवंत
गड राहतो.
• बुद्ध्या डोंगर :
हा या किल्ल्याचा सामायिक डोंगर लागून असल्याने येथे देखील पूर्वी वस्ती होती. याठिकाणी आपल्याला पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. त्यापैकी एक खांब टाके आहे. अहिवंतगड सुरक्षित रहावा यासाठी बुद्धा डोंगर ताब्यात ठेवण्यासाठी येथे चौकी पहारा ठेवला जात असे.
• पायरी मार्ग गुहा अहिवंत किल्ला :
बुध्द्या डोंगर पाहून पुन्हा खिंडीत आल्यावर आपण पायरी मार्गाकडे जाऊ लागतो. तेथे वाटेत आपल्याला एक गुहा खोली लागते. येथे खिंडीतून पहारा देणाऱ्या सैनिकांच्या निवाऱ्यासाठी याची निर्मिती केली असावी.
• पायरी मार्ग :
कठीण कातळ खडक फोडून त्यामध्ये चढण्यासाठी पायऱ्या केल्याचे दिसून येते. या मार्गाने आपण किल्यावर पोहोचू शकतो.
• विस्तृत पठार :
पायरी मार्गाने आपण जेव्हा गडमाथ्यावर पोहोचतो. तेव्हा विस्तृत पठार पहायला मिळते.
• वाडा अवशेष :
गडाच्या मध्यभागी एक विस्तृत वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. त्याच्या पायातील ज्योत्याच्या अवशेषांवरून त्याच्या तत्कालीन बांधकामाचा अंदाज बांधता येतो. येथे मुख्य गडकरी व अधिकारी निवास करत असावेत. किंवा विस्तृत सदर असावी.
• इतर इमारत अवशेष :
गडावर आजूबाजूला आणखी इमारतीचे अवशेष पाहता. त्यावरून या गडावर मोठ्या प्रमाणात शिबंदी व वस्ती असावी हे समजते.
• पाणी तलाव :
मध्यभागी आपल्याला एक विस्तृत पाण्याचा तलाव पाहायला मिळतो. त्या शेजारी मंदिर आहे.
• मंदिर :
गडाच्या मध्यावर तलावाशेजारी एक मंदिर असून ते भग्न झालेले जाणवते. तेथील आतील बाजूस चपटदान मारुती व देवी सप्तशृंगी देवीची मूर्ती पहायला मिळते.
• पाणी टाके :
गडाच्या दक्षिण पश्चिम बाजूस विस्तृत घळ आहे. त्या घरी शेजारी पावसाळी पाण्याची आवक पाहून पाण्यासाठी टाके खोदले गेल्याचे दिसते.
कोठार अवशेष :
गडावर आपल्याला कोठारचे अवशेष पाहायला मिळतात. अशी दोन कोठारे दिसून येतात. यापैकी एकाचा धान्यसाठा करण्यासाठी तर दुसऱ्याचा दारूगोळा साठवण करण्यासाठी वापर केला जात असावा.
• विस्तृत गुहा :
गडाच्या पश्चिम कडेस सुरक्षेसाठी रेलिंग लावले आहे. त्या शेजारून चालत गेल्यावर एका छोट्या घळीतून खाली उतरले की विस्तृत अशी लयन गुहा लागते. यामध्ये वस्ती करू शकतो. समोर तवल्या डोंगर दिसतो.
• पाणी टाके व खंडोबा भग्न मंदीर :
गडाच्या शेवटी मागील बाजूस जवळच एक पाण्याचे टाके दिसून येते. त्यास स्थानिक लोक बाळंतिनीचे टाके म्हणतात. त्या शेजारी आपणास एक हिंदू देवतेची मूर्ती पहायला मिळते. तेथ पूर्वी एक छोटे मंदिर असावे. काही स्थानिक बाळंतीनीचे मंदिर असा उल्लेख करतात. पण मूर्ती पाहता ती खंडोबाची अश्वारूढ मूर्ती दिसून येते. हे खंडोबा मंदिर असावे. हे पाहता जाणवते.
• मोठे तळे :
गडाच्या जवळच एक विस्तृत तलाव आहे. यावरून येथे खूप सैनिक तळ व राबता असल्याचे जाणवते.
• विस्तृत कातळ गुहा :
गडाच्या उत्तर बाजूस आपल्याला एक विस्तृत गुहा पहायला मिळते. यामध्ये राहण्याची व्यवस्था होऊ शकते. ही गुहा पाहण्यासाठी लोखंडी सीडी लावलेली आहे. येथे जाण्याचा मार्ग थोडा भंग झाल्याने सीडी द्वारे उतरुन आपण विस्तृत गुहा पाहू शकतो.
• गडावर जागोजागी आपल्याला विस्तृत पाण्याची टाकी पाहायला मिळतात.
• या गडाचा आकार एखाद्या खेकड्यासारखा आहे. मागे अचला किल्ला सोंडे सारखा, डावीकडे दरेगाव खिंड, ऐकून रचना एखाद्या जलचर खेकड्यासारखी या किल्याची आहे.
• अहिवंत किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती :
• सदर किल्ला हा बागलाण प्रदेशातील असून याची रचना पाहता हा किल्ला जवळ जवळ १००० वर्ष जुना आहे.
• या किल्ल्याचे बांधकाम वेगवेगळ्या काळात झाल्याचे जाणवते.
• सातवाहन, यादव काळात येथे गुहा व पाणी टाक्यांची खुदाई झाली. इतर तत्कालीन गडसारखी पाणी टाके खुदाई दिसून येते.
• पुढे हा किल्ला सुलतानशाहीत होता.
• त्यानंतर बहामनी सत्तेच्या ताब्यात हा किल्ला होता.
• बहामनी सत्तेचे विभाजन झाल्यावर या ठिकाणी निजामशाही सत्तेच्या ताब्यात हा किल्ला होता.
• निजामशाहीचा अखेर १६३६ साली झाला व येथे मुघल बादशहा शहाजहान याने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
• इंद्राई तसेच रवळ्या येथील शिलालेखात बागलाणातील सर्व १४ किल्ले अलीवर्दीखान याने जिंकून घेतले असा उल्लेख आढळतो.
• इसवी सन १६७० च्या दरम्यान हा किल्ला मोरोपंत पिंगळे यांनी स्वराज्यात आणला. असा शिवकालीन दफ्तरी इस १६८० साली उल्लेख आढळतो.
• शिवरायांनी दुसरी सुरत लूट तसेच कारंजा या पेठा लुटल्यानंतर औरंगजेब बादशहाने महाबतखान व दिलेरखानास हा किल्ला व बागलाणातील किल्ले जिंकण्यासाठी पाठवले.
• आख्यायिका : महाबतखान याने गडाला मोर्चा लावला. पुढील बाजूने महाबतखान तर छडीच्या बाजूने दिलेरखान होता. एक महिना झाला तरी गड हाती येत नव्हता. तेव्हा त्यांनी एका ज्योतिषास विचारले. तेव्हा ज्योतिषाने साखर मागवून त्यापासून किल्याची प्रतिकृती तयार केली. व एक मुंगळा सोडला. त्याच्या चालीवरून गड कसा घेता येईल. हे त्याने समजावले. महाबतखान असलेल्या बाजूने प्रखर संघर्ष होईल. व दिलेरखान असलेल्या बाजूने किल्ला ताब्यात येईल हे भविष्य सांगितले. व त्याच पद्धतीने किल्ला जिंकला.
• मुघल काळात हे एक विस्तृत लष्करी ठाणे होते.
• पुढे सतराव्या शतकात हा किल्ला पुन्हा मराठ्यांनी ताब्यात घेतला.
• पुढे हा किल्ला पेशवाईत होता.
• इसवी सन १८१८ साली ब्रिटिश अधिकारी प्रार्थर याने हा किल्ला ब्रिटिश सत्तेच्या ताब्यात घेतला. येथील वास्तू व मार्ग त्याने तोफेच्या माऱ्याने उद्ध्वस्त केले.
• १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
• अशी आहे अहिवंत किल्ल्याची माहिती
Ahivant gadachi mahiti.












कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.