crossorigin='anonymous' src='https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1553308877182847'/> महाराष्ट्र किल्ले व स्थळे यांची माहिती Forts and places in maharashtra: मेळघाट व्याघ्र प्रकल्प / melghat vyaghra praklpa

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

मेळघाट व्याघ्र प्रकल्प / melghat vyaghra praklpa

 मेळघाट व्याघ्र प्रकल्प / melghat vyaghra praklpa

• स्थान :

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेल्या सातपुडा पर्वताच्या गाविलगड डोंगर रांगेच्या दक्षिण उतारावर मेळघाट अभयारण्य आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प / melghat vyaghra praklpa


• क्षेत्रफळ : 

या अभयारण्याचे क्षेत्रफळ मेळघाट २७६८ चौरस किलोमीटर आहे

• इसवी सन १९७४ साली येथे असलेल्या व्याघ्र संख्येमुळे भारतातील मोजक्या व्याघ्र प्रकल्पात मेळघाट या अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे.

• हवामन : 

 हे उष्ण कटिबंधीय कोरडे पानगळ होणाऱ्या प्रदेशात येते.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प / melghat vyaghra praklpa


• वनस्पती : सांग, हळदू, बांबू, कवठ, अंजन, मोह, पिंपळ, वड, चिंच, साल, धामण, बेल, जांभूळ, कडुलिंब, तेंडुपत्ता,, ऐन, धावडा, कुसुम, तिवस, आओल, अशी अनेक प्रकारची झाडे व झुडपे आढळतात.

• प्राणी : बंगाल टायगर, अस्वल, चितळ, भुंकणारे हरिण, बिबट्या, जंगली डुक्कर, लांडगे, सांबर, नीलगाय, गवा,शेकरू खार, चौसिंगा, ढोल,माकडे, लंगूर, तरस, चित्ता यासारखे प्राणी आढळतात.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प / melghat vyaghra praklpa


• सरीसृप :

येथे पुष्कळ स्वरूपाचे सरीसृप आढळतात. साप, धामण, अजगर, घोरपड, भारतीय नाग, सरडे, बेडूक, गोगलगाय.

पक्षी :

प्रत्येक हंगामा नुसार निरनिराळे स्थलांतरित पक्षी येथे पहायला मिळतात. २५० पेक्षा जास्त प्रजाती पहायला मिळतात. घुबड, ससाणे, कबुतर, खंड्या, तांबट, सुतारपक्षी, गिधाडे व रंगीबेरंगी पक्षी येथे पहायला मिळतात.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प / melghat vyaghra praklpa


अभयारण्य परिसरात पाहण्यासारखी ठिकाणे :

• सेमाडोह : नदीच्या पात्रशेजारी असून राहण्यासाठी या परिसरात सोय होते.

• बाळ धबधबा/ बेबी धबधबा : अरण्यात मध्यभागी आहे. लहान आहे. पर्यटकांना आकर्षक व सुरक्षित आहे.

• सीपना नदी : या नदीवर धरण आहे सेलू परिसरात कोहा फॉरेस्ट गेट आहे. येथून वनखाते परवानगीने आत जाता येते. कोरकू आदिवासी वस्ती आढळते.

• झरीघाट : अरण्याच्या दक्षिण विभागात आहे. येथे घनदाट अरण्य असून वाघांचा वावर असतो. येथे निरीक्षण स्थळे आहेत. येथून पुढे हाय पॉईंट देखील आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प / melghat vyaghra praklpa


• कंदरी बाबा परिसरात निरीक्षण मचाण आहेत.

• बार्डिंग पौंड ( पक्षी तलाव ) : या परिसरात अनेक पाणपक्षी व स्थानिक अन् स्थलांतरित पक्षी तळ्याशेजारी पहायला मिळतात. हे एक पक्षी निरीक्षण केंद्र आहे.

• कोलकस विभाग : येथे अरण्य सफरीचा आनंद हत्ती वरून मिळतो.

• बेळकुंड ब्रिझ : सुंदर पुल व त्याखालून वाहणारा नदीप्रवाह पाहण्यास आनंददायी आहे.

• डोलारा बाबा मंदीर : येथे एक छोटे हिंदू मंदीर अरण्यात आहे

• वान नदी परिसर : थोडा विरळ जंगल प्रदेश असून अनेक प्रकारचे प्राणी विशेषत गवत खाणारे प्राणी आढळतात.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प / melghat vyaghra praklpa


• या जंगलात अनेक पाडे आहेत. विशेषत कोरकु आदिवासी मुख्य येथील अरण्याजवळील पाड्यात राहतात.

• पठारी भाग / सातपुडा रेंज प्रदेश : मध्यप्रदेशाला लागून असलेला भाग घनदाट जंगलाचा आहे. येथे शिकार करण्यासाठी बंदी आहे.

• गुल्लर घाट : हा विभाग वाघांसाठी रिझर्व्ह आहे. येथे पाझर तलाव आहेत.

• खटखाली विभाग : या परिसरात रेस्ट हाऊस आहेत. येथे राणीमहाल ही भग्न वास्तू पहायला मिळते.

• मखला, कूकरु, कसाई ही निरीक्षण स्थळे आहेत.

• या अरण्य परिसरात नरनाळा किल्ला, सेमाडोह, कोलकस, चिखलदरा, यासारखी ठिकाणे पहायला मिळतात.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प / melghat vyaghra praklpa


वाहतूक मार्ग :

• नागपूर येथून २५० किलोमीटर अंतरावर मेळघाट आहे.

• बडनेरा मध्यप्रदेश रेल्वे स्टेशन पासून १० किलोमीटर अंतरावर आहे,

• चिखलदरा येथून ३२ किलोमीटर अंतरावर आहे.

जाण्यासाठी उत्तम काळ :

• जुलै ते सप्टेंबर पावसाळी निसर्ग पाहता येतो. पण पावसामुळे गैरसोय होते.

ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा अभयारण्य पहायला उत्तम काळ आहे. अनेक पक्षी निरीक्षण करता येतात.

• मार्च ते मे फक्त पाणवठा परिसरात प्राणी निरीक्षण करता येते.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प / melghat vyaghra praklpa


अभयारण्यात जाताना घ्यावयाची काळजी :

• परिसरातील माहितीगार गाईड असणे उत्तम.

• प्लॅस्टिक बॉटल, प्लास्टिक पिशवीतील खाद्य पदार्थ नेवून प्रदूषण करू नये. कापडी किंवा कागदी पिशवी वापरणे उत्तम आहे.

• प्राणी निरीक्षण करताना कोणतीही आवाज करू नये. त्यांना स्पर्श करू नये.

• अभयारण्य पाहणी मार्गावरून आड बाजूला जास्त घुसू नये. टेहळणी मार्गावरून दुर्बिणीतून पाहणे उत्तम.

• प्राणी पाहताना वापरल्या जाणाऱ्या गाडीतून खाली उतरू नये.

• कॅन्टर, जिप्सी, यासारखी वाहने वापरावीत.

• प्राणी निरीक्षण व फोटो कॅमेऱ्यात घेणे उत्तम. मोबाईल वापरू नये.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प / melghat vyaghra praklpa


अशी आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विषयी माहिती.Melghat vyaghra praklpa

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.

अहिवंतगढ़ किला / Ahivant Fort

  अहिवंतगढ़ किला / Ahivant Fort  • स्थान : अहिवंतगढ़ किला महाराष्ट्र के नाशिक जिला के सटाणा तालुका में स्थित है। यह सातमाला पर्वत श्रृंखला म...